65 वर्षानंतर खरोखरच पहिल्यांदाच अंघोळ केल्यामुळे त्याचा मृत्यू?, धक्कादायक खुलासा काय?; चार एक्सपर्ट काय म्हणतात?
अनेक दशकांपासून अंघोळ न करणारा हा व्यक्ती आळशी असेल. त्यामुळे त्याच्या शरीरात अनेक रोगांनी घर केलं असेल. वाढत्या वयामुळे त्यांच्या शरीरातील अनेक भाग निकामी झाले असतील.
नवी दिल्ली: ईराणचा (Iran) रहिवाशी असलेल्या अमौ हाजी (amou haji) याचा मृत्यू (Cardiac Arrest) झाला. त्याच्या मृत्यूवर अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. त्याला कारणही तशीच आहेत. कारण अमौचं वागणं सामान्य माणसारखं नव्हतं. आपण 65 वर्ष अंघोळ केलीच नाही, असा दावा अमौनेच केला आहे. लोक जेव्हा अमौला अंघोळ करण्याचा आग्रह धरायचे तेव्हा ते नाराज व्हायचे. अंघोळ केल्यावर आपला मृत्यू होईल अशी भीती त्याला वाटायची. ती खरीही ठरली. त्याने रविवारी अंघोळ केली अन् आजारी पडून त्याचा मृत्यू झाला.
अमौ हाजीने 65 वर्षात पहिल्यांदाच अंघोळ केल्याने त्याचा मृत्यू झाल्याची चर्चा आहे. यावर तज्ज्ञांनी मते व्यक्त केली आहेत. इंडो युरोपियन हेल्थ केअरचे फिजिशियन डॉ. चिन्मय गुप्ता यांनी यावर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. अनेक वेळा थंड पाण्याने अंघोळ केल्याने वेजो कन्स्ट्रिक्शन होतं. त्यामुळे कार्डियाक अरेस्ट येतो. जीम केल्यावर अनेकवेळा लोक आइस चिल वॉटरचा प्रयोग हॉटेलात करतात. त्यामुळे कार्डियाक अरेस्ट येतो. परिणामी मृत्यू ओढवतो, असं डॉ. चिन्मय गुप्ता यांनी सांगितलं.
पटणा येथील वायरोलॉजिस्ट डॉ. प्रभात रंजन यांनीही यावर आपलं मत व्यक्त केलं आहे. मनुष्य ज्या वातावरणात राहतो. त्या वातावरणानुसार राहण्याची त्याला सवय होते. हा अॅडॉप्शनचा भाग आहे. घाणेरड्या वातावरणात राहता राहता त्या वातावरणात राहण्यासाठी शरीर आपल्यामध्ये बदल करून घेते. त्यामुळे डुक्करासहीत अनेक प्राण्यांना घाणेरड्या वातावरणात राहण्याची सवय असते. अमौला सुद्धा घाणेरडं जेवण आणि घाणेरडं पेय घेण्याची सवय झाली होती. त्यामुळे अंघोळ केल्याने त्यांना कार्डियाक अरेस्ट आला असेल. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला असावा, असं प्रभात रंजन म्हणाले.
अंघोळीचा आणि मृत्यूचा काहीच संबंध नाही. एखादा व्यक्तीने वर्षानुवर्ष अंघोळ केली नाही अन् शरीरावर पाणी पडताच तो मेला याचे काही मेडिकलमध्ये दाखले नाहीत. अमौ 94 वर्षाचा होता. वाढतं वय आणि शरीरातील रोगांनी केलेलं घर यामुळे त्याचा मृत्यू झाला असावा, असं दिल्लीच्या धर्मशिला नारायणा सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलचे ऑन्कोलॉजी डिपार्टमेंटचे प्रमुख डॉ. अंशुमान कुमार यांनी सांगितलं.
ते 90 वर्षाचे होते. त्यांना हृदयविकाराचा आजार असावा. अनेक वर्ष शरीरावर पाणी घेतलं नाही. त्यामुळे त्यांच्या मनात पाण्याविषयीचं भय निर्माण झालेलं असावं. अंघोळ केल्यानंतर त्यांचा मेंटल स्ट्रेस वाढला असेल. वाढत्या वयामुळे त्यांच्या हार्टच्या आर्टरिज ब्लॉक झाल्या असतील. शरीरावर पाणी पडल्याने स्ट्रेस लेव्हल वाढल्याने हृदयविकाराचा झटका आला असेल, असं त्यांनी सांगितलं.
अनेक दशकांपासून अंघोळ न करणारा हा व्यक्ती आळशी असेल. त्यामुळे त्याच्या शरीरात अनेक रोगांनी घर केलं असेल. वाढत्या वयामुळे त्यांच्या शरीरातील अनेक भाग निकामी झाले असतील. अंघोळ केल्याने मृत्यू होणं हा निव्वळ योगायोग आहे. त्यामुळे त्यांच्या मृत्यूला अंघोळीशी जोडून पाहू नये, असं सफदरजंग हॉस्पिटल कम्युनिटी मेडिसिन डिपार्टमेंटचे प्रमुख डॉ. जुगल किशोर यांनी सांगितलं.