हिजाब आणि बुरखा यांच्यात काय फरक आहे? मराठी मुली पण हिजाब घालतात? खरंच?

What is Hijab : वाद ताणला जात असताना काही ठिकाणी 'पेहले हिजाब बाद मे किताब' असेही पोस्टर व्हायरल झाले आहेत. त्यामुळे हिजाबबाबतचे समज गैरसमज सगळ्यात आधी दूर करणं गरजेचं आहे.

हिजाब आणि बुरखा यांच्यात काय फरक आहे? मराठी मुली पण हिजाब घालतात? खरंच?
हिजाबवर या देशात बंदी
Follow us
| Updated on: Feb 09, 2022 | 9:00 PM

मुंबई : भाजपची सत्ता असलेल्या कर्नाटकात हिजाबचा वाद (Karnataka Hijab Controvercy) सुरु झाला. याच वादात मंगळवारी आगीत तेल ओतणारी घटना घडली. मुस्कान खान (Muskan Khan) या मुलीला झालेल्या विरोधाची, तिच्यासमोर देण्यात आलेल्या जय श्रीराम घोषणांची. त्यानंतर मुस्काननंही दिलेल्या अल्ला हू अकबरच्या घोषणेचीही चर्चा रंगली होती. या घोषणा दिल्या म्हणून मुस्कानला पाच लाख रुपयांचं बक्षिसही देण्यात आलं. एकूणच हिजाबविरोधात सुरु झालेला हा संघर्ष टोकाला जाताना पाहायला मिळतोय. आगामी पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका आणि निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर (5 State assembly election 2022) सुरु झालेली हिंदू मुस्लिम यातील तेढ वाढवण्याच्या हेतूनं जाणीवपूर्वक हा वाद ताणला गेलाय का? असा प्रश्नदेखील उपस्थित झाला.

या संपूर्ण वादाच्या पार्श्वभूमीवर हिजाब या शब्दाचा नेमका अर्थ काय, हे समजून घ्यायलं हवं. कारण आता हा वाद ताणला जात असताना काही ठिकाणी ‘पेहले हिजाब बाद मे किताब’ असेही पोस्टर व्हायरल झाले आहेत. त्यामुळे हिजाबबाबतचे समज गैरसमज सगळ्यात आधी दूर करणं गरजेचं आहे.

हिजाब म्हणजे काय? बुरखा आणि हिजाब वेगवेगळा असतो?

हिबाज आणि बुरका यांच्या तसं पाहायला गेलं तर फारसा फरक नाही. पण मुलभूत फरक आहे. हिजाब म्हणजे फक्त चेहरा झाकण्यासाठी वापरलेली गोष्ट तर बुरखा म्हणजे संपूर्ण शरीर झाकलं जाईल अशी गोष्ट. हिजाब हा बुरख्याचा एक भाग आहे, अशी माहिती ज्येष्ठ पत्रकार अमर हबीब यांनी दिली आहे. कोणत्याही परपुरुषाची नजर आपल्यावर पडू नये, परपुरुष महिलांकडे पाहून उत्तेजीत होऊ नये, यासाठी बुरखा घालण्याची प्रथा सुरु झाली, असंही बोललं जातं.

मराठी मुलीही हिजाब घालतात?

हिजाबला इंग्रजी शब्द द्यायचा झाला, तर त्याला थेट स्कार्फ म्हणता येईल. फक्त मराठीच नव्हे तर अलिकडच्या काळात मुलींकडून स्कार्फचा सर्रार वापर केला जात असल्याचं दिसून आलेलं आहे. यात काही फक्त मराठी मुलीच आहेत, अशातला भाग नव्हे. तरुणींमध्ये, स्त्रियांमध्ये स्कार्फ तोंड झाकण्यासाठी वापरला जातो. त्याचा वापर आता एकदम स्वीकारलाही गेलेला आहे. हिजाबलाच स्कार्फही म्हणता येऊ शकेल किंवा स्कार्फला हिजाबही म्हणता येऊ शकेल. फक्त चेहरा झाकण्यासाठी वापरलेली गोष्ट म्हणजे हिजाब. त्यामुळे हिजाब वापरणाऱ्या मुली या सरकट मुस्लिमच असतात, असंही म्हणणं चुकीच ठरणार आहे. याच हिजाबला घुंघट असं म्हटलं, तर वावगं ठरु नये, असही ज्येष्ठ पत्रकार अमर हबीब यांनी म्हटलंय.

कुणी काय घालायचं, हे ठरवण्याचा अधिकार ज्याचा त्याला!

हिजाब विरुद्ध भगवा असा वाद पेटलेला असतानाच काँग्रेसही चर्चेत आली. त्याला कारण ठरलं प्रियंका गांधींनी केलेलं ट्वीट! बिकिनी असो की घुंगट, जीन्स असो की हिजाब, काय परिधान करायचं, हे ठरण्याचा अधिकार स्त्रीला आहे. संविधानानं दिलेला हा ‘गॅरंटीड’ अधिकार आहे. त्यामुळे महिलांचं शोषण करणं थांबवा, असं ट्वीट प्रियंका गांधी वाड्रा (Tweet of Priyanka Gandhi Vadra) यांनी केलं होतं. #ladkihoonladsaktihoon अर्थात मी मुलींसोबत आहे, असं प्रियंका गांधी यांनी म्हटलं. पण त्यांनी केलेल्या हॅशटॅगऐवजी भलताच टॅग ट्रेन्ड होऊ लागला. #Bikini हा ट्रेन्ड या सगळ्या वादावरुन सुरु झाला आणि त्यावरुन एक वेगळीच चर्चा पुन्हा एकदा सुरु झाली. पण मुळात कुणी काय कपडे घालायचे, याचं स्वातंत्र्य देण्याचा मुद्दा मागे पडला!

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वातावरण तापलं की तापवलं गेलं?

खरंतर जानेवारीत उडुपीच्या एका सरकारी महाविद्यालयात सहा विद्यार्थीनींना हिजाब घालून महाविद्यालयात येण्यास मज्जाव करण्यात आला होता. मात्र, महाविद्यालयाने परवानगी दिली नाही असं सांगितलं गेलं. त्यानंतर हा ट्रेंड निघून गेला. तसेच दुसऱ्या महाविद्यालयातही विद्यार्थीनी हिजाब घालून जाऊ लागल्या. त्याला विरोध म्हणून काही विद्यार्थीनींनी भगवा स्कार्फ घालून महाविद्यालयात जायला सुरवात केली. त्यानंतर त्याला राजकीय वळण मिळालं आणि वादाला सुरुवात झाली. दरम्यान, आता ऐन पाच राज्यांच्या निवडणुकांच्या तोंडावर भाजपची सत्ता असलेल्या कर्नाटकामध्येच हा वाद पेटला. त्याचे पडसाद देशभरात उमटायला सुरुवात झाली आहे. उत्तर प्रदेशसह गोवा, पंजाब, उत्तराखंड आणि मणिपूरच्या निवडणुकांना डोळ्यांसमोर ठेवून जाणीवपूर्वक हा वाद तापवण्यात आला, अशीही चर्चा यानिमित्तानं रंगवली जाते आहे.

पाहा व्हिडीओ :

संबंधित बातम्या :

बिकिनी असो की घुंगट! अल्लाहू अकबर म्हणणाऱ्या मुलीच्या समर्थनात प्रियंका गांधींचं ट्विट, ट्विटरवर #Bikiniचा पूर

PHOTO | कर्नाटकच्या # Hijab घटनेचे पडसाद महाराष्ट्रात, बीड, लातूर, नांदेड, सोलापुरात निदर्शनं, स्थिती नियंत्रणात!

Photo Story: हिजाबचा हिसाब 2024ला करणार, कर्नाटकातील हिजाब वादाचे सोलापुरात पडसाद; चक्काजाम

Non Stop LIVE Update
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला.
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका.
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं..
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं...
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद.
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्.
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?.
पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य
पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य.