अवघ्या 3 दिवसांवर शाही लग्न; होतेय जगभर चर्चा; बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंत, नेत्यांपासून खेळाडूंपर्यंत सर्वच वऱ्हाडी
अजय सिंग चौटाला आणि नैना सिंग यांचे दिग्विजय हे चिरंजीव आहेत. ओम प्रकाश चौटाला आणि स्नेहलता यांचे नातू आहेत. दिग्विजय यांचे बंधू दुष्यंत चौटाला हे हरियाणाच्या भाजप- जजपा सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आहेत.
चंदीगड : सध्या देशात चौटाला कुटुंबात होणाऱ्या शाही विवाह सोहळ्याची जोरदार चर्चा सुरू आहे. हरियाणाचे उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला यांचे भाऊ दिग्विजय चौटाला यांच्या लग्नाची जोरदार तयारी सुरू झाली आहे. स्वत: दिग्विजय आपल्या लग्नाचं आमंत्रण देत आहेत. त्यांच्या लग्नाला बॉलिवूडच नव्हे तर हॉलिवूडमधील कलाकारही येणार आहेत. अध्यात्मिक गुरुंपासून ते राजकारण्यांपर्यंत आणि खेळाडूही या लग्न सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही लग्नाचं आमंत्रण देण्यात आलं आहे. दिग्विजय चौटाला यांचं लगन कौर रंधावा यांच्याशी लग्न होणार आहे. या लगन कौर रंधावा आहेत कोण? चला तर जाणून घेऊया त्यांच्याविषयी.
कोण आहेत रंधावा?
लगन कौर रंधावा या पंजाबच्या अमृतसर येथे राहतात. लगन कौर रंधावाही राजकीय घराण्यातून येतात. त्यांचे आजोबा अकाली दल सरकारमध्ये उपमुख्यमंत्री होते. त्यांचे वडील दीपकरण रिअल इस्टेटचा व्यवसाय बघतात. लगनच्या आईचे नाव रमिंदर कौर आहे.
दिग्विजय चौटाला कोण आहेत?
अजय सिंग चौटाला आणि नैना सिंग यांचे दिग्विजय हे चिरंजीव आहेत. ओम प्रकाश चौटाला आणि स्नेहलता यांचे नातू आहेत. दिग्विजय यांचे बंधू दुष्यंत चौटाला हे हरियाणाच्या भाजप- जजपा सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आहेत. अभय सिंग चौटाला हे त्यांचे काका आहेत. दिग्विजय यांचे आजोबा ओम प्रकाश सिंग चौटाला हे हरियाणाचे मुख्यमंत्री होते. तर दिग्विजय चौटाला सध्या जननायक जनता पार्टीचे महासचिव आहेत. त्याशिवाय हँडबॉल फेडरेशन ऑफ इंडियाचेही ते अध्यक्ष आहेत.
वऱ्हाडी कोण कोण?
राष्ट्रपती आणि पंतप्रधानांव्यतिरिक्त बॉलिवूड स्टार सलमान खान, गायक कैलाश खेर, रणदीप हुड्डा, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, बाबा रामदेव आणि पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रकाश सिंग बादल यांनाही लग्नाचं आमंत्रण देण्यात आलं आहे.
लग्न कुठे होणार?
सिरसा येथे लग्नाची जोरदार तयारी सुरू आहे. 18 एकरच्या भूखंडावर मंडप उभारण्यात आला आहे. कालच या ठिकाणी प्रीती भोजनाचं आयोजन करण्यात आलं होतं. तर 15 मार्चला दिल्लीत हा शाही विवाह सोहळा होणार आहे. तसेच लग्नाला येण्यासाठी पंजाब आणि हरियाणातील सर्व पंचायतींना निमंत्रण देण्यात आलं आहे.