Video: ‘ मोहनदास करमचंद गांधीनं सत्यानाश केला’, अकोल्याच्या कालीचरण महाराजावर देशद्रोहाचा खटला चालवण्याची मागणी
बरं ही शिवीगाळ त्यांनी एखाद्या भक्ताला किंवा सहकाऱ्याला केलेली नाही तर ती केलीय राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना. तेही जगजाहीर व्यासपीठावरुन. तीही धर्मसंसदेत.
काही दिवसांपूर्वी एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्या व्हिडीओत एक तरुण साधू ‘शिवतांडव स्तोत्र’ गात होता. तरुण साधूचा आवाज, त्याची स्टाईल पाहून व्हिडीओ वेगानं व्हायरल झाला. जगभरातून त्या व्हिडीओवर उड्या पडल्या. अनेकांना वाटलं की हा साधू वाराणसी, किंवा कुठल्या तरी उत्तरेतील राज्यातला असेल. पण शोध घेतला असता हा तरुण साधू विदर्भातील अकोल्याचा असल्याचं सिद्ध झालं. या तरुण साधूचं नाव आहे कालीचरण महाराज. आता हेच महाराज पुन्हा एकदा चर्चेत आलेत. पण निमित्त एखाद्या स्तोत्राचं नाही तर शिवीगाळ केल्यामुळे. बरं ही शिवीगाळ त्यांनी एखाद्या भक्ताला किंवा सहकाऱ्याला केलेली नाही तर ती केलीय राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना. तेही जगजाहीर व्यासपीठावरुन. तीही धर्मसंसदेत.
नेमके काय म्हणालेत कालीचरण महाराज? कालीचरण महाराजांनी जे शब्द महात्मा गांधींबद्दल वापरलेत ते तर देशाच्या शत्रुबद्दलही सुसंस्कृत माणसं वापरणार नाहीत. मोहनदास करमचंद गांधी हे तर राष्ट्रपिता. महात्मा. जगभरात भारताची ओळख आहे आणि झाली ती याच महात्म्याच्या कृतीनं. त्याच महात्मा गांधींना अकोल्याच्या कालीचरण महाराजांनी अक्षरश: शिव्यांची लाखोली वाहिलीय. त्यातले काही शब्द तर इथे लिहिलेही जाऊ शकत नाही. त्यासाठी तुम्ही ट्विटमधला व्हिडीओ पहावा. याच व्हिडीओत कालीचरण महाराजानं गांधीजींना अपशब्द म्हटल्यानंतर नथूराम गोडसेचे आभार मानलेत. त्याच्या कृतीचं अभिनंदन केलंय. देशभरात सध्या विविध ठिकाणी धर्मसंसदेचं आयोजन केलं जातंय. त्यातली छत्तीसगडची राजधानी रायपूरमध्ये जी धर्मसंसद पार पडली, त्यात कालीचरण महाराजानं हे तारे तोडलेत. काँग्रेसच नाही तर अनेक सामाजिक, राजकीय व्यक्तींनी कालीचरण महाराजाविरोधात देशद्रोहाचा खटला दाखल करण्याची मागणी केलीय.
यह भगवाधारी फ़्रॉड राष्ट्रपिता महात्मा गाँधी को सरेआम गालियाँ दे रहा है, इसे तत्काल अंदर करना चाहिए। गाँधी जी से किसी को वैचारिक मतभेद हो सकता है,पर उनका अपमान करने का हक किसी को नहीं है। यह अक्षम्य अपराध है।pic.twitter.com/ToQF1ZC8AJ
— Sanjay Nirupam (@sanjaynirupam) December 26, 2021
सांगलीतही वादग्रस्त वक्तव्य एकदा लोक तुम्हाला ऐकायला लागलेत म्हटल्यानंतर माणसांना काहींना काही बोलून चर्चेत रहायची सवय लागते. तसच काहीसं कालीचरण महाराजांसोबतही घडलेलं दिसतंय. चालू महिन्याच्या सुरुवातीलाच कालीचरण महाराज एका कार्यक्रमासाठी सांगलीत गेले. तिथं ते पत्रकारांना भेटले. ते म्हणाले कोरोना हा मोठा फर्जीवाडा आहे. सध्या काही जण लोकांना मारुन फेकत आहेत, ह्यांना डॉक्टरच मारतायत आणि त्यांच्या किडनी, मानवी अवयवांची तस्करी केली जातेय. पुढचे सत्तर ऐंशी वर्ष मजा करुन घ्या, त्यानंतर हे लोक बारा हजर वर्षे नरकात सडतील. हे होते कालीचरण महाराजांचे शब्द. अर्थातच त्यांच्या म्हणण्याला सगळीकडे प्रसिद्धी मिळाली.
View this post on Instagram
कोण आहेत कालीचरण महाराज? कालीचरण महाराजांच्या कपाळावर कुंकवाचा मोठा ठिपका असतो. काळेभोर केस, मानेपर्यंत रुळलेले, महाराज रोज जीमला जातात, त्यामुळे अंगावर भगवे कपडे घातले नसते तर त्यांना कुणीही बॉडीबिल्डरच म्हटलं असतं अशी दणकट देहयष्टी. कपडेही जरीचे. म्हटलं तर भगवे, म्हटलं तर चॉकलेटी स्वरुपाचे. एकदम स्वच्छ. व्यवस्थितपणा. एखाद्या साधूच्या ठायी असतो असा गबाळेपणा कुठेही दिसणार नाही. हेच कालीचरण महाराज विदर्भातल्या अकोल्याचे. त्यांचं मुळ नाव अभिजित धनंजय सराग. ते अकोल्यातल्या जुन्या शिवाजीनगर भागातल्या भावसार पंचबंगला भागात रहातात. त्यांच्या आई वडीलांचं नाव सुमित्रा आणि धनंजय सराग. अभिजीतला शाळेत जायचा कंटाळा होता. स्वभाव खोडकर. पण अध्यात्माची ओढ. आई वडीलांनी पोराला वठणीवर आणण्याचा प्रयत्न केला पण प्रयत्न निष्फळ. शेवटी त्यांनी पोराला जे व्हायचं ते होऊ दिलं. पुढे हाच अभिजीत कालीचरण महाराज झाला. तोही आपण कालीमातेला आई तर अगस्ती ऋषींना गुरु मानत असल्याचं म्हणायला लागला. एकेदिवशी अकोल्यातल्या पुरातन शिवमंदीरात ह्याच कालीचरण महाराजानं शिवतांडव स्तोत्र म्हटलं आणि तो जगप्रसिद्ध झाला. अनुपम खेरसारख्या अभिनेत्यानं त्याचा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला.
हे सुद्धा वाचा:
Chanakya Niti : जीवनात यश मिळवण्यासाठी चाणक्य यांच्या ‘या’ गोष्टी नेहमीच लक्षात ठेवा
पेट्रोल, डिझेलचे नवे दर जाहीर, जाणून घ्या आपल्या शहरातील भाव