बाबा सिद्दिकी यांच्यावर गोळ्या झाडणारा तिसरा आरोपी कुठे गायब झाला? या ठिकाणी शोध सुरु

बाबा सिद्दिकी यांच्यावर गोळ्या झाडणारा तिसरा आरोपी अजूनही पोलिसांच्या हाती लागलेला नाही. पोलिसांकडून त्याचा शोध सुरु आहे. वेगवेगळ्या राज्यात पोलिसांचं पथक रवाना झाले आहे. हा तिसरा आरोपी महाराष्ट्राच्या बाहेर पळून गेल्याची शक्यता आहे. हा आरोपी जळगाव किंवा अमरावती मार्ग राज्याच्या बाहेर गेल्याची शक्यता आहे.

बाबा सिद्दिकी यांच्यावर गोळ्या झाडणारा तिसरा आरोपी कुठे गायब झाला? या ठिकाणी शोध सुरु
Follow us
| Updated on: Oct 14, 2024 | 7:48 PM

महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि नुकताच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केलेले बाबा सिद्दीकी यांच्या हत्या प्रकरणातील दोन आरोपींना अटक केली असून एक जण अजूनही फरार आहे. वॉण्टेड शूटर शिवकुमार गौतम उर्फ ​​शिवाचा मुंबई पोलिसांकडून कसून शोध सुरु आहे. सोमवारी मुंबई पोलिसांची टीम मध्य प्रदेशात पोहोचली. या ठिकणी देखील त्याचा शोध सुरु केलाय. मुंबई पोलिसांची पथके उज्जैन आणि खंडवा जिल्ह्यातील प्रार्थनास्थळांवर लक्ष ठेवून आहेत. सिद्दिकी यांच्या हत्येनंतर मुंबई पोलिसांचे वेगवेगळे पथक वेगवेगळ्या राज्यात त्याचा शोध घेतद आहेत.

पोलिसांनी आत्तापर्यंत हरियाणाचा रहिवासी गुरमेल बलजीत सिंग (23), उत्तर प्रदेशचा रहिवासी धर्मराज राजेश कश्यप (19) आणि पुण्याचा रहिवासी सह-सूत्रधार प्रवीण लोणकर या तीन आरोपींना अटक केली आहे. तर या प्रकरणातील हँडलर मोहम्मद झिशान अख्तर याचा शोध सुरु आहे. तो उज्जैन आणि खांडवा येथे असू शकतो असा पोलिसांना संशय आहे. महाकाल आणि ओंकारेश्वर मंदिरांत दररोज हजारो लोकं दर्शनासाठी येत असतात. महाराष्ट्रातील अमरावती आणि जळगावपासून खंडवा हे जवळ आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशचा रहिवासी शूटर शिवकुमार गौतमचा मध्य प्रदेशात शोध सुरु आहे. मुंबई पोलिसांचे पथक मध्य प्रदेश पोलिसांच्या मदतीने त्याचा शोध घेत आहेत. घटनेनंतर मध्य प्रदेशात तो पळून गेल्याचा पोलिसांना संशय आहे. मुंबईतील वांद्रे भागातील खेर नगरमध्ये राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांना शनिवारी रात्री तीन जणांनी गोळ्या घातल्या. यानंतर जखमी अवस्थेत त्यांना लिलावती रुग्णालयात नेण्यात आले. पण तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता.

बाबा सिद्दिकी यांच्या हत्येमागचं कारण अजून समोर आलेलं नाही. पण या हत्याकांडाची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई टोळीने घेतली आहे. टोळीतील एका सदस्याने सिद्दीकी यांच्या हत्येशी संबंधित एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. बाबा सिद्दिकी यांच्या हत्येचा तपास मुंबई क्राइम ब्रँचकडे देण्यात आला आहे. बाबा सिद्दीकी यांना मारण्यामागे कॉन्ट्रॅक्ट किलिंग किंवा राजकीय शत्रुत्व किंवा झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाबाबतची धमकी अशा विविध अंगांनी तपास सुरु आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी मुंबई पोलिसांच्या 15 टीम तयार करण्यात आल्या आहोत. ज्या महाराष्ट्राच्या बाहेरही आरोपींचा शोध घेत आहेत.

बाबा सिद्दिकी हे सलमान खानचे जवळचे मानले जात होते. बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर सलमान खानच्या सुरक्षेत ही वाढ करण्यात आली होती. बाबा सिद्दिकी यांना १५ दिवसांपूर्वी धमकी आल्याची माहिती ही समोर आली होती. ज्यानंतर त्यांना वाय दर्जाची सुरक्षा देण्यात आली होती. पण असं असताना सुद्धा गुन्हेगारांनी त्यांची हत्या केली.

'कारण टायगर अभी जिंदा है...',अमोल कोल्हेंची फटकेबाजी, बघा काय म्हणाले?
'कारण टायगर अभी जिंदा है...',अमोल कोल्हेंची फटकेबाजी, बघा काय म्हणाले?.
उद्धव ठाकरेंवर अ‍ॅन्जिओप्लास्टी शस्त्रक्रिया, डॉक्टरांचा सल्ला काय?
उद्धव ठाकरेंवर अ‍ॅन्जिओप्लास्टी शस्त्रक्रिया, डॉक्टरांचा सल्ला काय?.
भाजप आमदारासमोर महिलांना वाटलेल्या साड्या मराठा आंदोलकांनी पेटवल्या अन
भाजप आमदारासमोर महिलांना वाटलेल्या साड्या मराठा आंदोलकांनी पेटवल्या अन.
UP च्या बहरइचमध्ये देवी विसर्जनावेळी गोळीबार, संतप्त जमावाकडून जाळपोळ
UP च्या बहरइचमध्ये देवी विसर्जनावेळी गोळीबार, संतप्त जमावाकडून जाळपोळ.
सिद्दीकींच्या हत्येचा कट याच घरात शिजला; बघा एक्सक्ल्युझिव्ह व्हिडीओ
सिद्दीकींच्या हत्येचा कट याच घरात शिजला; बघा एक्सक्ल्युझिव्ह व्हिडीओ.
बाबा सिद्दीकींसह झिशान यांच्याही हत्येचा होता कट, आरोपींची मोठी कबुली
बाबा सिद्दीकींसह झिशान यांच्याही हत्येचा होता कट, आरोपींची मोठी कबुली.
राज ठाकरे राजकीय सस्तन प्राणी, जे साडेचार वर्षे..अंधारेंची बोचरी टीका
राज ठाकरे राजकीय सस्तन प्राणी, जे साडेचार वर्षे..अंधारेंची बोचरी टीका.
आचारसंहितेपूर्वी मंत्रिमंडळ बैठकीत निर्णयाचा धडाका, 19 निर्णय जारी
आचारसंहितेपूर्वी मंत्रिमंडळ बैठकीत निर्णयाचा धडाका, 19 निर्णय जारी.
सरकारकडून टोलमाफी अन् राज ठाकरे म्हणाले, 'ही आनंदाची बाब, पण फक्त...'
सरकारकडून टोलमाफी अन् राज ठाकरे म्हणाले, 'ही आनंदाची बाब, पण फक्त...'.
सरकारकडून टोलमाफी अन् मनसेचा एकच जल्लोष; अविनाश जाधव म्हणाले...
सरकारकडून टोलमाफी अन् मनसेचा एकच जल्लोष; अविनाश जाधव म्हणाले....