वंदे भारत ट्रेनमध्ये आवाज का येत नाही? झटके का बसत नाही? जाणून घ्या कारण

वंदे भारतमध्ये एअर स्प्रिंग तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे वंदे भारत इतर गाड्यांपेक्षा वेगळी ठरली आहे. ट्रेनच्या एका डब्यात 2 बोगी असतात.

वंदे भारत ट्रेनमध्ये आवाज का येत नाही? झटके का बसत नाही? जाणून घ्या कारण
vandebharatImage Credit source: socialmedia
Follow us
| Updated on: Feb 26, 2023 | 2:44 PM

नवी दिल्ली : वंदे भारत एक्स्प्रेसची (Vande Bharat Express) चर्चा देशातच नाही तर विदेशातही होत आहे. भारतीय रेल्वे अनेक वर्षांपासून तंत्रज्ञान आयात करत होती. परंतु आता भारत आत्मनिर्भर बनला आहे. भारताच्या वंदे भारत एक्स्प्रेसची चर्चा जगातील 18 देशांमध्ये सुरु आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत वंदे भारत एक्स्प्रेसच्या तंत्रज्ञानाचे यश सांगितले. ज्यामुळे या रेल्वेतील ग्लासात ठेवलेले पाणीसुद्धा हालत नाही. तसेच आवाजाचा त्रास प्रवाशांना होत नाही. या तंत्रज्ञानामुळे वंदे भारत ट्रेन प्रसिद्ध झाली आहे.

काय आहे तंत्रज्ञान

हे सुद्धा वाचा

वंदे भारतमध्ये एअर स्प्रिंग तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे वंदे भारत इतर गाड्यांपेक्षा वेगळी ठरली आहे. ट्रेनच्या एका डब्यात 2 बोगी असतात. स्प्रिंगच्या मदतीने संपूर्ण डबा या बोगींवर टिकलेला असतो. ट्रेन रुळावरून धावते तेव्हा हलके धक्के बसतात, परंतु हे धक्के या स्प्रिंगमुळे बर्‍याच प्रमाणात कमी होतात. परंतु तरीही ट्रेनमध्ये हादरा जाणवत असतो. जेव्हाही ट्रेन सुरु होते, जोरात झटके जाणवतात. तसेच जेव्हा ट्रेन धावू लागते तेव्हा खटरपटर आवाज येते.

काय होत असते

प्रत्यक्षात काय होते की संपूर्ण डब्याचे वजन या स्प्रिंगवर असते आणि हे स्प्रिंग बोगीला जोडलेले असतात. रेल्वे पटरी एकदम स्थिर नसते. जेव्हा ट्रेन त्यांच्यावरून जाते तेव्हा पटरी थोडीशी वर आणि खाली होत असते. तो आवाज ट्रेनमध्ये बसलेल्या प्रवाशांपर्यंत पोहोचत राहतो. पण, वंदे भारतमध्ये असे नाही.

वंदे भारतमध्ये काय केला बदल

वंदे भारतमध्ये बसलेल्या प्रवाशांना असा आवाज ऐकू येत नाही आणि याचे कारण म्हणजे या ट्रेनमध्ये वापरलेले ‘एअर स्प्रिंग्स’. वंदे भारतामध्ये जुन्या पारंपरिक स्प्रिंगच्या जागी एअर स्प्रिंग वापरण्यात आले आहेत. हे एअर स्प्रिंग हवेने भरलेले असतात. तसेच एका एका चेंबरला जोडलेले असतात, जे त्यातील हवेचा दाब संतुलीत करतात. हा एअर स्प्रिंग ट्रेनच्या धावण्यामुळे होणारे धक्के जवळपास बंद करतो. यामुळे प्रवाशांना बाहेरून कोणताही आवाज ऐकू येत नाही.

काय आहेत सुविधा

  • या ट्रेनमध्ये प्रत्येक सीटसाठी स्वतंत्र मोबाईल चार्जिंगची सुविधा
  • जेवण किंवा नाश्ता करण्यासाठी फोल्डेबल कॉम्पॅक्ट टेबल
  • लोणावळा घाटासह विविध दृश्य पाहण्यासाठी रोटेट चेअरही आहे
  • मोबाईल किंवा कॅमेरात विहंगम दृश्य टिपण्याचा आनंद
  • अगदी विमानात प्रवास करावा अशा पद्धतीच्या अद्ययावत सुविधा
  • मुंबईहून सोलापूरला ही ट्रेन केवळ साडेसहा तासात पोहोचते
  • या ट्रेनमध्ये चेअर कार आणि एक्झिक्यूटिव्ह कार अशा दोन प्रकारच्या बोगी
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.
'लाडक्या बहिणीं'नो मोठी बातमी, लाभार्थी महिलांना याच महिन्यात...
'लाडक्या बहिणीं'नो मोठी बातमी, लाभार्थी महिलांना याच महिन्यात....