मोदींच्या दाढी वाढवण्याचं रहस्य काय?; साडे तीन वर्षे दाढी अशीच ठेवणार?
कोरोनाच्या संकटामुळे संपूर्ण देशातील व्यवहार बंद होते. त्यामुळे अनेकांना दाढी-कटींग करता आली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही दाढी केली नव्हती. (what is The Secret Behind PM Narendra Modi's Full-Grown, White Bushy Beard)
नवी दिल्ली: कोरोनाच्या संकटामुळे संपूर्ण देशातील व्यवहार बंद होते. त्यामुळे अनेकांना दाढी-कटींग करता आली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही दाढी केली नव्हती. मात्र, आता सर्व व्यवहार सुरू झालेले असतानाही मोदींनी दाढी केलेली नाही. उलट मोदी दाढी वाढवत असल्याचं दिसत असून मोदी दाढी का वाढवत आहेत? असा प्रश्न भल्याभल्यांना पडला आहे. (what is The Secret Behind PM Narendra Modi’s Full-Grown, White Bushy Beard)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरुवातीला जनता कर्फ्यूची घोषणा केली तेव्हा त्यांची दाढी नेहमीप्रमाणेच होती. त्यानंतर तीन महिन्यानंतर ते जनतेसमोर आले तेव्हा त्यांची दाढी खूपच वाढलेली होती. आताही त्यांची दाढी खूपच वाढलेली आहे. त्यामुळे अनेक प्रकारच्या चर्चाही रंगल्या आहेत. पश्चिम बंगाल विधानसभेच्या निवडणुका असल्याने राज्यातील जनतेशी भावनात्मकपणे जोडले जावे म्हणून मोदी दाढी करत नसल्याचीही चर्चा आहे.
राम मंदिराशी संबंध?
अनेकजण त्यांच्या दाढी वाढवण्याबाबतची वेगवेगळी कारणे सांगत आहेत. कर्नाटकाच्या उड्डपी पीजवारा पीठाचे अध्यक्ष स्वामी विश्वप्रसन्ना तिर्थ यांनी त्यावर भाष्य केलं आहे. ‘टीव्ही 9 कन्नड’ने दिलेल्या वृत्तानुसार, स्वामी विश्वप्रसन्ना तिर्थ यांनी मोदींच्या दाढी वाढवण्याचा संबंध राम मंदिराशी जोडला आहे. ही सनातन धर्माची परंपरा असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. पण त्याला अद्याप कुणीही पृष्टी दिलेली नाही. राम मंदिर उभारणं हे भाजपचं स्वप्न होतं. कोर्टाने त्याला परवानगीही दिली. त्यानंतर राम मंदिर उभारण्याचा शिलान्यासही केला गेला. मोदींच्या हस्ते हे भूमिपूजन करण्यात आले.
मंदिरासाठी साडे तीन वर्षे लागणार
अयोध्येत राम मंदिर उभारण्यासाठी सुमारे साडेतीन वर्षे लागणार आहेत. मंदिराच्या डिझाईनमध्ये बदल सूचवण्यात आल्याने हा कालावधी आणखीही वाढू शकतो. मोदींच्या दाढी वाढवण्यामागे राम मंदिर हे कारण असेल तर मग मोदी साडे तीन वर्षे दाढी कापणार नाहीत का? अशीही चर्चा रंगली आहे. मोदींनी राम मंदिराचा शिलान्यास केला आहे. त्यामुळे मंदिर पूर्ण करण्याची त्यांच्यावर जबाबदारी आहे. त्यामुळे सनातन धर्माच्या परंपरेनुसार तोपर्यंत त्यांना केस कापता येणार नाही, असं स्वामींचं म्हणणं आहे.
दाढी-कटींग वाढवण्यामागची धार्मिक मान्यता काय?
सनातन धर्मानुसार दाढी-कटींग वाढण्यामागे काही धार्मिक मान्यता आहेत. याबाबत काशीचे पंडित दयानंद पांडेय यांनी मोदींच्या दाढी वाढवण्यामागच्या कारणांचा खुलासा केला नाही. मात्र, दाढी-कटींग वाढवण्या मागच्या धार्मिक परंपरा सांगितल्या. सनातन परंपरेनुसार अनेकदा एखादा महायज्ञ किंवा मोठ्या योजनेसाठी घर किंवा समाजातील प्रमुखय व्यक्ती संकल्प करत असतो. हा संकल्प पूर्ण होईपर्यंत तो केस कापत नाही. प्रयोजन किंवा महायज्ञ पूर्ण झाल्यावर तो केस कापतो आणि गंगेला अर्पण करत असतो, असं पांडेय यांनी सांगितलं.
हिंदूधर्मातील अन्य परंपरा
हिंदू धर्मात केस दान करण्याच्याही परंपरा आहेत. दक्षिण भारतात महिलाही काशीला येऊन मुंडन करून केस दान करतात. धार्मिक मान्यतेनुसार आपल्या प्रिय गोष्टींचं दान करायचं असतं आणि महिलांच्या सौंदर्येसाठी केसं महत्त्वाचे असतात. केसांना ईश्वराने दिलेली देणगी मानली जाते. तो निसर्गाचा शृंगार असतो. महिलांना त्यांचे केस अधिक प्रिय असतात म्हणून त्या दान करतात, असंही त्यांनी सांगितलं. (what is The Secret Behind PM Narendra Modi’s Full-Grown, White Bushy Beard)
VIDEO | 36 जिल्हे 72 बातम्या | 29 December 2020 https://t.co/r7SRrJj87P @CMOMaharashtra #fastnews #TopNews
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 29, 2020
संबंधित बातम्या:
काँग्रेसने सन्मानजनक जागा न दिल्यास नागपुरात स्वबळावर, राष्ट्रवादीचा इशारा
शरद पवारांची केंद्र सरकारला डेडलाईन; शेतकरी आंदोलनावर तोडगा काढा नाही तर…
शेतकरी आंदोलन भरात असताना राहुल गांधी इटलीला का गेले? वाचा काँग्रेस काय म्हणतेय?
(what is The Secret Behind PM Narendra Modi’s Full-Grown, White Bushy Beard)