POK : पाकव्याप्त काश्मीर नक्की कसा आहे, लोकं का करताय स्वतंत्र देशाची मागणी
POK पाक व्याप्त काश्मीर हा नेहमीच भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांसाठी ज्वलंत मुद्दा राहिला आहे. अजूनही दोन्ही देशांमध्ये याचा मुद्दा निवडणुकांमध्ये येतो. पाकिस्तानमध्ये प्रत्येक निवडणुकीत काश्मीरचा मुद्दा असतो. पण हा पीओके नेमका आहे तरी कसा. तो पाकिस्तानात कसा गेला. जाणून घ्या.
POK : भारताला 1947 मध्ये स्वातंत्र्य मिळाले होते. तेव्हा महाराजा हरिसिंह हे जम्मू-काश्मीरचे राज्यकर्ते होते. त्यांच्यापुढे दोन पर्याय होते एकतर भारतात येण्याचा किंवा मग पाकिस्तानात जाण्याचा. पण हा निर्णय घेण्यासाठी हरिसिंह यांना बराच वेळ लागला. काश्मीर भारतात किंवा पाकिस्तानमध्ये विलीन न करता स्वतंत्र देश म्हणून राहावे, अशी त्यांची इच्छा होती. पण त्या दरम्यानच पाकिस्तानच्या बाजूने असलेल्या मुस्लीम लोकांनी हरिसिंह यांच्या विरोधात आघाडी उघडली. राज्य धोक्यात आल्याचे लक्षात येताच हरिसिंह यांनी भारतीय लष्कराची मदत मागितली. पण भारताने सशर्त देण्याचे मान्य केले. पण तोपर्यंत बराच वेळ झाला होता. काश्मीरचा तो भाग आजही पाकिस्तानच्या ताब्यात आहे. या भागाला पाकव्याप्त काश्मीर म्हटले जाते.
भारतीय लष्कराने काश्मीरचे महाराज हरिसिंह यांच्यापुढे अट ठेवली होती की, जम्मू-काश्मीरला स्वतःला भारताचे राज्य म्हणून स्वीकारावे लागले. भारताचे संरक्षण, परराष्ट्र धोरण आणि दळणवळण यांसारखे अधिकार स्वीकारावे लागतील. हरिसिंह यांनी ते मान्य केले. पण तोपर्यंत बंडखोरांनी मोठा भाग ताब्यात घेतला होता. पुढे राजकारण डोळ्यासमोर ठेवून या भागातील काश्मिरींनी स्वतःला स्वतंत्र देश घोषित केले. तेव्हापासून या भागाला पाकिस्तानकडून आझाद काश्मीर तर भारताकडून पाकव्याप्त काश्मीर (पीओके) म्हटले जाते.
पीओकेचे एकूण क्षेत्रफळ सुमारे 13 हजार चौरस किलोमीटर आहे. जिथे सुमारे 30 लाख लोक राहतात. हा भाग बहुतांशी अज्ञात आहे. पण पीओकेवर पाकिस्तानचा प्रभाव आहे. पाकिस्तानचा हस्तक्षेप देखील येथे मोठ्या प्रमाणात आहे.
भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही देश पीओकेवर दावा करतात. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही हा भाग भारतात परत आणण्याबाबत वक्तव्य केले होचे. हा मुद्दा नेहमीच चर्चेत असतो की भारत पीओकेला परत आपल्या देशात आणणार का. पण येथील स्थानिक लोकांनी पाकिस्तानचा अन्याय आपल्यावर सातत्याने होत असल्याचे वाटत आहे. त्यामुळे आता तिथे स्वातंत्र्याचा नारा दिला जातोय. पीओकेमध्ये सध्या पाकिस्तानविरोधात निदर्शने सुरू आहेत.
पाकव्याप्त काश्मीर हा जम्मू आणि काश्मीर आणि गिलगिट बाल्टिस्तान या दोन भागात वाटला गेला आहे. या दोन्ही भागांना मिळूनच आझाद काश्मीर म्हटले जाते.
पीओकेची रचना आणि भूगोल
– पाकव्याप्त काश्मीरमध्ये देखील पंतप्रधान आणि राष्ट्रपती अशी दोन पदे आहेत. तेथे देखील मंत्रीमंडळ आहे. – पाकव्याप्त काश्मीरमध्ये स्वतःचे सरकार असल्याचा दावा केला जातो. परंतु सत्य वेगळेच आहे. हे सरकार पाकिस्तानच्या नियंत्रणाखाली काम करते. पीओकेचे स्वतःचे सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालय देखील आहे. – पीओकेचा भाग पूर्वेला पाकिस्तानच्या पंजाब प्रांत, अफगाणिस्तानच्या वाखान कॉरिडॉर, चीनच्या शिनजियांग आणि भारताच्या काश्मीरला लागून आहे. – गिलगिट बाल्टिस्तानचा भाग जर वेगळा केला तर आझाद काश्मीरचे क्षेत्रफळ 13 हजार 300 चौरस किलोमीटरमध्ये पसरले आहे. येथे राहणाऱ्या लोकांची संख्या ही 40 लाख आहे. भारतीय काश्मीरपेक्षा हा भाग तिप्पट मोठा आहे. – पाकव्याप्त काश्मीरची राजधानी मुझफ्फराबाद आहे. या शिवाय मीरपूर, भिंबर, कोटली, मुझफ्फराबाद, बाग, नीलम, सुधानोटी आणि रावळकोट हे 8 जिल्हे यात आहेत. याशिवाय 19 तहसील आणि 182 संघ परिषद आहेत.
– पाकव्याप्त काश्मीरचा मोठा भाग हंझा गिलगिट, शक्सगाम व्हॅली आणि रक्सम हे आहेत. बाल्टिस्तानचा भाग पाकिस्तानने 1963 मध्ये चीनला दिला होता. या हस्तांतरित क्षेत्राला ट्रान्स काराकोरम म्हटले जाते. – भारतीय जम्मू-काश्मीरच्या त्या भागाला पाकव्याप्त काश्मीर असे म्हणतात, जो 1947 च्या फाळणीदरम्यान पाकिस्तानने ताब्यात घेतला होता.
पीओकेमध्ये जनजीवन कसे आहे
– PoK मधील लोक प्रामुख्याने शेतीवर अवलंबून आहेत. या ठिकाणी मका, गहू ही पिके होता. पशुपालन हे येथील उत्पन्नाचे मुख्य स्त्रोत आहेत. – या भागात कोळसा आणि खडूचे काही साठे आहेत, बॉक्साईटही सापडतो. येथील उद्योग प्रामुख्याने लाकडी वस्तू, कापड आणि कार्पेट्स यांसारखी उत्पादने तयार करतात. – शेतीतून मशरूम, मध, अक्रोड, सफरचंद, चेरी, काही औषधे, ड्रायफ्रुट्स इथे उपलब्ध आहेत. – पश्तो, उर्दू, काश्मिरी आणि पंजाबी या प्रदेशातील प्रमुख भाषा आहेत.