मासिक पाळी, लग्न… मुलींचं होतंय मोठं नुकसान? स्मृती इराणी यांचं मोठं वक्तव्य
WITT : मासिक पाळी, लग्न... मुलींना करावा लागतोय अनेक गोष्टींचा सामना, स्मृती इराणी यांचं मोठं वक्तव्य... मुलींची बाजू मांडत स्मृती इराणी समाजातील अनेक गोष्टींवर केलाय खुलासा...
मुंबई | 26 फेब्रुवारी 2024 : देशातील सर्वात मोठ्या न्यूज नेटवर्क TV9 च्या ‘व्हॉट इंडिया थिंक्स टुडे’ या विशेष कार्यक्रमात केंद्रीय मंत्री स्मृती इराणी देखील उपस्थित होत्या. यावेळी त्यांनी ‘नारी शक्ति: ड्रायव्हिंग मिशन विकसित भारत’ या विषयावर स्वतःचं मत मांडलं. यावेळी यांना स्मृती इराणी शाळांमधील कमी होणाऱ्या मुलींच्या संख्येबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. यावर स्मृती इराणी म्हणाल्या, ‘2014 मध्ये आमचे सरकार सत्तेत आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी याविषयाकडे अधिक लक्ष असणार आहे. आम्ही राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आमलात आणणार आहोत…’
मुलींना कराव्या लागण्याऱ्या अडचणींबद्दल देखील स्मृती इराणी यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. ‘सध्या 36 ते 38 मिलियन विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. पण 12 वीनंतर मुली उच्च शिक्षण घेऊ शकत नाहीत. यामध्ये सर्वात मोठं आव्हान लग्न असतं. लग्नानंतर मुलींनी शिक्षणासाठी दुसऱ्या शहरात जाता येत नाही.’
‘फक्त लग्न नाही तर, मासिक पाळीनंतर वयात आल्यानंतर देखील शाळांमध्ये मुलींच्या संख्येत घट होते.कारण शाळांमध्ये टॉयलेटची सुविधा नसते. हिच गोष्ट लक्षात घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पहिल्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर मुलींसाठी टॉयलेट बनवले.’
पुढे स्मृती इराणी म्हणाल्या, ‘राज्यात कोणत्याच सरकारी शाळांमध्ये टॉयलेट नव्हते तेथे टॉयलेटची सुविधा उपलब्ध करुन दिली. म्हणून राज्यांसोबत मिळून काम केलं. या कामासाठी राज्यांनी देखील पाऊले पुढे टाकली. स्वातंत्र्यानंतर इतिहासात प्रथमच जेंडर इन्क्लुजन फंड देण्यात आला, ज्याद्वारे तरुण मुलींना शिक्षणासाठी मदत करण्यात आली.’ असं देखील स्मृती इराणी म्हणाल्या.
एवढंच नाही तर, स्मृती इराणी पश्चिम बंगालमधील संदेशखळीच्या घटनेबाबतही त्यांनी स्वतःचं मत व्यक्त केलं. या ग्लोबल समिटमध्ये अनेक परदेशी पाहुणे देखील आहेत. त्यामुळे मी आपल्या देशातील काही विषयांवर प्रतिक्रिया देणार नाही. तिथे जे काही घडले ते कोणत्याही माणसाच्या कल्पनेपलीकडचे आहे, मग तो भारतीय असो वा नसो. निवडणुकीनंतर पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार झाला होता.
भाजपचा माणूस असेल तर त्याला सहज मारता येईल…. अशी भावना बंगालमध्ये आहे, असं मी म्हणाली होती. ममता सरकारवर निशाणा साधत इराणी म्हणाल्या, ‘भाजपच्या महिला कार्यकर्त्या असतील तर,घराबाहेर काढून सामूहिक बलात्कार केला जाऊ शकतो.’
‘भाजपच्या युवा कार्यकर्त्याला शेतातील झाडाला टांगून मारले जाऊ शकते. पक्षाच्या ज्येष्ठ कार्यकर्त्याच्या घराला आग लागू शकते. जर आम्ही भाजपचे आहोत, तर पश्चिम बंगालमध्ये आम्हाला कोणी मारहाण केली तरी काही फरक पडू नये कारण आम्हाचा लढण्याचा ही राजकीय धर्म आहे.’ असं देखील स्मृती इराणी म्हणाल्या.