Sushasan Mahotsav 2024 : 370 कलम रद्द झाल्यानंतरचा काश्मीर कसा आहे?; नायब राज्यपाल काय म्हणाले?
सुशासन आणि जम्मू-काश्मीरचा दूरदूरचा संबंध नव्हता. दोघांमध्येही मोठी दरी होती. पण 370 कलम हटवल्यानंतर ही दरी दूर झाली. आज कायद्याचे राज्य प्रस्थापित झालं आहे. पाकिस्तानच्या इशाऱ्यावरून होणारी दगडफेक आज इतिहास जमा झाली आहे. सुशासनामुळे उद्योग आणि शाळा व्यवस्थित सुरू आहेत. लोक लेट नाईचा आनंदही घेत आहेत. तरुणांच्या हातात तिरंगा दिसत आहे. आता जम्मू-काश्मीर खोऱ्यात गोळीबारांचा आवाज नाही तर प्रगतीचा आवाज ऐकायला येतोय...
नवी दिल्ली | 10 फेब्रुवारी 2024 : जम्मू-काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांना अचानक जम्मू-काश्मीरमध्ये पाठवण्याचा भाजपने निर्णय घेतला होता. त्यांना जम्मू-काश्मीरचे राज्यपाल म्हणून नियुक्त करण्यात आले. ते करण्यात आलं? त्यामागची कारणं काय आहेत? राज्यपालपद कसं चालत आलं? त्यावेळी नेमकं काय घडलं? याचा गौप्यस्फोट करतानाच 370 कलम हटवल्यानंतर आता जम्मू-काश्मीरमधील परिस्थिती काय आहे? यावर जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी प्रकाश टाकला आहे. दिल्लीत रामभाऊ म्हाळगीने आयोजित केलेल्या सुशासन महोत्सवात ते बोलत होते.
रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीने सुशासन महोत्सवाचे आयोजन केले आहे. या महोत्सवात आज जम्मू-काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांची मुलाखत घेण्यात आली. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांना हात घातला. बनारसमध्ये असताना मला अमित शाह यांचा फोन आला. त्यांनी मला काही महत्त्वाची चर्चा करण्यासाठी दिल्लीत बोलावलं. चर्चेदरम्यान इतर राज्यांसह त्यांनी जम्मू-काश्मीरवरही बोलायला सुरुवात केली. अमित शाह मला जम्मू-काश्मीरबाबत का सांगत आहेत हे माझ्या लक्षात आलं नाही. त्यानंतर त्यांनी मला जम्मू-काश्मीरमध्ये जावं लागेल असं सांगितलं. काश्मीरचा विकास करायचा आहे, तुम्हाला हे काम करावंच लागेल, असंही शाह म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या मनात त्यावेळी काय होतं, हे मला माहीत नाही. पण त्यांनी जबाबदारी दिल्यानंतर माझ्या बुद्धी आणि क्षमतेनुसार मी काम करत आहे. मला किती यश मिळालं हे आता काळच ठरवेल, असं जम्मू-काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी सांगितलं.
अविभाज्य भाग बनला
राज्यात सुशासन वृद्धिंगत होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशात असंभवनीय आणि अनाकलनीय लक्ष्य पार पाडलं जात आहे. त्याच पद्धतीने जम्मू-काश्मीरने अनेक लक्ष्य गाठली आहेत. अनेक लोकांचा त्याग, तपस्या आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इच्छाशक्तीमुळे जम्मू-काश्मीर देशाचा अविभाज्य भाग बनला आहे. ही मोठी कामगिरी आहे, असं जम्मू-काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा म्हणाले.
सुशानामुळे मोठी झेप
सुशासनामुळेच जम्मू काश्मीरने मोठी झेप गेतली आहे. आज राज्यातील परिस्थिती बदलत आहे. पूर्वी भारतविरोधींना पुरस्कृत केलं जात होतं. पण आज ती परिस्थिती राहिली नाही. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी संसंदेत एक प्रश्न विचारला होता. देशाचा राष्ट्रपती जम्मू-काश्मीरमध्ये जमीन खरेदी करू शकत नाही. भारतीयांना तिथे राहता येत नाही, असं अटल बिहारी वाजपेयी यांनी म्हटलं होतं. पण आज ती परिस्थिती राहिली नाही. आजचा जम्मू-काश्मीर बदलला आहे, असं सिन्हा म्हणाले.