Chandrayaan 3 Launch : कोण आहेत डॉक्टर एस. सोमनाथ ज्यांच्या नेतृत्वात चंद्रयान 3 लाँच

चंद्रयान ३ ने चंद्राच्या दिशेने झेप घेतली. भारतीय अंतराळ संशोधन संस्था इसरोचे प्रमुख एस. सोमनाथ यांच्या नेतृत्त्वातील टीम ही कामगिरी करत आहे.

Chandrayaan 3 Launch : कोण आहेत डॉक्टर एस. सोमनाथ ज्यांच्या नेतृत्वात चंद्रयान 3 लाँच
Follow us
| Updated on: Jul 14, 2023 | 7:59 PM

श्रीहरीकोटा : चंद्रयान ३ ने चंद्राच्या दिशेने आज झेप घेतली. सर्व भारतीयांची नजर चंद्रयान ३ कडे आहे. शास्त्रज्ञांचे कौशल्य पणाला लागले आहे. कारण चंद्रयान २ फेल झाले होते. त्यामुळे आता चंद्रयान ३ लाँच करण्यात आले आहे. श्रीहरीकोटा येथील सतीश धवल अंतराळ केंद्रातून हे चंद्रयान आज दुपारी २ वाजून २५ मिनिटांनी लाँच करण्यात आले.

चंद्रयान ३ ने चंद्राच्या दिशेने झेप घेतली. भारतीय अंतराळ संशोधन संस्था इसरोचे प्रमुख एस. सोमनाथ यांच्या नेतृत्त्वातील टीम ही कामगिरी करत आहे. देशासाठी ही अभिमानाची बाब आहे.

तिरुपती मंदिरात केली पूजा

चंद्रयान ३ मिशनच्या टीमचे नेतृत्व इसरोचे प्रमुख एस. सोमनाथ करत आहेत. गेल्या वर्षी जानेवारीत त्यांनी इसरोच्या प्रमुख पदाची सूत्रे हाती घेतली. चंद्रयान ३ लाँचिंगच्या एका दिवसापूर्वी त्यांनी तिरुपती मंदिरात मिशनच्या यशस्वीतेसाठी पूजा केली.

सोमनाथ यांचा जन्म केरळमधील

डॉ. एस. सोमनाथ यांचा जन्म जुलै १९६३ साली केरळच्या अलापुझा जिल्ह्यात झाला. त्यांचे वडील शिक्षक होते. मेकॅनिकल इंजिनीअरिंगमध्ये त्यांनी पदवी घेतली. केरळ विद्यापिठातून ते टॉपर्स होते.

डॉ. एस. सोमनाथ यांची पत्नी जीएसटी विभागात आहे. त्यांचे नाव वलसाला आहे. त्यांची दोन्ही मुले इंजिनीअरिंग पीजी केलेली आहेत. सोमनाथ यांना चित्रपट पाहणे आवडते.

तीन वर्षांचा कार्यकाळ

इसरोचे प्रमुख डॉ. सोमनाथ यांना १४ जानेवारी २०२२ रोजी सुत्रे स्वीकारली. नियुक्तीनंतर त्यांचा कार्यकाळ तीन वर्षांचा राहणार आहे. याशिवाय सोमनाथ हे अंतराळ आयोगाचे अध्यक्ष आहेत.

करिअरच्या सुरुवातीला पीएसएलव्हीची जबाबदारी

डॉ. एस. सोमनाथ यांना करिअरच्या सुरुवातीला पीएसएलव्ही म्हणजे पोलर सॅटेलाईट लाँच व्हेईकलची जबाबदारी दिली होती. जीएसएलव्ही एमके ३ एक्सिलन्स अवॉर्डने सोमनाथ यांना सन्मानित करण्यात आले. एअरोनॉटिकल सोसायटी ऑफ इंडियाकडून गोल्ड मेडल त्यांना मिळाले आहे.

'धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या',अजितदादांच्या या आमदारांची आग्रही मागणी
'धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या',अजितदादांच्या या आमदारांची आग्रही मागणी.
राजन साळवी ठाकरेंची साथ सोडणार? पदाधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर म्हणाले...
राजन साळवी ठाकरेंची साथ सोडणार? पदाधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर म्हणाले....
'मैं अकेला चला था...', साताऱ्यात फडणवीस-भुजबळांकडून एकमेकांचे कौतुक
'मैं अकेला चला था...', साताऱ्यात फडणवीस-भुजबळांकडून एकमेकांचे कौतुक.
'दम असेल तर या तुमचे कपडे फाडून...', रत्नाकर गुट्टेंचं कोणाला चॅलेंज?
'दम असेल तर या तुमचे कपडे फाडून...', रत्नाकर गुट्टेंचं कोणाला चॅलेंज?.
'लाडक्या बहिणी आता नावडत्या होणार', राज ठाकरेंचं ट्वीट नेमकं काय?
'लाडक्या बहिणी आता नावडत्या होणार', राज ठाकरेंचं ट्वीट नेमकं काय?.
'...त्यावेळी महाराष्ट्रात राज ठाकरेंची किंमत कळेल', मनसे नेत्याच भाष्य
'...त्यावेळी महाराष्ट्रात राज ठाकरेंची किंमत कळेल', मनसे नेत्याच भाष्य.
भुजबळ-फडणवीसांचा एकाच गाडीने प्रवास अन् चर्चांना उधाण
भुजबळ-फडणवीसांचा एकाच गाडीने प्रवास अन् चर्चांना उधाण.
नादच खुळा... अँड्रॉइड, आयफोनपेक्षाही महाग कोंबडे, का होतेय चर्चा?
नादच खुळा... अँड्रॉइड, आयफोनपेक्षाही महाग कोंबडे, का होतेय चर्चा?.
'मुंब्रा शांत आहे शांत राहूदे', स्थानिकांचा मराठी तरूणाला शिवीगाळ
'मुंब्रा शांत आहे शांत राहूदे', स्थानिकांचा मराठी तरूणाला शिवीगाळ.
वाल्मिक कराडला भेटणाऱ्या तांदळेची संतोष देशमुखांच्या भावालाच अरेरावी
वाल्मिक कराडला भेटणाऱ्या तांदळेची संतोष देशमुखांच्या भावालाच अरेरावी.