Marcos commando | पाणी, हवा किंवा जमीन…सगळ्याच ठिकाणी शत्रूसाठी ते काळ, कोण आहेत भारताचे हे मार्कोस कमांडो?

Marcos commando | मार्कोस हे भारताच एलिट कमांडो युनिट आहे. इस्रायल, अमेरिकन कमांडोच्या तोडीच हे युनिट आहे. भारतीय नौदलाच्या मार्कोस युनिटमध्ये स्थान मिळवण सोप नाहीय. अत्यंत कठोर, खडतर अशा प्रशिक्षणातून त्यासाठी जाव लागतं. भारताची ही एलिट फोर्स कुठल्याही शत्रूसाठी काळ बनून जाते. जाणून घ्या भारताच्या या स्पेशल युनिटबद्दल.

Marcos commando | पाणी, हवा किंवा जमीन...सगळ्याच ठिकाणी शत्रूसाठी ते काळ, कोण आहेत भारताचे हे मार्कोस कमांडो?
Indian navy Marcos commandos
Follow us
| Updated on: Jan 06, 2024 | 9:12 AM

Marcos commando | सोमालियाच्या किनाऱ्याजवळ हायजॅक करण्यात आलेल्या जहाजातून भारतीय पथकाची सुरक्षित सुटका करण्यात आली आहे. भारतीय नौदलाचे बहाद्दूर कमांड मार्कोसमुळे हे शक्य झालं. मार्कोस म्हणजे मरीन कमांडो. गुरुवारी संध्याकाळी ‘एमवी लीला नॉरफॉक’ या जहाजाच्या अपहरणाची माहिती मिळाली. सोमालियाच्या किनाऱ्याजवळ अपहरण झालेल्या या जहाजावर लायबेरियाचा झेंडा होता. भारतीय नौदल या हायजॅक झालेल्या जहाजाच्या मागावरच होतं. संधी मिळताच नौदलाच एलिट कमांडो युनिट मार्कोसने ऑपरेशन पूर्ण केलं.

अपहरणग्रस्त एमवी लीला नॉरफॉक जहाजावर उत्तर अरबी समुद्रात भारतीय नौदलाने वेगाने Action घेतली. जहाजावरील 15 भारतीय आणि एकूण क्रू मेंबर्सची सुटका केली.  मार्कोसने संपूर्ण जहाजावर शोध अभियान राबवलं. या दरम्यान त्यांना एकही समुद्री डाकू आढळला नाही. कदाचित भारतीय एअरक्राफ्टच्या इशाऱ्यानंतर या समुद्री डाकूंनी पळ काढल्याची शक्यता आहे. INS चेन्नई आणि आपली अत्याधुनिक विमानं नौदलाने हायजॅक झालेल्या जहाजाच्या मदतीसाठी पाठवली होती.

मार्कोस कमांडो युनिट काय आहे?

आता अनेकांना हे जाणून घ्यायच असेल भारतीय नौदलाच हे मार्कोस कमांडो युनिट काय आहे?. ही कोणती फोर्स आहे? कशा पद्धतीने काम करते? या युनिटची स्थापना कधी झाली? या सगळ्या प्रश्नांची उत्तर आम्ही देणार आहोत. भारतीय नौदलाचे हे मरीन कमांडोज मार्कोस नावाने ओळखले जातात. त्यांच अधिकृत नाव मरीन कमांडो फोर्स (MCF) आहे. भारतीय नौदलाची ही स्पेशल फोर्स युनिट आहे. मार्कोस हे भारताच विशेष समुद्री पथक आहे. याचा शॉर्ट फॉर्म ‘मार्कोस’ आहे.

मार्कोसची स्थापना कधी झाली?

स्पेशल फोर्स यूनिट मार्कोसची स्थापना 1987 साली करण्यात आली. मार्कोस सर्व प्रकारच्या वातावरणात काम करण्यासाठी सक्षम आहेत. समुद्र, हवा आणि जमीन तिन्ही ठिकाणी कारवाई करण्यासाठी मार्कोस सक्षम आहेत. सगळ्याच ठिकाणी हे भारताच्या शत्रूंसाठी धोकादायक आहेत. अनुभव आणि व्यावसायिकतेच्या बळावर मार्कोसला आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठा मिळालीय. मार्कोस नियमितपणे झेलम नदी आणि वूलर तळ्यात ऑपरेट करतात. हे तळ 65 किलोमीटरमध्ये पसरलेलं आहे. मार्कोस जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांसाठी काळ आहेत.

1971 च्या भारत-पाकिस्तान युद्धात अपेक्षित रिझल्ट नाही

1955 साली भारतीय सैन्याने ब्रिटिश स्पेशल बोट सर्विसच्या मदतीने कोचीनमध्ये एका डायविंग स्कूलची स्थापना केली. स्फोटक निकामी करणं आणि साल्वेज डायविंगसारख कौशल्य शिकवायला सुरुवात केली. 1971 साली भारत-पाकिस्तान युद्धादरम्यान हे फायटर पाणबुडे अपेक्षित रिझल्ट देऊ शकले नाहीत. कारण त्यांना अशा मिशन्ससाठी पूर्णपणे ट्रेन केलेलं नव्हतं.

कुठल्या देशाच्या कमांडोसबत झाली IMSF ची ट्रेनिंग

1986 साली भारतीय नौदलाने एका विशेष पथकाची निर्मिती करण्यावर काम सुरु केलं. समुद्रात छापेमारी, शोध आणि दहशतवादविरोधी अभियानात पारंगत असणाऱ्या युनिटच्या निर्मितीवर करण्याच लक्ष्य होतं. 1955 साली स्थापन झालेल्या डायविंग युनिटमधून तीन अधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. त्यांना कोरोनाडो अमेरिकेत नेवी सीलसोबत प्रशिक्षित करण्यात आलं. फेब्रुवारी 1987 मध्ये भारतीय समुद्री विशेष बल अधिकृतरित्या अस्तित्वात आलं. तीन अधिकारी पहिले या युनिटचे सदस्य होते. 1991साली IMSF च नाव बदलून ‘मरीन कमांडो फोर्स’ करण्यात आलं.

मार्कोससाठी निवड कशी होते?

मार्कोससाठी भारतीय नौदलातून कमांडोजची निवड केली जाते. निवडीची प्रक्रिया खूप कठीण असते. कठोर प्रशिक्षण घ्याव लागतं. निवडीचे निकष खूप उच्च आहेत. मार्कोसमध्ये निवड होण सोप नाही. मार्कोसच्या सुरुवातीच्या ट्रेनिंगसाठी अमेरिका आणि ब्रिटनने मदत केली होती. पाठयक्रम सुद्धा या ट्रेनिंगचा भाग आहे. प्रशिक्षणादरम्यान एयरबोर्न ऑपरेशन, कॉम्बॅट डायविंग कोर्स, काऊंटर-टेररिज्म, एंटी-हाइजॅकिंग, एंटी-पायरेसी ऑपरेशन, थेट कारवाई, विशेष शोध मोहिम असे वेगवेगळे प्रकार आहेत. मार्कोसच बहुतांश प्रशिक्षण INS अभिमन्यूवर होतं. मार्कोसचा तो बेस आहे.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.