काय आहे सोहराबुद्दीन चकमक प्रकरण?

सोहराबुद्दीन शेख चकमक प्रकरणातील सर्व 22 आरोपींची निर्दोष मुक्तता सीबीआयच्या विशेष कोर्टाने केली. सर्व 210 साक्षीदार फितूर झाले असून, समाधानकारक पुरावे नाहीत, असे नमूद करुन कोर्टाने आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. काय आहे सोहराबुद्दीन चकमक प्रकरण? सोहराबुद्दीन चकमक प्रकरण गुजरातमधील अहमादाबादेतील आहे. सोहराबुद्दीन शेख आणि त्याची पत्नी कौसर बी यांना कथित बनावट चकमकीत ठार करण्यात […]

काय आहे सोहराबुद्दीन चकमक प्रकरण?
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:48 PM

सोहराबुद्दीन शेख चकमक प्रकरणातील सर्व 22 आरोपींची निर्दोष मुक्तता सीबीआयच्या विशेष कोर्टाने केली. सर्व 210 साक्षीदार फितूर झाले असून, समाधानकारक पुरावे नाहीत, असे नमूद करुन कोर्टाने आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे.

काय आहे सोहराबुद्दीन चकमक प्रकरण?

सोहराबुद्दीन चकमक प्रकरण गुजरातमधील अहमादाबादेतील आहे. सोहराबुद्दीन शेख आणि त्याची पत्नी कौसर बी यांना कथित बनावट चकमकीत ठार करण्यात आलं होतं. अहमदाबादच्या विशाला सर्कलजवळच्या टोलनाक्यावर 26 नोव्हेंबर 2005 रोजी हा घटना घडली होती. इतकंच नाही तर या प्रकरणातील साक्षीदार  आणि सोहराबुद्दीनचा मित्र तुलसीराम प्रजापतीला वर्षभरानंतर 27 डिसेंबर 2006 रोजी, गुजरात-राजस्थान सीमेजवळ चापरी इथे कथित बनावट चकमकीत ठार केलं होतं. मात्र या सर्व हत्या गुजरात एटीएसने राजकीय दबावात केल्याचा आरोप होता. त्यामुळेच गुजरात सीआयडीकडून हा तपास 2012 मध्ये सीबीआयकडे सोपवण्यात आला. त्यानंतर या खटल्याची निष्पक्ष सुनावणी व्हावी यासाठी सर्वोच्च न्यायालयाने गुजरातमधील हे प्रकरण महाराष्ट्रातील न्यायालयात वर्ग केलं होतं.

38 जणांविरोधात आरोपपत्र

सीबीआयने तपासानंतर 38 आरोपींविरोधात आरोपपत्र दाखल केलं होतं. यामध्ये भाजपचे विद्यमान अध्यक्ष अमित शाह, गुजरात एटीएसचे तात्कालीन प्रमुख डी.जी. वंझारा यांच्यासह अनेक बड्या व्यक्तींच्या अधिकाऱ्यांच्या नावाचा समावेश होता. मात्र खटल्यादरम्यान अमित शहा आणि वंझारा यांच्यासह एकूण 16 आरोपींना पुराव्याअभावी कोर्टाने निर्दोष मुक्त केलं.

उर्वरित 22 जणांचं भवितव्य

16 जणांना निर्दोष मुक्त केल्यानंतर, उरलेल्या 22 आरोपींविरोधात खटला सुरु होता, ज्याचा निकाल आज लागला. या 22 जणांमध्ये गुजरात आणि राजस्थान पोलीस दलातील अधिकाऱ्यांचा समावेश होता. सीबीआयने जवळपास 210 साक्षीदारांची साक्ष नोंदवली होती, मात्र यापूर्वी 92 जणांनी आपली साक्ष फिरवली होती.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.