कोण आहेत या महिला IAS अधिकारी ज्यांचं अमिताभ बच्चन यांनीही केलंय कौतूक

IAS success Story : अमिताभ बच्चन देखील ज्यांचं उत्तर ऐकून चकीत झाले. कारण त्यांनी काही सेंकदात उत्तर दिले. कोण आहेत या महिला आयएएस अधिकारी ज्यांनी दुसऱ्या प्रयत्नात त्यांचं हे स्वप्न पूर्ण केलं. यासाठी त्या दिवसाला ९ ते १० तास अभ्यास करत होत्या.

कोण आहेत या महिला IAS अधिकारी ज्यांचं अमिताभ बच्चन यांनीही केलंय कौतूक
aashima-goyal
Follow us
| Updated on: Nov 10, 2023 | 2:50 PM

IAS Success Story : UPSC परीक्षा किती कठीण आहे हे वेगळं सांगण्याची गरज नाही. कारण जिद्द आणि चिकाटी असेल तरच ही परीक्षा तुम्ही पास करु शकता. आम्ही अशीच एक तरुण अधिकारी आशिमा गोयलबद्दल सांगणार आहोत. एम.टेक पदवी मिळवल्यानंतर आशिमा यांनी यूपीएससीची तयारी सुरू केली आणि दुसऱ्या प्रयत्नात ती आयएएस होण्यात यशस्वी झाली. IAS आशिमा गोयल या हरियाणा राज्यातील बल्लभगढ येथील रहिवासी आहेत. UPSC 2020 बॅचच्या उत्तराखंड केडरच्या IAS अधिकारी आहेत. आशिमाचे वडील सायबर कॅफे चालवत होते. तर तिची आई गृहिणी आणि मोठी बहीण सीए आहे.

आशिमा गोयल यांनी 2022 मध्ये IFS अधिकारी राहुल मिश्रा यांच्याशी लग्न केले. महत्त्वाचे म्हणजे आशिमाने कोणतेही प्रशिक्षण न घेता यूपीएससीची तयारी सुरू केली. 2018 मधील यूपीएससी परीक्षेतील अपयशातून धडा घेत तिने आपल्या कमकुवत गोष्टींवर काम केले. त्यानंतर 2019 मध्ये त्यांना यश मिळाले.

अमिताभ बच्चन यांनी केलेय कौतुक

केबीसीत एका स्पर्धकाला मदत करण्यासाठी व्हिडिओ कॉलद्वारे त्या या शोमध्ये सहभागी झाल्या होत्या. जेव्हा स्पर्धक अभिनव सिंगने आशिमा यांना प्रश्न सांगितला तेव्हा त्यांनी फक्त 5 सेकंदात प्रश्नाचे उत्तर दिले. महत्त्वाचं म्हणजे पर्याय ऐकण्यापूर्वीच त्यांनी हे उत्तर दिले. यावर अमिताभ बच्चन यांनी देखील त्यांचे कौतुक केले होते.

दररोज 9-10 तास UPSC ची तयारी

आशिमा पहिल्यांदा यूपीएससीला बसल्या तेव्हा त्या बंगळुरूमध्ये काम करत होत्या. पहिल्याच प्रयत्नात अयशस्वी झाल्यानंतर त्यांनी नोकरी सोडली आणि स्वत:ला तयारीत पूर्णपणे झोकून दिले. बायोटेक केमिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतलेल्या आशिमा दररोज 9 ते 10 तास यूपीएससीची तयारी करत असे.

आशिमा या सोशल मीडियावर देखील खूप अॅक्टिव्ह असतात.

Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.