कोण आहे हाजी शहजाद, ज्याच्या 20 कोटींचा महल अन् आलिशान गाड्यांवर चालवले बुलडोजर
हाजी शहजादा याच्या तीन महाग गाड्या फॉर्च्यूनर, सफारी आणि स्कॉर्पियोसुद्धा बुलडोजर चालले आहे. शहजादा याने जमावाकडून पोलिसांवर दगडफेक केली होती. त्यानंतर तो फरार आहे. या घटनेच्या 24 तासांत पोलिसांनी हाजी शहजादा याच्यावर कारवाई सुरु केली. त्याचे घर बुलडोजरने पूर्ण पाडून टाकले.
सध्या मध्य प्रदेशातील छतरपूर येथील शहजाद अली याचे नाव चर्चेत आले आहे. त्याच्या 20 कोटींचा आलिशान महलवर बुलडोजर चालले आहे. हाजी शहजाद अली याने केले तरी काय? तर त्याने पोलिसांवर दगडफेक केली होती. परिवारासह फरार असलेला शहजाद याच्या घर आणि गाड्यांवर बुलडोजर चालल्यानंतर पोलीस त्याच्या शोधात आहे. दरम्यान या सर्व प्रकरणानंतर शहजाद याचा व्हिडिओ समोर आला आहे.
हाजी शहजादा याच्या तीन महाग गाड्या फॉर्च्यूनर, सफारी आणि स्कॉर्पियोसुद्धा बुलडोजर चालले आहे. शहजादा याने जमावाकडून पोलिसांवर दगडफेक केली होती. त्यानंतर तो फरार आहे. या घटनेच्या 24 तासांत पोलिसांनी हाजी शहजादा याच्यावर कारवाई सुरु केली. त्याचे घर बुलडोजरने पूर्ण पाडून टाकले.
कोण आहे हाजी शहजादा
हाजी छतरपूर मुस्लिम बहुल भागात पंचायत लावत होतो. त्याची दहशत इतकी होती की, त्याने दिलेल्या निर्णयाविरोधात जाण्याची कोणाचीही हिंमत होत नव्हती. त्याच्या परवानगीशिवाय पोलीस ठाण्यात पाऊल ठेवणेही अशक्य होते. परिसरात त्याची भूमाफीया म्हणून ओळख होती. छतरपूर येथील अनेक जणांच्या जमिनीवर त्याने ताबा मिळवला होता. त्याच्या विरोधात पोलिसांकडे जाण्याची धाडस कोणीही करु शकत नव्हता. त्या संपूर्ण परिसरात त्याच्या परवानगीशिवाय वाळू, जमीन, टायर आणि ऑईलचे कामकाज होऊ शकत नव्हते. कारण त्याचा चार भावांचा संपूर्ण परिवार त्याच्या या कामांमध्ये सहभागी होता.
शहजादा अन् भाऊ काँग्रेसमध्ये
शहजादा याचा मोठा भाऊ आजाद अली काँग्रेस नेता आहे. दुसऱ्या क्रमांकावर तो असून तो काँग्रेसचा पदाधिकारी आहे. छतरपूर काँग्रेसचा जिल्हा उपाध्यक्ष तो राहिला आहे. तिसरा भाऊ वाळू माफिया तर चौथ्याचे टायर आणि ऑयल व्यवसायावर कब्जा आहे. मध्य प्रदेशात 2018 ते 2020 दरम्यान काँग्रेस सरकार असताना त्याची गुंडगिरी वाढली होती. काँग्रेसचे माजी आमदार शंकर प्रताप सिंह उर्फ मुन्ना राजा याच्याशी त्याचे घनिष्ठ संबंध होते. आता मोहन यादव यांच्या सरकारने त्याचा 20 कोटीचा महल मातीत मिसळला आहे आणि त्याचा अहंकारही मोडीत निघाला आहे.
एमपी के छतरपुर में थाने पर हमला और पथराव करने वाले कांग्रेस के उपाध्यक्ष शहज़ाद अली के घर चला बुलडोज़र…@drmohanyadav51 pic.twitter.com/znERZifyRq
— Rameshwar Sharma (@rameshwar4111) August 22, 2024
शहजादाचा व्हिडिओ आला समोर
फरार असलेल्या शहजादने एका व्हिडिओद्वारे स्पष्टीकरण दिले आहे, त्यात त्याने म्हटले की, पोलीस प्रशासन माझ्याविरोधात कट रचत आहे. माझे घर पाडण्यात आले आहे. त्याची चौकशी करण्याचे आवाहन मी मुख्यमंत्र्यांना करतो. मला या प्रकरणात जबरदस्तीने गोवले जात आहे. दगडफेकीच्या वेळी मी अधिकाऱ्यांसोबत उभा होतो. तीन अधिकाऱ्यांनी केलेल्या विनंतीवरून मी जमावाला समजावले होते.