POK मध्ये का भडकलेत लोकं, भारताने पहिल्यांदाच दिले अधिकृत निवेदन

पाकव्याप्त काश्मीर म्हणजेच पीओके क्षेत्रात सध्या संघर्ष पाहायला मिळत आहे. येथील स्थानिक प्रशासन आणि लोकांमध्ये हा संघर्ष सुरु आहे. पीठाचे भाव आणि विजेचे दर गगणाला भिडल्याने लोकं रस्त्यावर उतरले आहेत. सुरक्षा रक्षकांनी केलेल्या गोळीबारात तीन जणांचा मृत्यू झाला आहे तर काही जखमी झाले आहेत.

POK मध्ये का भडकलेत लोकं, भारताने पहिल्यांदाच दिले अधिकृत निवेदन
Follow us
| Updated on: May 17, 2024 | 6:49 PM

पाकव्याप्त काश्मीरमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून प्रशासनाविरोधात जोरदार निदर्शने सुरू आहेत. त्यामुळे पीओकेमधील नागरिक आणि जवानांमध्ये संघर्ष सुरु आहे. पीओकेमध्ये आंदोलकांवर सुरक्षा दलांनी गोळीबार केल्याने तीन लोकं ठार झाले आहेत तर सहा जण जखमी झालेत. आता भारताने याबाबत अधिकृत निवेदन जारी केले आहे. पीओकेमध्ये होत असलेल्या निदर्शनांबद्दल, परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदे घेत सांगितले की, पीओकेची संसाधने लुटली जात आहेत ज्यामुळे तेथील लोक संतप्त आहेत.

परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले की, “गेल्या काही दिवसांत तेथे निदर्शने होत असल्याच्या बातम्या येत आहेत. त्यामुळे तेथील संसाधने लुटली जात आहेत. लोकांना त्यांच्या संसाधनांपासून वंचित ठेवले जात आहे. तेथील प्रशासनाकडून लोकांचे शोषण होत आहे. जम्मू, लडाख आणि काश्मीर हे भारताचे अविभाज्य भाग आहेत आणि राहतील.

PoK मधील आंदोलक गव्हाच्या पिठाच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. याशिया विजेच्या किंमती ही वाढल्या आहेत. याच्याविरोधात येथील नागरिकांनी आंदोलन केले आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शेहबाज शरीफ यांनी येथे संघर्ष वाढल्यानंतर या प्रदेशासाठी 23 अब्ज रुपयांच्या अनुदानांला तातडीने मंजुरी दिली. पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी सबसिडी जाहीर करुन येथील लोकांना शांत करण्यात प्रयत्न केला. आता  40 किलो पिठासाठी सबसिडीचा दर 3,100 पाकिस्तानी रुपयांवरून 2,000 पाकिस्तानी रुपये करण्यात आला आहे. बातम्यांनुसार, 100, 300 आणि 300 पेक्षा जास्त युनिटसाठीच्या विजेच्या दरात अनुक्रमे 3 रुपये, 5 रुपये आणि 6 रुपये प्रति युनिट अशी कपात करण्यात आली आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गुरुवारी पाकव्याप्त काश्मीरबाबत वक्तव्य केले होते. ते म्हणाले की, ‘फारुख अब्दुल्ला आम्हाला घाबरवतात की पीओके मागू नका, त्यांच्याकडे (पाकिस्तान) अणुबॉम्ब आहेत. हा १४० कोटी लोकांचा महान भारत आहे, हा कुणाला घाबरत नाही. आज मी सीता मातेच्या भूमीवर जाऊन म्हणतो, पीओके भारताचे आहे, भारताचाच राहणार आणि आम्ही तो घेऊ.’

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.