Bihar | बिहारमध्ये चाललंय तरी काय? कॉल गर्ल सप्लायरला डीएसपीचा फोन सापडल्यानंतर उडाली खळबळ
कथित महिलेचा दावा आहे की तिने इतर पोलिस अधिकाऱ्यांना मुली पुरवल्या आहेत. तिने आतापर्यंत चार वेळा मुलींना येथे पाठवले आहे.
नवी दिल्ली : बिहारमधील मधेपुरामध्ये (Bihar, Madhepura) कॉल गर्ल (Call Girl) सप्लायर महिलेकडून पोलीस विभागाच्या डीएसपीचा (DSP) मोबाईल जप्त झाल्याची चर्चा संपूर्ण राज्यात आहे. या प्रकरणाबाबतचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. झालेल्या व्हायरल व्हिडिओमध्ये, कथित पुरवठादार महिला दावा करत आहे, की ती मधेपुरामधील अनेक पोलिस अधिकाऱ्यांना मुली पुरवत आहे. हा व्हिडीओ सहरसा डीआयजी कार्यालयातील असल्याचा दावा महिलेने केला आहे. व्हिडिओमध्ये ती महिला असेही सांगत आहे की, तिने एका मुलीला मधेपुरा सदर रुग्णालयासमोरील डीएसपींच्या घरी पाठवले होते. त्यावेळी त्या मुलीने हा मोबाइल फोन चोरून तिला दिला होता.
कथित महिलेचा दावा आहे की तिने इतर पोलिस अधिकाऱ्यांना मुली पुरवल्या आहेत. तिने आतापर्यंत चार वेळा मुलींना येथे पाठवले आहे. विशेष म्हणजे महिलेने दराबाबत मोठा खुलासा केला आहे. ती एका मुलीला पाठवल्यानंतर एका तासाचे ३०० रुपये घेत होती असंही तिने सांगितलं आहे. त्याचवेळी मुलीला बराच वेळ ठेवण्यासाठी 500 रुपये घेण्याचे बोली देखील झाली आहे. मात्र अनेक वेळा ‘काम’ करूनही पैसे न दिल्याने तरुणीने डीएसपीचा मोबाईल चोरून नेला. त्यानंतर त्या मोबााईलमधील अनेक गोष्टी व्हायरल झाल्याची माहिती एका खासगी वाहिनीने जाहीर केली आहे.
मधेपुराचे पोलिस अधीक्षक राजेश कुमार रजेवर गेल्यावर मुख्यालयाचे डीएसपी अमरकांत चौबे यांना एसपीचा कार्यभार मिळाला होता. एसपींनी आपला अधिकृत मोबाइल डीएसपीकडे दिला होता. यादरम्यान एका मुलीला (कॉल गर्ल) डीएसपीने तिच्या घरी बोलावले होते. अपेक्षित दर न मिळाल्याने तरुणी उशीखाली ठेवलेला मोबाईल घेऊन निघून गेली. दरम्यान, डीआयजींनी एसपींच्या क्रमांकावर फोन केला असता फोन बंद होता. यानंतर डीआयजींच्या सूचनेवरून डीएसपी अमरकांत चौबा यांचा मोबाईलवर पाळत ठेवण्यात आली. मोबाईलचे लोकेशन सहरसा येथील असल्याने डीआयजींना धक्काच बसला आहे.