भारताने मालदीवमध्ये निर्यात थांबवली तर काय होईल? पाहा भारत कोणत्या गोष्टी पुरवतो
भारत आणि मालदीव या दोन्ही देशांमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये संबंध बिघडले आहेत. मालदीवच्या राष्ट्राध्यक्ष मुइज्जू हे चीन समर्थक असल्याने ते भारतासोबत पंगा घेण्याची हिमंत दाखवत आहे. पण असं असलं तरी भारताशिवाय त्यांचं पान देखील हालू शकत नाही. कारण अनेक महत्त्वाच्या गोष्टी भारत त्यांना पुरवतो.
India-Maldive row : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लक्षद्वीपला भेटीवर मालदीवच्या तीन मंत्र्यानी आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. मोदींनी या दरम्यान अनेक सुंदर फोटो शेअर करत भारतीय लोकांना लक्षद्वीपला भेट देण्याचे आवाहन केले होते. मालदीवच्या तीन मंत्र्यांना मोदींच्या या पोस्टवर आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे निलंबित करण्यात आले होते. या नंतर मालदीव आणि भारत यांच्यातील संबंध बिघडले होते. त्यानंतर मालदीवमध्ये सत्तेत आलेले मोहम्मद मुइज्जू यांनी देखील भारताच्या विरुद्ध भूमिका घेण्यास सुरुवात केली. ते चीन समर्थक असल्याने लगेचच त्यांनी चीनचा दौरा देखील केला होता.
मालदीव सरकारने यानंतर त्यांच्या देशात तैनात असलेल्या भारतीय जवानांना माघारी बोलवण्याची घोषणा केली केली. सोबत त्यांनी भारतासोबचा करार ही रद्द केला. त्यामुळे आता ते चीनच्या समर्थक असल्याचे स्पष्ट झाले. चीनकडून घेतलेले कर्ज परतफेड करण्यासाठी मुदत मिळावी म्हणून त्यांनी चीनला विनंती केली आहे.
मालदीवच्या या भूमिकेमुळे भारतीय पर्यटकांनी मालदीववर बहिष्कार टाकला. मालदीवमध्ये येणारे सर्वाधिक पर्यटक हे भारतीय होते. पण यानंतर मालदीवला मोठा धक्का बसला. कारण मालदीवची अर्थव्यवस्था पर्यटनावर अवलंबून आहे. मालदीवच्या पर्यटन मंत्र्यांनी यानंतर आता भारतीयांना मालदीवमध्ये येण्याचे आवाहन केले आहे.
2021 आणि 2022 भारतीय पर्यटकांनी मालदीवमध्ये विक्रमी नोंद केली होती. पण २०२४ मध्ये बहिष्काराचा मोठा परिणाम झाला. भारत मालदीवची सर्वात मोठी पर्यटन बाजारपेठ होती आणि एकूण पर्यटकांमध्ये भारताचे योगदान अंदाजे 23% होते.
मालदीवमध्ये भारतीय किती पैसे खर्च करतात?
मालदीवमध्ये जाणारा प्रत्येक भारतीय पर्यटक 2 रात्र आणि 3 दिवसांचे पॅकेज जर घेत असेल तर तो सरासरी मालदीवमध्ये 1 लाख रुपये खर्च करतो. त्यामुळे 2023 च्या आकडेवारीनुसार भारतीय पर्यटकांनी मालदीवमध्ये सुमारे 29 अब्ज रुपये खर्च केले आहेत.
भारत कशी मदत करतो?
परराष्ट्र मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, मालदीवच्या पर्यटन उद्योगाला चालना देण्यासाठी भारत तेथील 34 बेटांवर पाणी आणि स्वच्छतेशी संबंधित अनेक प्रकल्प राबवत आहे. भारताने मालदीवच्या मागील सरकारसोबत तेथील आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी विकास करारही केला होता. लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टरही देण्यात आले होते.
मालदीवच्या पर्यटन उद्योगात भारतीय कामगारांची संख्या चांगली आहे. भारत तंत्रज्ञ ते अभियंता, व्यवस्थापक, लेखापाल अशा पदांवर काम करत आहेत. भारतातील अनेक बांधकाम कंपन्या तेथे विविध कामांमध्ये गुंतलेल्या आहेत.
भारत कोणत्या जीवनावश्यक वस्तू पुरवतो
2013-14 ते 2022-23 दरम्यान, भारताने मालदीवमध्ये 2.6 अब्ज डॉलर्सच्या मालाची निर्यात केली आहे. तर तिथून 644 दशलक्ष डॉलर्सच्या मालाची आयात केलीये. गेल्या काही वर्षांत भारताच्या मालदीवमधील निर्यातीत लक्षणीय वाढ झाली आहे.
भारत कोणता माल निर्यात करतो?
भारत प्रामुख्याने मालदीवमध्ये लोह, पोलाद, औषधे, प्लास्टिक, इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू, दुधाचे पदार्थ, कपडे, चप्पल, कच्चे कापड, ॲल्युमिनियम, लाकूड उत्पादने, बोटी इत्यादी वस्तूंची निर्यात करतो.
इतकेच नाही तर भारत मालदीवमध्ये मूलभूत आणि आवश्यक खाद्यपदार्थांची निर्यात देखील करतो. उदाहरणार्थ- पिण्याचे पाणी, मीठ, साखर, अंडी, खाद्यतेल, सुका मेवा, मसाले, मासे, टॉफी, चॉकलेट, कॉफी, चहा, फळे, भाज्या इत्यादी.