National Maritime Day : व्यापाराला नवसंजीवनी देणारा दिवस, राष्ट्रीय नौकानयन दिनाचा जाणून घ्या इतिहास?

दळवळणासाठी केवळ रस्ते, हवाई मार्ग एवढेच पुरेसे नाही. व्यापार हे देशाचं जीवनदायी रक्तच आहे त्यानुसार काळाच्या ओघात त्याची व्याप्ती होणेही तेवढेच गरजेचे आहे. याच दळवळणाच्या दृष्टीकोनातून 5 एप्रिला एक वेगळेच महत्व आहे. 103 वर्षापूर्वी याच दिवशी भारतीय मालकीच्या सिंदिया शिपिंग कंपनीची बोट मुंबईहून इंग्लडला निघाली होती. तेव्हापासून आधुनिक भारतामधले मर्चंट नेव्ही सुरु झालं होत. ही घटना 1919 ची असली तरी 1964 पासून हा राष्ट्रीय सागर दिन म्हणून साजरा केला जात आहे.मात्र, या सिंदिया शिपचे अस्तित्वच संपवण्याचा प्रयत्न ब्रिटीश शिपिंग कंपन्यांनी त्यांच्या सरकारच्या माध्यमातून केला होता.

National Maritime Day : व्यापाराला नवसंजीवनी देणारा दिवस, राष्ट्रीय नौकानयन दिनाचा जाणून घ्या इतिहास?
नौकानयन
Follow us
| Updated on: Apr 05, 2022 | 5:20 AM

मुंबई : दळवळणासाठी केवळ रस्ते, हवाई मार्ग एवढेच पुरेसे नाही. व्यापार हे देशाचं जीवनदायी रक्तच आहे त्यानुसार काळाच्या ओघात त्याची व्याप्ती होणेही तेवढेच गरजेचे आहे. याच दळवळणाच्या दृष्टीकोनातून 5 एप्रिला एक वेगळेच महत्व आहे. 103 वर्षापूर्वी याच दिवशी भारतीय मालकीच्या (Scindia Shipping) सिंदिया शिपिंग कंपनीची बोट मुंबईहून इंग्लडला निघाली होती. तेव्हापासून आधुनिक भारतामधले (Merchant Navy) मर्चंट नेव्ही सुरु झालं होत. ही घटना 1919 ची असली तरी 1964 पासून हा (National Maritime Day) राष्ट्रीय सागर दिन म्हणून साजरा केला जात आहे.मात्र, या सिंदिया शिपचे अस्तित्वच संपवण्याचा प्रयत्न ब्रिटीश शिपिंग कंपन्यांनी त्यांच्या सरकारच्या माध्यमातून केला होता. आणि तेथेच अस्तित्वाचा लढा सुरु झाला. हा इतिहास असला तरी देशाला लाभलेला समुद्र किनारा आणि या माध्यमातून होणारी आयात-निर्यात देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना देणारी आहे. या राष्ट्रीय नौकानयनाचे महत्व सर्वसामान्यांपर्यंत पोहचले नसले तरी हा दिवस देशाच्या अर्थकारणाच्या दृष्टीने महत्वाचा आहे.

म्हणून हा दिवस साजरा केला जातो

भारताच्या पूर्व किनार्‍यावरील चोल आणि पांड्य, पश्चिम किनार्‍यावरील चेर, विजयनगर आणि हिंदवी स्वराज्य या सागरी सत्तांच्या अस्तानंतर उदयाला आलेली पहिली संघटित व्यापारी पूर्णपणे भारतीय कंपनी आहे. या कंपनीचं पहिलं जहाज ‘सिंदिया शिपिंग’ 5 एप्रिल 1919 रोजी मुंबईहून लंडनकडे माल घेऊन निघाले होते. मात्र, याला ब्रिटिश शिपिंग कंपनीने विरोध केला होता. असे असताना त्यांच्या नाकावर टिच्चून एक भारतीय कंपनी जहाज ही मार्गस्थ झाली होती. याच दिवसाचे औचित्य साधून 5 एप्रिल हा ‘राष्ट्रीय नौकानयन दिवस’ सजरा केला जात आहे.

आयात-निर्यातीवरच देशाच अस्तित्व अवलंबून

देशातील आयात-निर्यात ही अखंड सुरु राहणारी प्रक्रिया आहे. याचे वेळोवेळी महत्व यापूर्वीही निदर्शनास आले होते. याच नौकानयनाच्या माध्यमातून 1960-70 या दशकामध्ये भारताला गहू आणि इतर धान्याची आयात करावी लागली होती. त्यावेळी याच व्यापारी जहाजांनी महत्वाची भूमिका पार पाडली होती.एवढेच काय अन्नधान्य थेट पोहचवलं गेल्याने याला ‘शिप टू माऊथ’ असंही संबोधले गेले होते. एकंदरीत ज्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात अन्नधान्यासह इतर साहित्य आणि अर्थकारणाला बळकटी देणाऱ्या वस्तूंची आयात-निर्यात केली जाणारा हा दिवस असून याचे महत्व प्रत्येकाला माहिती असणे गरजेचे आहे.

नौदलाच्या शिक्षणाला वेगळे महत्व

बोटीवर काम करताना विविध देशातल्या इमिग्रेशन, कस्टम, पोर्ट हेल्थ, एजंट, चार्टरर अशा अनेक लोकांशी संबंध येत असतो. भारतीय वकिलातीत जाण्याचे प्रसंग येतात. तिथल्या फर्स्ट सेक्रेटरीपासून कॉन्सल, राजदुताशी गाठीभेटी होतात. त्यामधून शिकायला तर मिळतंच, पण आपलं जीवन समृद्धही होतं. बोटी महासागरातून नेण्या-आणण्यासाठी नौकानयन करू शकणारे प्रशिक्षित नाविक लागतात. त्यांना शिक्षण देणाऱ्या नॉटिकल अकॅडमी- नेव्हिगेशन स्कुल असतात. त्यात प्रवेश मिळवायला स्पर्धा परीक्षा द्याव्या लागतात.

भारत एक ‘दर्यावर्दी’ देश

भारत देशाला मोठ्या प्रमाणात समुद्र किनारा लाभलेला आहे. देशाच्या पूर्व-पश्चिम किनारपट्टीची लांबी आहे 7 हजार 516 किलोमीटर आहे. आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार, प्रत्येक स्वतंत्र आणि सार्वभौम देशाचा, त्याच्या किनार्‍यापासून पुढे 200 सागरी मैल इतक्या अंतरापर्यंतचा, समुद्रातला आणि हवेतला प्रदेश हा रीतसर त्या देशाच्या मालकीचा असतो. त्या अनुशंगाने भारताची एकंदर किनारपट्टी 23 लाख, 5 हजार, 143 चौ.किमी इतक्या लांबीची आहे. म्हणजेच भारत हा एक ‘दर्यावर्दी’ देश आहे; तरीही आज भारताच्या जनमानसात सर्वात दुर्लक्षित विषय जर कोणता असेल, तर तो म्हणजे नौकानयन. आज अत्याधुनिक जगात व्यापारी माल वाहतुकीसाठी रेल्वे, रस्ते आणि विमानसेवा उपलब्ध आहे. त्या मार्गांनी मालवाहतूक होतेदेखील. पण, सर्वात स्वस्त वाहतूक म्हणजे नौकानयनच्या माध्यमातूनच होत आहे.

इतर बातम्या :

मोठी बातमी! पाकिस्तानची बोट भारताच्या हद्दीत घुसली, BSF जवानांकडून बोट जप्त

हिजाब परिधान करणाऱ्यांची परीक्षेच्या कामांपासून मुक्तता, कर्नाटक सरकारचा मोठा निर्णय

मोठी घोषणा, एचडीएफसी आणि HDFC बँकेच्या विलीनीकरणास मान्यता, काय होणार परिणाम?

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.