Corruption case: कोट्यवधींच्या भ्रष्टाचार प्रकरणात अर्पिता मुखर्जीची भूमिका काय होता? पार्थ चॅटर्जी तिला नाचवत होते की स्वत:च होती मास्टरमाईंड?
2012 साली जर अर्पिता पार्थ यांच्या संपर्कात आली असल्याचे मान्य केले, तर त्याचवेळी तिने एवढा महागडा फ्लॅट कसा घेतला, हाही प्रश्न आहे. अर्पिता केवळ नीकटवर्तीय आहे म्हणून तिच्या फ्लॅटमध्ये 50 कोटी मिळाले का, असाही प्रश्न विचारण्यात येतो आहे. यामागे आणखी काही गुपिते आहेत का, हा प्रश्न आहे. या प्रश्नांची उत्तरे येत्या काळातील तपासातच मिळणार आहेत.

कोलकाता – प. बंगालच्या (W. bangal)कोट्यवधींच्या शिक्षक भरती भ्रष्टाचार प्रकरणात, उद्योगमंत्री पार्थ चॅटर्जी (Parth Chaterjee)यांना अटक करण्यात आली आहे. त्यांची नीकटवर्तीय अभिनेत्री अर्पिता मुखर्जी (Arpita Mukherjee)हिलाही या प्रकरणात अटक करण्यात आलीये. या सगळ्या प्रकरणात अर्पिताचा रोल काय होता, याची उत्सुकता सगळ्यांनाच आहे. ती या प्रकरणात पार्थ चॅटर्जीं यांची कठपुतली होती की पार्थ चॅटर्जी यांना तीच नाचवत होती, असा प्रश्न पडला आहे. सध्या ईडीच्या ताब्यात असलेल्या अर्पिताची आत्तापर्यंत ईडीने अनेकदा चौकशी केली आहे. अर्पिताचा या प्रकरणात काय रोल होता, याबाबत ईडीच्या अधिकाऱ्यांच्या मनात अनेक शंका आहेत. अर्पिताच्या अनेक बनावट कंपन्या असल्याची माहिती ईडीला यापूर्वीच होती, अशी माहिती आहे. अर्पिताने अनेकदा परदेश दौरे केले असल्याचीही नोंद आहे. यात सिंगापूर, मलेशिया, थायलंड सारख्या देशांचा समावेश आहे. अर्पिताच्या घरातून जे ५० कोटी रुपये जप्त करण्यात आले आहेत, ते पैसे तिचे नाहीत, असा दावा तिने याआधीच केला आहे. तिने याचा चेंडू पार्थ यांच्या कोर्टात टाकून दिला आहे. ते पैसे आपले नसल्याचे सांगतानाच, ती पार्थ यांच्या मिनी बँकेत काम करत असल्याचेही तिने सांगितले होते.
अर्पिताच्या नावे अनेक बनावट कंपन्या
अर्पिता या भ्रष्टाचार प्रकरणात काळे पैसे पांढरे करण्याचे काम करीत होती का, असा प्रश्न विचारला जातो आहे. तपास जसजसा पुढे जातो आहे, ईडीच्या अधिकाऱ्यांचा याबाबतचा संशय बळावत चालला आहे. सुरुवातीच्या काळात पार्थ चॅटर्जी यांच्यासारख्या प्रभावशाली नेत्याची कठपुतली असल्याचे ती भासवत होती. मात्र जसजसा तपास पुढे जाऊ लागला आणि तसतसा हा तर्क मागे पडत असल्याचे अधिकाऱ्यांच्या लक्षात आले. अर्पिताच्या तीन कंपन्यांचा आता शोध घेण्यात येतो आहे. यातल्या दोन कंपन्यांची ती संचालक आहे. पार्थ यांना 2012 पासून ओळखते असा अर्पिताचा दावा आहे. ज्या कंपन्या आता समोर आल्या आहेत, त्यातील एका कंपनीशी तिच्या ड्रायव्हरचे नाव जोडलेले आहे. तर दुसऱ्या कंपनीत तिचा चपरासी संचालकपदी आहे.



2012 सालीच अर्पिताच्या नावे कंपन्या
या तपासानंतर आणखी तीन नव्या कंपन्यांची नावे समोर आली आहेत. यातील एक अर्पिताच्या बेलघरिया येथील घराच्या पत्त्यावर आहेत. अर्पिताचा या कंपन्यांशी संबंध नसला तरी कंपनीसाठी काही अर्पिताची कागदपत्रे वापरली गेली असल्याची शक्यता आहे. ही कंपनी 2012 साली स्थापन करण्यात आलेली आहे. 2012 साली जर अर्पिता पार्थ यांच्या संपर्कात आली असल्याचे मान्य केले, तर त्याचवेळी तिने एवढा महागडा फ्लॅट कसा घेतला, हाही प्रश्न आहे. अर्पिता केवळ नीकटवर्तीय आहे म्हणून तिच्या फ्लॅटमध्ये 50 कोटी मिळाले का, असाही प्रश्न विचारण्यात येतो आहे. यामागे आणखी काही गुपिते आहेत का, हा प्रश्न आहे. या प्रश्नांची उत्तरे येत्या काळातील तपासातच मिळणार आहेत.