‘100-100 रुपये घेऊन महिला…’, कंगनाच्या ‘त्या’ वक्तव्यामुळे कानशिलात लगावली, महिला जवानाची कबुली

कंगना राणावतला कानशीलात लगावणाऱ्या सीआयएसएफ महिला जवानाचं निलंबन करण्यात आलं आहे. शेतकरी आंदोलनावर कंगनाने दिलेल्या प्रतिक्रियेचा राग मनात धरून हा हल्ला केल्याचे सुरक्षारक्षक महिलेने मान्य केलं आहे.

'100-100 रुपये घेऊन महिला...', कंगनाच्या 'त्या' वक्तव्यामुळे कानशिलात लगावली, महिला जवानाची कबुली
कंगनाच्या 'त्या' वक्तव्यामुळे कानशिलात लगावली, महिला जवानाची कबुली
Follow us
| Updated on: Jun 06, 2024 | 8:17 PM

भाजपची नवनिर्वाचित खासदार तथा बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री कंगना राणावतला चंदिगड विमानतळावर एका महिला CISF जवानाने कानशिलात लगावल्याची घटना घडली आहे. महिला कॉन्स्टेबल कुलविंदर कौर हिने कंगनाच्या कानशिलात लगावली. विशेष म्हणजे एका व्हिडीओत कुलविंदर कौर कंगनाच्या कानशिलात लगावल्याचं मान्य करताना दिसत आहे. “कंगना राणावतने वक्तव्य केलं होतं की, महिला 100-100 रुपये घेऊन शेतकरी आंदोलनात बसायला जातात. त्यावेळी माझी आईसुद्धा शेतकरी आंदोलनात जायची”, असं महिला कॉन्स्टेबल कुलविंदर कौर समोर आलेल्या नवीन व्हिडीओत बोलताना दिसत आहे.

दरम्यान, कंगना राणावतला कानशीलात लगावणाऱ्या सीआयएसएफ महिला जवानाचं निलंबन करण्यात आलं आहे. शेतकरी आंदोलनावर कंगनाने दिलेल्या प्रतिक्रियेचा राग मनात धरून हा हल्ला केल्याचे सुरक्षारक्षक महिलेने मान्य केलं आहे. या सुरक्षारक्षक महिलेचे निलंबन करण्यात आले असून तिथल्या पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

कुलविंद कौर कोण आहे?

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कुलविंद कौर ही पंजाबच्या सुल्तानपूर लोधी येथील रहिवासी आहे. सध्या ती मोहाली येथे वास्तव्यास आहे. तिचे कुटुंबिय शेतकरी आंदोलनाशी जोडले गेले आहेत. सध्या कुलविंदरची पोस्टिंग चंदिगड आंतरराष्ट्रीय विमानतळावर इंटरनल सेक्युरिटीमध्ये होती. कौरने कंगनाला थप्पड लगावल्यानंतर आपली प्रतिक्रियादेखील दिली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

कंगना घटनेनंतर काय म्हणाली?

“कंगनाने घटनेनंतर ट्विटरवर व्हिडीओ शेअर करत प्रतिक्रिया दिली आहे. मी सुरक्षित आहे. चंदिगड विमानतळावर आज जो हल्ला झाला तो सेक्युरिटी चेकसोबत झाली. मी तिथे सेक्युरेटी चेक करुन निघाली तेव्हा तिथे दुसऱ्या केबिनमधील महिला मला तिथून क्रॉस करण्याची वाट पाहत होती. तिने योग्य संधी साधत माझ्या कानशिलात लगावलं आणि मला शिवीगाळ करायला लागली. मी तिला विचारलं की, तू असं का केलं तर ती म्हणाली की, शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देते म्हणून. पण माझं म्हणणं आहे की, पंजाबमध्ये जो आंतकवाद आणि उग्रवाद वाढत आहे, त्याला आपण कसं हाताळणार आहोत?”, अशी प्रतिक्रिया कंगना राणावत हिने दिली आहे.

शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.