Nihang Sikh : सिंघू सीमेवर तरुणाचे हात कापल्यानं निहंग शीख चर्चेत, मुघलांसह अफगाणी फौजांना अडवणारा समुदाय वादात का?

निहंग शीख हा समुदाय योद्धा समुदाय आहे. 1699 मध्ये गुर गोविंद सिंह यांच्यावतीनं खालसा तयार करण्यात आलं त्यावेळी निहंग शीख उदयास आले. हे लोक आजही धर्म आणि सांप्रदायिक ठिकाणी वास्तव्यास असतात.

Nihang Sikh : सिंघू सीमेवर तरुणाचे हात कापल्यानं निहंग शीख चर्चेत,  मुघलांसह अफगाणी फौजांना अडवणारा समुदाय वादात का?
nihang
Follow us
| Updated on: Oct 15, 2021 | 5:07 PM

नवी दिल्ली : शेतकरी आंदोलन सुरु असलेल्या सिंघू सीमेवर (Singhu Border) एका तरुणाच्या निर्घृण हत्येचे प्रकरण समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, त्याचा हात कापून मृतदेह बॅरिकेडवरून लटकवण्यात आला. मृतदेह सापडल्यानंतर सिंघू सीमेवर गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रकरणी निहंग शीख समुदायातील काही व्यक्तींवर संशय व्यक्त करण्यात आळा आहे. गुरु गोविंद सिंह यांच्या काळातील निहंग शीख फौजांच्या बहादुरीचे किस्से सांगितले जायचे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून निहंग शीख वेगळ्या कारणांमुळं चर्चेत आहेत.

निहंग शीख नेमके कोण?

निहंग शीख हा समुदाय योद्धा समुदाय आहे. 1699 मध्ये गुर गोविंद सिंह यांच्यावतीनं खालसा तयार करण्यात आलं त्यावेळी निहंग शीख उदयास आले. हे लोक आजही धर्म आणि सांप्रदायिक ठिकाणी वास्तव्यास असतात.

निहंग शीखांनी 18 व्या आणि 19 व्या शतकात मुघल आणि अफगाणी आक्रमकांचा सामना केला. लेखक आणि इतिहासकार पटवंत सिंह यांनी पौराणिक आणि कट्टर सेनानींच्या रुपामध्ये त्यांचं वर्णन केलं आहे. गुरु गोविंद सिंह यांच्या काळात निहंग शीख फौजांनी अनेक युद्ध जिंकली आहेत.

1818 मध्ये महाराजा रणजीत सिंह यांनी सरकार ए खालसा होण्याचं श्रेय देखील निहंग योद्ध्यांना जातं. शिखांचा इतिहास या पुस्तकात खुशवंत सिंह यांनी मुल्तान विजयामुळं पंजाबमधील अफगाण प्रभाव संपुष्ठात आणला आणि दक्षिणेतील मुघल राज्यांच्या प्रमुख आधार तोडल्यान सिंधचा मार्ग खुला झाल्याचं म्हटलं आहे. 1849 मध्य ब्रिटिश साम्राज्याच्या काळात निहंगांचा प्रभाव कमी झाला.

निहंगचा अर्थ काय?

संस्कृत, फारसी आणि श्री गुरु ग्रंथ साहिबमध्ये याचे विविध अर्थ निघतात. गुरु ग्रंथ साहिबच्या अर्थानुसार निहंगक हे नीडर असतात.

पोशाख आणि शस्त्रांची विविधता

नीळ कपडे, पगडीवर अर्धचंद्राकार आणि दुधारी तलवार असते. लोखंडाचं कडं,ढाल, युद्धाचे बुट, बंदूक किंवा रायफल त्यांच्याकडं असते. यामध्ये तरुणांचं दल आणि वयस्कर सैनिकांचं दल असे दोन प्रकार असतात. त्यांच्यावर कोणतही केंद्रीय नियंत्रण नसतं.

निहंग शीख समुदायाशी संबंधित वाद

निहंग शीख या समुदायातील काही जण भांग सेवन करतात. मात्र, भांग सेवनाला शीख धर्मात मान्यता नाही. निहंग पंरपरेचा आधार देत भांग सेवन योग्य असल्याचा दावा केला जातो. शीख बुद्धिप्रामाण्यावाद्यांच्यामते निहंग शीख हे पोशाखाला खूप महत्त्व देतात. अपराधी पार्श्वभूमी असणारे लोक आणि भूमाफिया निहंग लोकांशी जोडले गेले आहेत. कोरोना लॉकडाऊनच्या काळात पटियालामध्ये निहंग शीखांनी पोलिसांवर हल्ला केला होता. तर, 26 जानेवारीच्या आंदोलनातही निहंग शीखांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं होतं.

इतर बातम्या:

सिंघू सीमेवर तरुणाचा मृतदेह आढळल्याने खळबळ, हात कापून बॅरिकेट्सवर लटकवलं

PHOTOS : पंजाबमधील किसान सभेच्या शेतकऱ्यांची दुसरी तुकडी दिल्लीच्या सिंघु सीमेवर परतली!

Who are Nihangs what is their history came in Controversies singhu border youth murder

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.