कोण आहेत सावजी ढोलकिया ज्यांच्या मुलाच्या लग्नाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लावली हजेरी

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या गुजरात दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली आहे. यासोबतच पीएम मोदी इतरही अनेक कार्यक्रमांमध्ये सहभागी झाले आहेत. गुजरातचे हिरे व्यापारी सावजी ढोलकिया यांच्या मुलाच्या लग्नाला पीएम मोदींनी हजेरी लावली आहे.

कोण आहेत सावजी ढोलकिया ज्यांच्या मुलाच्या लग्नाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लावली हजेरी
Follow us
| Updated on: Oct 31, 2024 | 6:37 PM

गुजरातचे हिरे व्यापारी सावजी ढोलकिया यांचा मुलगा द्रव्या ढोलकिया यांच्या लग्नाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही हजेरी लावली होती. सावजी ढोलकिया यांची गणना सुरत शहरातील सर्वात श्रीमंत व्यक्तींमध्ये केली जाते. सूरतचे सर्वात श्रीमंत उद्योगपती असलेले सावजी ढोलकिया यांचा मुलगा द्रव्या ढोलकिया आणि जान्हवी हे दोघे लग्न बंधनात अडकले आहेत. दोघांचे लग्न गुजरातमधील दुधाला येथील हेत नी हवेली येथे पार पडले. ढोलकिया कुटुंबाने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये पीएम मोदी नवविवाहित जोडप्याला आशीर्वाद देताना दिसत आहेत.

हरी कृष्ण ग्रुपचे संस्थापक आणि चेअरमन सावजी ढोलकिया म्हणाले की, “जेव्हा ते पंतप्रधान मोदींना भेटले, तेव्हा त्यांना लग्नासाठी मी आमंत्रित केले. आज द्राव्या आणि जान्हवी यांनी आयुष्याची नवी सुरुवात केलीये. या आनंदाच्या क्षणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीने आमचे कुटुंब कृतज्ञता आणि अभिमानाने भरले आहे.

हा दिवस आपण नेहमी लक्षात ठेवू, आपण ज्या मूल्यांवर विश्वास ठेवतो – प्रेम, एकता आणि परंपरा यांची आठवण करून देणारा आहे असं ही ते म्हणाले.

एका वेगळ्या पोस्टमध्ये ते म्हणाले की, “सात वर्षांच्या मेहनतीनंतर हे लग्न झाले. आम्ही नरेंद्र मोदी यांना दिल्लीत भेटलो तेव्हा आम्ही त्यांना दुधला गावातील भारतमाता सरोवराच्या उद्घाटनासाठी आमंत्रित केले. आम्ही त्यांना दोन वेळा आमंत्रित केले होते. एक कार्यक्रमासाठी आणि दुसरे लग्नासाठी.

सावजी ढोलकिया हे हिरे व्यापारी म्हणून ओळखले जातात. जे दरवर्षी आपल्या कर्मचाऱ्यांना महागड्या कार आणि मुदत ठेवींसह अनेक लक्झरी वस्तू भेट देतात. या वर्षी त्यांच्या हीरा कंपनीने दिल्लीतील कर्मचाऱ्यांना ६०० कार भेट दिल्या आहेत.

1992 मध्ये सावजी धनजींनी त्यांच्या तीन भावांसह सुरतमध्ये हरी कृष्ण एक्सपोर्ट्स प्रायव्हेट लिमिटेडची स्थापना केली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आज या कंपनीत 6500 हून अधिक कर्मचारी आहेत.

संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.