नोएडा: अखेर नोएडातील सुपरटेकचा ट्विन टॉवर (Noida Supertech Twin Towers) जमीनदोस्त करण्याची संपूर्ण तयारी पूर्ण झाली आहे. आज दुपारी 2.30 वाजता एक ब्लास्ट घडवून 102 मीटर ऊंच ही गगनचुंबी इमारत (building) जमीनदोस्त होणार आहे. ही इमारत जमीनदोस्त करण्यासाठी ज्या कंपनीकडे काम दिलं आहे. ती कंपनी आणि स्थानिक प्रशासनाने संपूर्ण तयारी केली आहे. वॉटर फॉल इम्प्लोजन तंत्रानुसार ही इमारत सुरक्षितपणे पाडली जाणार असल्याचं एडफिस इंजिनीयरिंगच्या एका अधिकाऱ्याने सांगितलं. नोएडाच्या (Noida) सेक्टर 93 A मध्ये हा 32 मजली टॉवर बनलेला आहे. मात्र, आता हा टॉवर जमीनदोस्त केला जाणार आहे. हा टॉवर का पाडण्यात येत आहे? तो पाडल्यानंतर काय होणार आहे? टॉवर पाडण्याची गरज का पडलीय? या सर्व प्रश्नांवर खालील पाच मुद्द्यांवर टाकलेला हा प्रकाश.
>> 2002मध्ये नोएडा अथॉरिटी सोसायटी बनवण्याची परवानगी दिली होती. त्यात 14 टॉवर, एक शॉपिंग कॉम्प्लेक्स बनवण्याची परवानगी देण्यात आली होती.
>> त्यानंतर सेक्टर 93Aमध्ये सुपरटेकला भूखंड देण्यात आला होता. जून 2006मध्ये अतिरिक्त भूखंड देण्यात आला होता. तसेच हौसिंग सोसायटीत बदल करण्याचीही परवानगी देण्यात आली होती.
>> मात्र, मूळ योजनेत बदल केल्यावर खरेदीदारांची सहमती घेण्यात आली नाही. या योजनेत आपल्या ग्राहकांना ग्रीन एरिया दाखवण्यात आला. 2009मध्ये बेकायदेशीरपणे ट्विन टॉवर बनवण्याचं काम सुरू झालं. त्यानंतर कंपनीने दिशाभूल करत ग्रीन एरियावर दोन टॉवर उभे केले.
>> कंपनीच्या या बांधकामाला रेसिडेंट वेलफेअर असोसिएशनने विरोध केला. 2010 मध्ये RWA ने ट्विन टावर विरोधात कोर्टात धाव घेतली. मानकानुसार दोन्ही टॉवरच्या दरम्यान 16 फुटाचं अंतर असलं पाहिजे होतं. मात्र, ही मानके धाब्यावर बसून टॉवरमध्ये केवळ 9 मीटरचं अंतर ठेवलं गेलं. या प्रकरणाची पूर्ण सुनावणी झाल्यानंतर निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाने ऑगस्ट 2021मध्ये टॉवर पाडण्याचे आदेश दिले.
>> टॉवर पाडल्यानंतर होणाऱ्या धुळीमुळे डोळ्यात जळजळ, खाज येण्याची समस्या जाणवण्याची शक्यता आहे.
>> श्वसनाचा विकार असलेल्या रुग्णांना धुळीचा त्रास होऊ शकतो
>> डोकेदुखी, क्रॉनिक ब्रोंकायटिस, स्किन रॅशेस येण्याची शक्यता
>> नाक गळणे, गळ्यात खवखवणे, कफ वाढणे आदी समस्याही होऊ शकतात
>> दम्याचा अटॅक, ब्लड प्रेशर वाढण्याची शक्यता
>> गर्भवती महिलांना लवकर लेव्हर पेन होण्याची शक्यता आहे
>> प्री-मॅच्युर डिलिव्हरीची भीती
>> अॅलर्जिक सायनुसाईटिस सारखे विकार
>> दोन्ही टॉवरमध्ये एकाचवेळी स्फोट केला जाणार आहे.
>> स्फोटासाठी दोन्ही टॉवरमध्ये 9640 होल तयार करण्यात आले आहेत.
>> प्रत्येक होलमध्ये 40 ग्रॅमपासून ते 160 ग्रॅम स्फोटके भरण्यात आली आहेत.
>> काही कॉलममध्ये 4 होल, काही कॉलमध्ये 5 होल केले आहेत.
>> दोन्ही टॉवरमध्ये 3700 किलो स्फोटके भरण्यात आली आहेत.
>> एपेक्स टॉवरच्या प्रत्येक मजल्यावर 170 कॉलम
>> सियान टॉवरच्या प्रत्येक मजल्यावर 60 कॉलम
>> टॉवरमध्ये 2650 कॉलममध्ये स्फोटके भरण्यात आली आहेत.
>> 10 भारतीय, 7 विदेशी ब्लास्टर्स ब्लास्ट घडवून आणणार
>> 100 मीटर लांबून इलेक्ट्रिक वायरच्या माध्यमातून होणार ट्रिगर