पहिल्याच प्रयत्नात UPSC क्रॅक, आता ‘लेडी सिंघम’ IPS काम्या मिश्राने का दिली राजीनामा, म्हणाली, ‘निर्णय कठीण पण…’
who is ips kamya mishra: राजीनामा देण्याचा निर्णय कठीण होता. परंतु नोकरीत मन लागत नव्हते. इतक्या मोठ्या पदावर गेल्यानंतर नोकरी सोडताना खूप दु:ख होत आहे. परंतु आमचा खूप मोठा उद्योग आहे. मी एकटी मुलगी आहे. तसेच नोकरीमुळे परिवारास वेळ देऊ शकत नाही. त्यामुळे राजीनामा देण्याचा कठीण निर्णय घेतला आहे.
महाराष्ट्रात पूजा खेडकर प्रकरण चर्चेत असताना IPS काम्या मिश्रा यांचा राजीनामा समोर आला आहे. बिहारची ‘लेडी सिंघम’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काम्या मिश्रा यांनी अचानक राजीनामा का दिली? यासंदर्भात चर्चा सुरु आहे. त्या बिहारमधील दरंभगा येथे ग्रामीण पोलीस अधीक्षक होत्या. 22 व्या वर्षी आयपीएस झालेल्या काम्या मिश्रा यांनी केवळ 5 वर्षांत नोकरीचा राजीनामा दिला. 2019 मध्ये पहिल्याच प्रयत्नात त्यांनी यूपीएससी परीक्षा क्रॅक केली होती. सुरुवातीला त्यांना हिमाचल केडर मिळाले होते, त्यानंतर बिहार केडरमध्ये त्यांचे स्थलांतर करण्यात आले. काम्या मिश्रा यांचे पती अवधेश सरोज पोलीस अधीक्षक आहेत.
का दिला राजीनामा
काम्या मिश्रा यांनी सांगितले की, राजीनामा देण्याचा निर्णय कठीण होता. परंतु नोकरीत मन लागत नव्हते. इतक्या मोठ्या पदावर गेल्यानंतर नोकरी सोडताना खूप दु:ख होत आहे. परंतु आमचा खूप मोठा उद्योग आहे. मी एकटी मुलगी आहे. तसेच नोकरीमुळे परिवारास वेळ देऊ शकत नाही. त्यामुळे राजीनामा देण्याचा कठीण निर्णय घेतला आहे. काम्या मिश्रा मार्च 2024 मध्ये पहिली ग्रामीण एसपी बनल्या. यूपीएससी परीक्षेत त्यांनी 172 रँक मिळवली होती.
जीतन सहनी हत्याकांड उलगडले
काम्या मिश्रा बिहारच्या लेडी सिंघम म्हणून प्रसिद्धीस आल्या. त्यांनी विकासशील इन्सान पार्टीचे प्रमुख मुकेश सहनी यांचे वडील जीतन सहनी हत्याकांडचा तपास केला. या हाय प्रोफाईल खटल्यात डीआयजी बाबूराम यांनी तयार केलेल्या विशेष तपास पथकाचे नेतृत्व काम्या मिश्राकडे दिले होते. त्यांनी या प्रकरणात पाच जणांना अटक केली होती.
काम्या मिश्राचे पती अवधेश सरोज आयपीएस
7 मार्च 2024 रोजी काम्या मिश्रा यांना ग्रामीण एसपी म्हणून नियुक्त केले गेले होते. काम्या मिश्रा यांचे पती अवधेश सरोजसुद्धा आयपीएस अधिकारी आहे. त्यांनी 2021 बॅचमध्ये यूपीएससी क्रॅक केली होती. ते सध्या मुझफ्फरपूरमध्ये पोलीस अधीक्षक आहेत. काम्या मिश्रा मुळच्या ओरिसामधील आहेत. त्यांनी दिल्ली विद्यापीठातून बीए केले. गेल्या काही महिन्यांपासून त्या राजीनामा देणार असल्याची चर्चा होती. अखेर त्यांनी राजीनामा दिला आहे.