Bihar Election | बिहारचं राजकारण, संख्याबळ ते सत्ताकारण, कोण किती वरचढ?

बिहारमध्ये सध्या एकूण 7 कोटी 29 लाख मतदार आहेत. २०१५ मध्ये ही मतदारसंख्या 6. 68 कोटी एवढी होती. म्हणजे यंदा जवळपास 68 लाख नव्या मतदारांची भर बिहारमध्ये पडली आहे. त्यामुळे हा नवमतदार कुणाच्या पारड्यात मतदान टाकणार? हे पाहणे औत्सुक्याचं ठरणार आहे.

Bihar Election | बिहारचं राजकारण, संख्याबळ ते सत्ताकारण, कोण किती वरचढ?
Follow us
| Updated on: Sep 25, 2020 | 1:43 PM

पाटणा: बिहार विधानसभा निवडणुकीचं बिगूल आजपासून वाजणार आहे. राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालूप्रसाद यादव यांचं तुरुंगात असणं, मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या लोकप्रियतेला लागलेली आहोटी, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा वाढता करिष्मा, काँग्रेसकडे नेतृत्वाची असलेली वाणवा आणि देशभरात कोरोना संसर्गाचा निर्माण झालेला कहर या पार्श्वभूमीवर यंदाची बिहार विधानसभा निवडणूक होत असून या निवडणुकीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. या निवडणुकीत पुन्हा नितीश कुमार यांची सरशी होणार की लालू प्रसाद यादव तुरुंगातूनही आपला करिष्मा कायम राखणार? हे येणारा काळच ठरवणार आहे.(Bihar Assembly Election Results 2015 )

बिहार विधानसभेचा कार्यकाळ २९ नोव्हेंबर रोजी संपत आहे. राज्यात एकूण २४३ जागांसाठी निवडणूक होणार आहे. त्यात 243 पैकी 38 जागा अनुसूचित जातीसाठी आणि 2 जागा अनुसूचित जनजातीसाठी राखीव आहेत. बिहारमध्ये सध्या एकूण 7 कोटी 29 लाख मतदार आहेत. २०१५ मध्ये ही मतदारसंख्या 6. 68 कोटी एवढी होती. म्हणजे यंदा जवळपास 68 लाख नव्या मतदारांची भर बिहारमध्ये पडली आहे. त्यामुळे हा नवमतदार कुणाच्या पारड्यात मतदान टाकणार? हे पाहणे औत्सुक्याचं ठरणार आहे. हा नवमतदार बिहारच्या निवडणुकीचं गणित बदलू शकणार नसला तरी त्याचा या निवडणुकीवर नक्कीच प्रभाव जाणवेल असं राजकीय जाणकारांचं म्हणणं आहे.

लालू-नितीश साथ-साथ

२०१५मध्ये राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालूप्रसाद यादव यांनी महाआघाडीची निर्माण केली होती. या आघाडीत नितीशकुमार यांचा जेडीयू आणि काँग्रेसचाही समावेश होता. तर भाजपने आरएलएसपी आणि रामविलास पासवान यांच्या लोजपाशी युती करून निवडणूक लढवली होती. त्यावेळी नितीशकुमार हे महाआघाडीचा निवडणुकीतील महत्त्वाचा चेहरा असले तरी लालूप्रसाद यादव हेच खरे स्टार प्रचारक होते. मात्र, दोन वर्षांतच नितीशकुमार यांनी लालूंच्या महाआघाडीशी फारकत घेऊन भाजपशी हात मिळवणी करून सत्ता स्थापन केली होती.

लालूंच्या जागा सर्वाधिक तरीही नितीशकुमार मुख्यमंत्री

2015मध्ये महाआघाडीला 243 जागांपैकी 178 जागांवर विजय मिळाला होता. तर भाजप आघाडीला अवघ्या 58 जागांवरच समाधान मानावे लागले होते. इतर आणि अपक्षांना एकूण 7 जागा मिळाल्या होत्या. महाआघाडीत आरजेडीला 80, जेडीयूला 71 आणि काँग्रेसला 26 जागा मिळाल्या होत्या. महाआघाडीतून निवडणूक लढल्यामुळे गेल्या 25 वर्षांत काँग्रेसला पहिल्यांदाच चांगलं यश मिळालं होतं. तर, भाजप आघाडीत भाजपला 53 जागा मिळाल्या होत्या. तर लोजपाला 2, आरएलएसपीला 2 आणि एचआयएमला एका जागेवर समाधान मानावे लागले होते. (Bihar Assembly Election Results 2015 )

या निवडणुकीत लालूप्रसाद यादव हेच किंग मेकर ठरले होते. सर्वाधिक जागा मिळाल्यानंतर राजदचा मुख्यमंत्री होण्याची पूर्ण शक्यता असतानाही लालूंनी सर्वच राजकीय निरीक्षकांना धक्का देत नितीशकुमार यांच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ टाकली होती. लालूंचा हा निर्णय अनेकांच्या भुवया उंचावणारा ठरला होता. दरम्यान, दोन वर्षानंतर नितीशकुमार यांनी राजदशी असलेला घरोबा तोडत थेट भाजपशी हात मिळवणी करत सवतासुभा रचला होता.

अशी झाली 2015ची निवडणूक

2015मध्ये बिहार विधानसभा निवडणूक 12 ऑक्टोबरला सुरू होऊन 5 नोव्हेंबरपर्यंत चालली होती. 8 नोव्हेंबर रोजी निवडणूक निकाल जाहीर झाले होते. निवडणूक आयोगाने पाच टप्प्यात निवडणुका घेतल्या होत्या. 2015मध्ये राज्यात 6.68 मतदार होते. त्यावेळी 56 टक्के मतदारांनीच मतदानाचा हक्क बजावला होता.

बिहारचे राजकीय बलाबल

  • एनडीए : 125
  • राजद : 80
  • काँग्रेस : 26
  • सीपीआय : 3
  • एचएएम : 1
  • एमआयएम : 1
  • अपक्ष : 5
  • खाली : 2
  • (एकूण जागा 243 सीट)

संबंधित बातम्या:  

बिहार पोलिस महासंचालक गुप्तेश्वर पांडेंची स्वेच्छानिवृत्ती, राजकारणाच्या वाटेवर? 

बिहार निवडणुकीचा सुशांतसिंह प्रकरणाशी घेणं-देणं नाही – देवेंद्र फडणवीस    

बिहार निवडणुकीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया

(Bihar Assembly Election Results 2015 )

गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.