CM शिवराज सिंह चौहान यांचं अभिनंदन करताना भावूक, कोण आहे ही महिला?

मध्य प्रदेशमध्ये भारतीय जनता पक्षाने मोठा विजय मिळवला आहे. दोन दशकांच्या सत्तांतरानंतर भाजपने प्रचंड बहुमत मिळवून सत्ताविरोधी लाट नसल्याचे पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. यावेळी एक महिला शिवराज सिंह चौहान यांचं अभिनंदन करताना भावूक झाली आहे.

CM शिवराज सिंह चौहान यांचं अभिनंदन करताना भावूक, कोण आहे ही महिला?
shivraj singh
Follow us
| Updated on: Dec 03, 2023 | 5:30 PM

Madhya Pradesh Election Result : मध्य प्रदेशमध्ये मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पक्षाने पुन्हा एकदा मोठा विजय मिळवला आहे. काँग्रेसने राज्यात भाजप विरोधी लाट असल्याचा दावा केला होता. पण हा दावा फोल ठरला आहे. जनतेने पुन्हा एकदा भाजपला बहुतम दिले आहे. सध्या 160 हून अधिक जागांवर भाजप आघाडीवर आहे. त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांकडून जल्लोष सुरु आहे. लाडू वाटून आनंद साजरा केला जात आहे.

कोण आहे ही महिला

भाजपच्या विजयी आघाडीनंतर सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांचे अभिनंदन करताना एक महिला भावूक झाली आहे. त्या शिवराज सिंह यांना गुलाबाचे फूल देऊन त्यांचं अभिनंदन करत आहेत. या दरम्यान त्या भावूक झाल्या आहेत. ही महिला मुख्यमंत्री निवासातील कर्मचारी असून तिचे नाव राधाबाई आहे.

लाडली योजनेचा फायदा

मध्य प्रदेशात भाजपच्या विजयाचं श्रेय महिलांना दिले जात आहे. शिवराज सरकारने काही महिन्यांपूर्वी सुरू केलेल्या ‘लाडली’ योजनेचा भाजपच्या विजयात महत्त्वाचा वाटा असल्याचे बोलले जात आहे. या योजनेंतर्गत राज्यातील महिलांना दरमहा 1250 रुपयांची आर्थिक मदत दिली जात आहे. शिवराज सिंह चौहान यांनी ही रक्कम तीन हजार रुपये करण्याची घोषणा केली आहे.

पंतप्रधान मोदींना विजयाचं श्रेय

मध्य प्रदेशात विधानसभेच्या एकूण 230 जागा आहेत आणि बहुमताचा आकडा 116 आहे. शिवराज सिंह चौहान यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींना मध्य प्रदेशात विजय मिळवून दिला आहे. मध्यप्रदेशातील जनतेच्या मनात मोदी आहेत आणि मोदींच्या मनात मध्य प्रदेश.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.