Kargil Vijay Diwas 2022: अटलबिहारी वाजपेयींनी 22 दिवसांपूर्वीच पाकिस्तानवर विजयाची घोषणा केली होती…

कारगिल विजय साजरा केला जात असला तरी 60 दिवस हा चाललेला संघर्ष मे 1999 मध्ये सुरू झाला आणि जुलै महिन्यामध्ये संपला. द्रासमध्ये, जिथे युद्ध लढले जात होते, त्यावेळी तेथील तापमान होते -10 अंशांच्या खाली. ताशी नामग्याल या मेंढ्या पाळणाऱ्याने 3 मे 1999 रोजी लष्कराला पाकिस्तानकडून होणाऱ्या घुसखोरीची माहिती दिली होती.

Kargil Vijay Diwas 2022: अटलबिहारी वाजपेयींनी 22 दिवसांपूर्वीच पाकिस्तानवर विजयाची घोषणा केली होती...
Follow us
| Updated on: Jul 26, 2022 | 5:01 AM

नवी दिल्ली: कारगिल युद्धाला (Kargil War) आज 23 वर्षे पूर्ण होत आहेत. या दिवशी, 26 जुलै 1999 रोजी (26 July 1999) कारगिल, जम्मू आणि काश्मीरमध्ये भारताच्या विजयाच्या घोषणा दुमदुमून गेल्या. दरवर्षी 26 जुलै हा दिवस देशात विजय दिवस साजरा केला जातो पण तुम्हाला माहित आहे का की त्यावेळी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी (Prime Minister Atal Bihari Vajpayee) यांनी 4 जुलै रोजीच पाकिस्तानवर विजयाची घोषणा केली होती. काश्मिर खोऱ्यात होणारी घुसखोरी आणि पाकिस्तानकडून खेळले जाणारे डावपेच यामुळेच येथील भारतीय सैन्यांनी जी कामगिरी केली होती, ती भारतीयांसाठी नक्कीच अभिमानस्पदही होती आणि भारताच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून महत्वाचीही होती.

टायगर हिलवर ऑपरेशन सुरू

भारतीय सैन्याने 3 जुलै 1999 च्या संध्याकाळी, टायगर हिलला शत्रूपासून वाचवण्यासाठी ऑपरेशन सुरू केले. त्याच्या दुसऱ्या दिवशी हरियाणामध्ये पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची एक रॅली होती, त्या रॅलीमध्ये वाजपेयी संबोधित करणार होते. आणि त्या रॅलीतच पंतप्रधान वाजपेयीं यांनी लष्कराच्या यशाचा विजय घोषित केला. भारतीय सैन्य अधिकारी ब्रिगेडियर (निवृत्त) एमपीएस बाजवा तेव्हा लष्कराच्या 192 व्या माउंटन ब्रिगेडचे नेतृत्व करत होते. त्यावेळी टायगर हिलला वाचवण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती. त्या सभेत वाजपेयी यांनी विजयाची घोषणा केली त्याची आठवण आजही अनेक सैनिक आणि सैन्यअधिकारी काढतात.

भारताला विजय मिळाला

ब्रिगेडियर बाजवा सांगतात की, ‘ त्या परिस्थितीत आम्ही उलटे गेलो असतो तर मोठा पेच निर्माण झाला असता पण आम्ही जिंकलो.’ त्यांनी सांगितले की, ज्या दिवशी वाजपेयींनी विजयाची घोषणा केली, त्याच दिवशी पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी अमेरिकेत तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांची भेट घेतली होती, आणि त्या क्षणापासूनच परिस्थिती बदलली आणि पाकिस्तानने आपले सैन्य मागे घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी 2 लाख भारतीय सैनिकांनी युद्धात भाग घेतला होता. कारगिल युद्धात एकूण 527 भारतीय जवान शहीद झाले होते, आणि त्याचवेळी पाकिस्तानचे 700 सैनिकही मारले गेले.

लाहोर बससेवेसह पाकचा कट

पाकिस्तानने फेब्रुवारी 1999 पासून कारगिल युद्धाची तयारी सुरू केली होती. वाजपेयींनी भारतातून लाहोरला बस सुरू केली होती, मात्र पाकिस्तानातील तत्कालीन लष्करप्रमुख परवेझ मुशर्रफ यांनी आणखी काही कट रचला होता, आणि त्या कटातच ते गुंतले होते. मार्च 1999 मध्ये पाकिस्तानी दहशतवादी काश्मीरच्या काही भागात घुसखोरी करत असल्याची माहिती लष्कराला देण्यात आली होती. आपल्या सैनिकांसोबतच पाकिस्तानकडूनही दहशतवाद्यांनी घुसखोरी केली होती.

आमचे सैनिक -10 अंशात लढत होते

कारगिल विजय साजरा केला जात असला तरी 60 दिवस हा चाललेला संघर्ष मे 1999 मध्ये सुरू झाला आणि जुलै महिन्यामध्ये संपला. द्रासमध्ये, जिथे युद्ध लढले जात होते, त्यावेळी तेथील तापमान होते -10 अंशांच्या खाली. ताशी नामग्याल या मेंढ्या पाळणाऱ्याने 3 मे 1999 रोजी लष्कराला पाकिस्तानकडून होणाऱ्या घुसखोरीची माहिती दिली होती. त्यानंतर नियंत्रण रेषेच्या आत घुसलेल्या दहशतवाद्यांना हटवण्यासाठी लष्कराकडून ऑपरेशन विजय सुरू करण्यात आले, आणि त्या ऑपरेशनवर आपल्या भारतीय सैनिकांनी विजयाची मोहोर उमटवली.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.