2000 Note : 30 सप्टेंबरनंतर तुमच्याकडे 2000 ची नोट मिळाली तर काय होणार?

2000 रुपयांची नोट जमा किंवा बदलण्याची अंतिम मुदत 30 सप्टेंबर 2023 आहे. 30 सप्टेंबरपर्यंतच्या आकडेवारीनुसार सात टक्के नोटा अजूनही चलनात आहेत. जाणून घ्या 30 सप्टेंबरनंतर त्या नोटांचे काय होणार?

2000 Note : 30 सप्टेंबरनंतर तुमच्याकडे 2000 ची नोट मिळाली तर काय होणार?
Follow us
| Updated on: Sep 25, 2023 | 5:19 PM

2000 Note : आरबीआयने 2000 रुपयांची नोट जमा करण्यासाठी सांगितले आहे. यासाठी अंतिम मुदत 30 सप्टेंबर 2023 देण्यात आली आहे. पण जर अजूनही तुम्ही 2000 रुपयांची नोट बँकेत जमा केली नसेल तर तुमच्याकडे अजूनही एक आठवडा आहे. अजूनही 240 अब्ज रुपयांच्या 2,000 रुपयांच्या नोटा चलनात आहेत. आरबीआयच्या माहितीनुसार, १ मे पर्यंतच्या आकडेवारीनुसार, चलनातून २,००० रुपयांच्या एकूण ९३ टक्के नोटा बँकांकडे परत आल्या आहेत. RBI ने 19 मे 2023 रोजी 2000 रुपयांची नोट चलनातून काढून घेण्याची घोषणा केली होती. 30 सप्टेंबर 2023 पर्यंत 2,000 हजार रुपयांच्या नोटा बँकांमध्ये जमा कराव्यात किंवा त्या इतर मूल्यांच्या नोटांसह बदलून घ्याव्यात.

30 सप्टेंबर नंतर दोन हजाराची नोट मिळाली तर काय होईल.

नोव्हेंबर 2016 मध्ये नोटाबंदीनंतर 2000 रुपयांची नोट चलनात आली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याची घोषणा केली होती. पण मे महिन्यात आरबीआयने 2000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याची घोषणा केली होती. लोक बँकेत जाऊन त्यांच्या खात्यात 2000 रुपयांची नोट जमा करू शकतात. नोटा कोणत्याही बँकेत बदलता येणार आहेत. आरबीआयसह देशातील सर्व बँकांमध्ये नोट बदलण्याची सुविधा उपलब्ध आहे. 2,000 रुपयांची नोट बँक खात्यात जमा करण्यासाठी केवायसी फॉर्म आवश्यक असू शकतो.

दोन हजार रुपयांची नोट जमा नाही केली तर?

30 सप्टेंबरपर्यंत 2,000 रुपयांची नोट बदलून न घेतल्यास काय होईल, हा प्रश्न अनेकांना आहे. तुमची 2000 रुपयांची नोट 30 सप्टेंबरनंतर फक्त एक कागद राहिल का? 30 सप्टेंबरनंतर ती बँकांमध्ये जमा करता येणार नाही. देवाणघेवाणही करता येणार नाही. ती फक्त आरबीआयमध्ये बदलता येईल. तुम्ही ती वेळेत का बदलून घेतली नाही याचे स्पष्टीकरण द्यावे लागू शकते.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.