Parsi Last Rituals : पारसी समुदाय आता मृतदेह गिधाडाच्या हवाली का करत नाही?
Parsi Last Rituals : पारसी धर्मातील व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर तो मृतदेह टावर ऑफ सायलेन्समध्ये ठेवला जातो. पारशी धर्मातील लोकांवर कसे अंत्यसंस्कार होतात? ही परंपरा कुठून आली? त्याचे नियम काय? पारसी धर्मात मृतदेह गिधाडांच्या हवाली का केले जातात? जाणून घ्या.
पारसी धर्मात मृतदेहावरील अंत्यसंस्काराची पद्धत हिंदुंचे अग्नि संस्कार आणि मुस्लिमांच्या दफनविधीपेक्षा पूर्णपणे वेगळे आहेत. मानवी शरीर हे निर्सगाने दिलेली एक भेट आहे. त्यामुळे मृत्यूनंतर हे शरीर पुन्हा निसर्गाकडे सोपवलं पाहिजे असं पारसी लोक मानतात. जगभरात पारशी अशा पद्धतीने अंत्यसंस्कार करतात. मृतदेह टावर ऑफ सायलेन्समध्ये ठेवला जातो. पारशी धर्मातील लोकांवर कसे अंत्यसंस्कार होतात? ही परंपरा कुठून आली? त्याचे नियम काय? पारसी धर्मात मृतदेह गिधाडांच्या हवाली का केले जातात? जाणून घ्या.
टावर ऑफ सायलेन्स अशी जागा आहे, जिथे पारशी लोक आपल्या प्रियजनांच्या मृत्यूनंतर मृतदेह निर्सगाच्या कुशीत सोडून देतात. प्राचीन काळापासून पारसी समुदायात ही प्रथा चालू आहे. याला दखमा सुद्धा म्हणतात. पारसी समुदायात मृतदेह ‘टॉवर ऑफ सायलेन्स’मध्ये सोडण्याची परंपरा आहे. ‘टॉवर ऑफ सायलेन्स’मध्ये हे मृतदेह गिधाडांच्या हवाली केले जातात. याला ‘मृतदेहाच आकाशात दफन’ असं सुद्धा म्हटलं जातं. नव्या पिढीतील पारशी आता अशा पद्धतीच्या अंत्यसंस्कारावर जास्त भर देत नाहीत.
दोखमेनाशिनी म्हणजे काय?
पारसी धर्मात मृतदेह गिधाडाच्या हवाली केल्यानंतर उरलेली हाडं छोटासा खड्डा खणून त्यामध्ये पुरली जातात. अंत्यसंस्काराच्या या परंपरेला दोखमेनाशिनी सुद्धा म्हटलं जातं. पारसी धर्मात मृतदेह जाळणं किंवा दफनविधी निसर्गाला खराब करणं मानलं जातं. पारसी धर्मात पृथ्वी, जल आणि अग्निला खूप पवित्र मानतात.
अरंध म्हणजे काय?
पारशी समुदायात मृत्यूनंतर कुठल्याही जीवाच्या कामी येणं पुण्य मानलं जातं. अग्नि संस्कार आणि दफनविधीमुळे पृथ्वीवरील माती, पाणी आणि अग्नि दूषित होते असं पारसी लोक मानतात. टावर ऑफ सायलेन्समध्ये मृतदेह ठेवल्यानंतर मृत आत्म्याला शांती मिळावी म्हणून चार दिवस प्रार्थना केली जाते. त्याला अरंध म्हणतात.
सायरस मिस्त्री यांच्यावर कसे अंत्यसंस्कार झालेले?
गिधाडांच्या घटत्या संख्येमुळे पारसी समुदायाला आपल्या अंत्यसंस्काराच्या पद्धतीत बदल करावा लागला आहे. सायरस मिस्त्री यांचा रस्ते अपघातात मृत्यू झाल्यानंतर त्यांच्यावर पारश्यांनी बनवलेल्या विद्युत दाहिनीत अंत्यसंस्कार करण्यात आले. तेच या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेले जहांगीर पंडोल यांचा मृतदेह दक्षिण मुंबईच्या के डूंगरवाडी येथील टॉवर ऑफ सायलेन्समध्ये सोडण्यात आला. त्यांच्या कुटुंबाने पारंपारिक पद्धतीने अंत्यसंस्कार केले. 2015 पासून पारसी समुदायाच्या अंत्यसंस्काराच्या पद्धतीत बदल झालाय.