भेळपुरी खाताना विचारलं मुस्लिम आहात का? अन् गोळया घातल्या, पहलगाममध्ये अतिरेक्यांचा नवा टेरर; मोदींकडून आढावा
ऐन पर्यटनाचा हंगाम सुरु असताना जम्मू-कश्मीरच्या पहलगाम येथे अतिरेकी हल्ला झाला आहे. या हल्ला अमरनाथ यात्रा सुरु होण्याच्या एक महिनाआधी झाला आहे. त्यामुळे सरकार कठोर पावले उचलली आहेत.

जम्मू-कश्मीरच्या पहलगाम येथे अतिरेक्यांनी पर्यटकांवर गोळीबार केल्यानंतर कश्मीरमधील पर्यटकांच्या सुरक्षेला मोठा धोका निर्माण झाला आहे. या हल्ल्यात एक ठार तर १२ जण जखमी झाले आहे. यात पर्यटकांसह स्थानिकही जखमी झाले आहेत. या अतिरेकी हल्ल्यानंतर या परिसरात कोबिंग ऑपरेशन सुरु झाले आहे. देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी तातडीची गृहखात्याची बैठक बोलावली आहे. या हल्ल्या पूर्वी भेलपुरी खाणाऱ्या पर्यटकांना त्यांचे नाव विचारले आणि हिंदू आहे याची खात्री केल्यानंतर अमानुषपणे गोळीबार केल्याचे घटनास्थळी असलेल्या महिला प्रत्यक्षदर्शींनी सांगितले आहे.
पहलगावच्या बेसराण येते अतिरेक्यांनी पर्यटकांवर अंधाधुंद फायरिंग केली आहे. या हल्ल्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला आह तर १२ जण जखमी झाले आहे. त्यात पर्यटक आणि स्थानिक नागरिकांना लक्ष्य झाले आहे. अमरनाथ यात्रेच्या एक महिना शिल्लक असताना हा अमानुष हल्ला झाल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. या हल्ल्यात जखमी झालेल्या पर्यटकासोबत प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांनी या संदर्भात घडलेला वृत्तांत धडकी भरवणारा आहे.
भेलपूरी खात होते आणि अतिरेक्याने पतीला गोळ्या घातल्या…
पहलगाम येथे घटनेवेळी एक महिलेचा पती भेळपुरी खात उभा असताना त्याला गोळ्या घातल्याचे महिलेने सांगितले. स्थानिक माध्यमातील व्हिडीओ फूटेजमध्ये एक महिला दुखाच्या आवेगाने रडत सांगत आहे की माझ्या पतीला अतिरेक्यांना या कारणाने गोळ्या घातल्या कारण तो मुस्लीम नाही.




माझ्या पतीला वाचवा हो…महिलेची आर्त हाक
पहलगाम येथून आलेल्या या ताज्या फोटोत ही महिला लोकांना तिच्या पतीला वाचविण्यासाठी आर्जवे करताना दिसत आहे. तिच्या भावूक आवाहन आणि आर्त हाकेने कोणाचेही हृदय हेलावेल..त्यामुळे संपूर्ण देशात हळहळ व्यक्त केली जात असून दहशतीची लेकर उमटली आहे.
पहलगाम में हुए आतंकी हमले में एक महिला के पति को गोली मार दी गई. सोशल मीडिया और स्थानीय खबरों के माध्यम से जो वीडियो सामने आई है उसमें एक महिला ने दुःख भरे शब्दों में बताया कि आतंकियों ने उनके पति को केवल इस वजह से गोली मार दी क्योंकि उन्होंने कहा था कि ये मुस्लिम नहीं है.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कडून आढावा
ऐन पर्यटनाचा हंगाम आणि अमरनाथ यात्रेला एक महिना शिल्लक असताना जम्मू-कश्मीरच्या पहलगाम येथे अतिरेकी हल्ला झाला आहे. या हल्ला अमरनाथ यात्रा सुरु होण्याच्या एक महिनाआधी झाला आहे. त्यामुळे सुरक्षेविषयी चिंता वाटत असल्याने सरकार कठोर पावले उचल्याच्या तयारीत असल्याचे म्हटले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या हल्ल्यानंतर गृहमंत्री अमित शाह यांच्याशी टेलिफोनवरुन चर्चा केली आहे. त्यांंनी या संदर्भात तातडीचे उपाय घेण्यास सांगितले असून घटनास्थळी भेट देण्याचे आदेश दिले आहेत.
ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.