Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एकेकाळी Air India मध्ये ट्रेनी, आता एयरलाईन्स खरेदी करण्याची तयारी, पाहा कोण आहे मीनाक्षी!

गेल्या काही दिवसांपासून एअर इंडियाच्या निलामीच्या बातम्या येत आहेत. यासाठी टाटा ग्रुप आणि सिंगापुर एअरलाइन्सची बोली लावण्याची तयारी सुरू आहे.

एकेकाळी Air India मध्ये ट्रेनी, आता एयरलाईन्स खरेदी करण्याची तयारी, पाहा कोण आहे मीनाक्षी!
Follow us
| Updated on: Dec 29, 2020 | 5:46 PM

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून एअर इंडियाच्या (Air India) लिलावाच्या बातम्या येत आहेत. यासाठी टाटा ग्रुप आणि सिंगापुर एअरलाइन्सची बोली लावण्याची तयारी सुरू आहे. तर दुसरीकडे, एअर इंडियाच्या 209 कर्मचाऱ्यांना एका खासगी फायनेसरच्या मदतीने एअर इंडियासाठी बोली लावण्याची संधी मिळाली आहे. एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांना या लिलावात बोली लावण्याची संधी मिळत असल्याने याला एतिहासीक गोष्ट मानली जात आहे.(Who is Meenakshi Malik preparing to buy Air India?)

आणि हे सर्व मीनाक्षी मलिक (Meenakshi Malik) यांच्यामुळे शक्य झाले आहे. तर नेमक्या कोण आहेत या मीनाक्षी मलिक काय आहे त्यांचा संघर्ष हे आपण जाणून घेऊयात. मीनाक्षी मलिक एअर इंडियाची व्यावसायिक दिशानिर्देश राहिल्या आहेत. आणि 31 वर्षांपासून त्या एअर लाईनसोबत काम करत आहेत. त्याचप्रमाणे एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांना लिलावात बोली लावण्याची संधी ही मीनाक्षी मलिक यांच्यामुळेच मिळत आहे. मिनाक्षी ह्या एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांचा विश्वास जिंकण्यात यशस्वी झाल्या आहेत.

ते कर्मचारी अगोदरच्या मॅनेजमेंटचा विरोध करत होते. मलिक आणि 218 कर्मचाऱ्यांनी ने एअर लाईनच्या लिलावासाठी ईओआई दिला आहे. टाटाने आणि यूएसच्या एका कंपनी देखील ईओआई दिला आहे.

आता जानेवारीमध्ये समजणार आहे की, यासाठी कोणी कोणी बोली लावली आहे आणि त्यासाठी नेमके कितीजण क्वालिफाईड झाले आहेत. मात्र, यासाठी मीनाक्षी मलिक गेल्या अनेक दिवसांपासून मेहनत घेत आहेत. त्यानंतर खासगी कंपनी फायनांस करेल पण त्यामध्ये एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांचे देखील महत्व राहिल.

मीनाक्षी मलिक 1989 ला कोलकातामध्ये मॅनेजमेंट ट्रेनि म्हणून काम करत होत्या. त्यांनी ओडिशा येथून बीएससी ऑनर्स आणि एमबीए केले आहे. त्यांचे वडिल उपेंद्रनाथ मलिक हे 1961 बॅचचे आयएएस होते. त्यांच्या वडिलांनी ओडिशा राज्यात विविध मोठ्या पदावर काम केले आहे. त्यांची आई राजकुमारी मलिक ह्या डॉक्टर आहेत.

कसा होणार लिलाव

या लिलावाबद्दल बोलायचे झाले तर एअर इंडियाचे 219 कर्मचारी प्रत्येकी 1-1 लाख रुपये लिलावाच्या करारासाठी देणार आहेत. बाकी सर्व पैसे त्यांचे फायन्सशीयल पार्टनर देणार आहे. एअर इंडिया 2017 पासून लिलावासाठी तयार आहे. या काही वर्षांमध्ये एअर इंडियाचे कर्मचारी वेगळ्या परिस्थितीतून जात आहेत.

मलिक यांचे म्हणणे आहे की, इतर कोणापेक्षाही एअर इंडियाचे कर्मचारीचे कर्मचारी एअरलाइनला खूप चांगल्या प्रकारे ओळखतात. सर्वजण प्रशिक्षित आहेत. आम्हाला माहिता आहे की, समस्या नेमक्या कुढे आहेत. आम्ही या लिलावात जिंकण्यासाठी किंवा हरण्यासाठी सहभागी होत नाहीतर आम्हाला एअर इंडियाला चांगले दिवस दाखवायचे आहेत, असे मिनाक्षी मलिक यांचे म्हणणे आहे.

संबंधित बातम्या :

Ratan Tata | दिलदार रतन टाटांची दानत, कोरोना रोखण्यासाठी तब्बल 500 कोटींची मदत

(Who is Meenakshi Malik preparing to buy Air India?)

बोलायला फोन, स्वतंत्र जेवण अन्..., देशमुखांच्या आरोपींचा राजेशाही थाट
बोलायला फोन, स्वतंत्र जेवण अन्..., देशमुखांच्या आरोपींचा राजेशाही थाट.
वक्फ बिलाबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका अस्पष्टच
वक्फ बिलाबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका अस्पष्टच.
जर बाळासाहेब असते तर तुम्ही..., श्रीकांत शिंदे संतापले
जर बाळासाहेब असते तर तुम्ही..., श्रीकांत शिंदे संतापले.
धसांच्या आरोपांवर किरण जाधवांनी बोलणं टाळलं, कॅमेरा बघताच ठोकली धूम
धसांच्या आरोपांवर किरण जाधवांनी बोलणं टाळलं, कॅमेरा बघताच ठोकली धूम.
दाऊदचा उजवा हात म्हणून ओळख; टायगर मेमन पुन्हा का आला चर्चेत
दाऊदचा उजवा हात म्हणून ओळख; टायगर मेमन पुन्हा का आला चर्चेत.
अंबरनाथच्या बँकेत मनसेचा राडा; अमराठी बँक मॅनेजरला धरलं धारेवर
अंबरनाथच्या बँकेत मनसेचा राडा; अमराठी बँक मॅनेजरला धरलं धारेवर.
'नाहीतर आमची आवस्था...', सदाभाऊ काय म्हणाले की सगळेच पोट धरून हसले
'नाहीतर आमची आवस्था...', सदाभाऊ काय म्हणाले की सगळेच पोट धरून हसले.
अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक
अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक.
कुणी पैसे काढून घेत असेल तर...लाडक्या बहिणींना पंकजाताई काय म्हणाल्या?
कुणी पैसे काढून घेत असेल तर...लाडक्या बहिणींना पंकजाताई काय म्हणाल्या?.
धनंजय देशमुख अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल
धनंजय देशमुख अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल.