कोणाला मिळाला राम मंदिराचा पुजारी होण्याचा मान, 3 हजार पुरोहितांमधून निवड

Ayodhya ram mandir : राम मंदिराचा उद्घाटन सोहळा २४ जानेवारी २०२४ रोजी पार पडणार आहे. या सोहळ्यासाठी अनेक मान्यवर उपस्थित राहणार असून संपूर्ण देशाचे लक्ष याकडे लागले आहे. हा सोहळा ऐतिहासिक होणार आहे. यासाठी तयारी अंतिम टप्प्यात आहे. या मंदिराचे पुजारी कोण असणार आहेत जाणून घ्या.

कोणाला मिळाला राम मंदिराचा पुजारी होण्याचा मान, 3 हजार पुरोहितांमधून निवड
राम मंदिरImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Dec 14, 2023 | 7:56 PM

Ram mandir pujari : देशभरातील लोक ज्या राम मंदिराची पूर्ण होण्याची वाट बघत आहे त्याचे काम लवकरच पूर्ण होणार असून जानेवारी महिन्यात त्याचे उद्घाटन होणार आहे. अयोध्येतील भव्य राम मंदिराच्या गर्भगृहाच्या अभिषेक आणि मंदिराच्या अभिषेकासाठी सोमवार, 22 जानेवारी 2024 ही तारीख निश्चित करण्यात आली आहे. तर मंदिराचे उद्घाटन 24 जानेवारी 2024 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाला अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. पंतप्रधान मोदींच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे.

भारतात अनेक प्रसिद्ध, प्राचीन आणि ऐतिहासिक मंदिरे आहेत. पण अयोध्येतील राम मंदिर हे देखील ऐतिहासिक असणार आहे. कारण ५०० वर्षाच्या संघर्षानंतर ते तयार होत आहे. श्रीराम जन्मभूमीवर मंदिराचे काम अंतिम टप्यात आहे. अयोध्येत बांधले जात असलेले राम मंदिर अशा प्रकारे तयार करण्यात येत आहे. ज्यामुळे बरीच वर्ष त्याला दुरुस्तीची गरज लागणार नाही. रामललाच्या या भव्य मंदिराची ओळख अनेक शतकं राहणार आहे. प्रसिद्ध वास्तुविशारद चंद्रकांत भाई सोमपुरा यांनी या मंदिराची रचना केली आहे.

राम मंदिरात होणाऱ्या पूजेसाठी पुजाऱ्याचीही निवड करण्यात आली आहे. राम मंदिरातील रामललाच्या पूजेसाठी पुजारी मोहित पांडे यांचे नाव पुढे येत आहे. मोहित पांडे हे गाझियाबादचे राहणारे आहेत. रामललाच्या पूजेसाठी नेमलेल्या पुजार्‍यांसाठी काही निकष ठरवण्यात आले होते.  रामनंदीय परंपरेचा अभ्यासक असणे यासाठी आवश्यक होते. याशिवाय राम मंदिरात पूजा करणार्‍या पंडिताला वेद, शास्त्र आणि संस्कृत इत्यादी विषयातही निपुण असणे आवश्यक आहे. मोहित पांडेने हे सर्व निकष पास केले आहेत. राम मंदिरात पुजारी म्हणून नेमलेल्या मोहित पांडे कोण आहेत जाणून घेऊयात.

तीन हजार पुरोहितांनी केले होते अर्ज

अयोध्येत बांधल्या जाणाऱ्या भव्य राम मंदिरासाठी पुजाऱ्यांच्या निवडीसाठी औपचारिक अर्ज मागवण्यात आले होते. यामध्ये ३ हजार उमेदवारांनी अर्ज केले होते. निवड प्रक्रियेत पुरोहितांसाठी निकष लावण्यात आले होते, ज्यातून सर्वांना जावे लागले. या प्रक्रियेत, 200 अर्जदार पुजारी मुलाखतीसाठी पोहोचले, ज्यामध्ये 50 पुरोहित म्हणून निवडले गेले. या 50 पुरोहितांमध्ये मोहित पांडेचेही नाव आहे, जे सध्या चर्चेत आहेत.

कोण आहेत मोहित पांडे?

रामललाचा सेवक म्हणून निवडल झालेल्या मोहित पांडे, सध्या तिरुपती येथील तिरुमाला तिरुपती देवस्थानम (TTD) द्वारे संचालित श्री वेंकटेश्वर वैदिक विद्यापीठ (SVVU) येथे एमए (आचार्य) अभ्यासक्रम करत आहे. ते उत्तर प्रदेशातील सीतापूरचे रहिवासी आहेत. प्रथम श्रेणी ऑनर्ससह पदवी पूर्ण केल्यानंतर त्यांनी एमए (आचार्य) अभ्यासक्रमात प्रवेश घेतला. सध्या मोहित पांडे सामवेद विभागात प्रथम वर्षाला शिकत आहे.

मोहित पांडे यांची अयोध्या रामलला मंदिरासाठी सामवेद शाखेत ‘आचार्य’ म्हणून नियुक्ती करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. नियुक्तीपूर्वी मोहित पांडेने सहा महिन्यांचा प्रशिक्षण कालावधी पार केला आहे. अशाच प्रकारे उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र या राज्यांमधून राम मंदिरासाठी इतर पुजारी निवडण्यात आले आहेत. हे सर्व पुजारी रामानंदीय परंपरेतील असून त्यांना वेद, शास्त्र आणि संस्कृतमध्ये प्राविण्य आहे.

आचार्य सत्येंद्र दास हे राम मंदिराचे मुख्य पुजारी

मोहित पांडे यांच्यासोबतच अयोध्या राम मंदिराचे मुख्य पुजारी 83 वर्षीय आचार्य सत्येंद्र दास हे देखील चर्चेत आहेत. गेल्या ३१ वर्षांपासून ते रामजन्मभूमी मंदिराचे मुख्य पुजारी आहेत आणि १९९२ मध्ये बाबरी पाडण्यापूर्वी सुमारे ९ महिने आचार्य सत्येंद्र दास येथे पुजारी म्हणून रामललाची पूजा करत आहेत. 1992 मध्ये जेव्हा त्यांची रामजन्मभूमी मंदिरात पूजा करण्यासाठी नियुक्ती झाली तेव्हा त्यांना 100 रुपये पगार मिळत असे. आचार्य सत्येंद्र दास जी यांना संत व्हायचे होते. त्यामुळे ते घर सोडून 1958 मध्ये अयोध्येत आले.

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.