Raining In Winter | हिवाळ्यात पाऊस का पडतो? जाणून घ्या

पाऊस होण्याचं एकच कारण नसतं. समुद्रापासूनचं अंतर, पर्वतांपासूनचं अंतर, परिसरातील झाडं, वारे वाहण्याचं पॅटर्न, हवामान इत्यादी सर्व बाबींवरुन हे ठरतं की कुठे किती पाऊस पडणार.

Raining In Winter | हिवाळ्यात पाऊस का पडतो? जाणून घ्या
महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यंत अवकाळी पाऊस
Follow us
| Updated on: Jan 03, 2021 | 1:25 PM

नवी दिल्ली : दिल्लीसह उत्तर भारतातील अनेक भागात पावसामुळे थंडीचा जोर वाढला आहे (Why Does It Rain In Winter). भारतात पावसाचा एक निश्चित ऋतू आणि कालावधी असतो. तो म्हणजे मान्सून. भारतात मान्सून येण्यापूर्वी उन्हाळ्यातही पाऊस होतो. याला मान्सूनपूर्व पाऊस म्हणतात. पण, हिवाळ्यात पाऊस का येतो, याचा कधी विचार केलाय का? चला आज आपण याबाबत जाणून घेऊ…. (Why Does It Rain In Winter)

पाऊस कसा पडतो?

पाण्याचं बाष्पीभवन होऊन त्याचं रुपांतर ढगात होतं. त्यानंतर ढगांमुळे पाऊस येतो. हे आपल्याला माहित आहे. पण, पाऊस पडण्याची पूर्ण प्रक्रिया काय आहे आणि ती कशी काम करते?

पाण्याच्या बाष्पीभवनातून तयार झालेले ढग आकाशात थंडे होतात. त्यामुळे गॅसचं रुपांतर तरल स्वरुपात होते. या प्रक्रियेला कॉम्पॅक्शन म्हणतात. यानंतर तरल थेंब जमा होतात आणि थेंब मोठे झाल्यावर जेव्हा त्यांचं वजन वाढतं तेव्हा ते पावसाच्या स्वरुपात जमिनीवर बरसतात.

पावसाची कारणं

पाऊस होण्याचं एकच कारण नसतं. समुद्रापासूनचं अंतर, पर्वतांपासूनचं अंतर, परिसरातील झाडं, वारे वाहण्याचं पॅटर्न, हवामान इत्यादी सर्व बाबींवरुन हे ठरतं की कुठे किती पाऊस पडणार.

भारतात ज्याप्रमाणे उन्हाळ्याच्या दुसऱ्या भागात पाऊस होतो. याला मान्सून म्हणतात. याचं कारण म्हणजे भारताची भौगोलिक परिस्थिती. त्यामुळे आपल्या देशात एका विशिष्ट कालावधीत पाऊस होतो. समुद्र किनाऱ्यावरील प्रदेशांमध्ये पाऊस कधीही होऊ शकतो. तर काही ठिकाणी थंडीच्या दिवसांमध्ये पाऊस होतो.

हिवाळ्यात पाऊस का पडतो?

हिवाळ्यात पाऊस पडण्यामागे सर्वात मोठं कारण हे पश्चिमी भागातील परिस्थितीतील बदल (Western Disturbance) हा आहे. याबाबत पुण्यातील इंडियन इन्स्टीट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजीच्या (आयआयटीएम) हवामान तज्ज्ञांनी काही वर्षांपूर्वी एक संशोधन केलं होतं. यानुसार, देशात गेल्या काही वर्षांपासून वेस्टर्न डिस्टरबन्सचा प्रभाव वाढला आहे. तिब्बतच्या पठार आणि भूमध्यरेखा क्षेत्रातील वातावरण गरम असल्यानेही पाऊस पडू शकतो.

आयआयटीएम पुण्याच्या हवमान विभागाच्या तज्ज्ञांच्या संशोधनानुसार, पश्चिम अस्थिरता म्हणजेच वेस्टर्न डिस्टरबन्सचा सरळ सरळ संबंध हा ग्लोबल वॉर्मिंगशी आहे. त्यामुळे याचा हिवाळ्यातील थंड हवामान प्रणालीवर व्यापक परिणाम झाला आहे.

भूमध्य समुद्रावरील कमी दाबाचे क्षेत्र

‘चेंजेंस इन वेस्टर्न डिस्टरबन्स ओवर वेस्टर्न हिमालयाज इन ए वार्मिंग एनवायरनमेंट’ नावाच्या या रिसर्च स्टडीमध्ये शास्त्रज्ञांनी हिवाळ्यात वेस्टर्न डिस्टरबन्समुळे वारंवार होणारी हिमवर्षा किंवा पाऊस पडण्याचे कारण शोधून काढले आहे. भूमध्य समुद्रावरील कमी दाबाचे क्षेत्र असल्याने हिवाळ्यात पाऊस होत असल्याचं शास्त्रज्ञांनी सांगितलं आहे (Why Does It Rain In Winter).

पश्चिमेकडील वाऱ्यांमुळे अस्थिरता वाढतेय

वेस्टर्न डिस्टरबन्स म्हणजे एकप्रकारचं वादळ असतं. हे वारे पश्चिमेकडून येतात त्यामुळे याला वेस्टर्न डिस्टरबन्स म्हटलं जातं. कमी दाबाची साइक्लोनिक सिस्टम उपोष्णकटिबंधीय पश्चिमी वाऱ्यांमुळे भारतात येतात. या वाऱ्यांना हिमालय रोखून धरतो. त्यामुळे त्या पुढे येत नाहीत आणि त्यामुळे हिमालयावर पाऊस पडतो.

शास्त्रज्ञांच्या मते, दक्षिण पाकिस्तान, उत्तर आणि मध्य भारत, दक्षिण द्वीपकल्प भारत आणि बांग्लादेशमध्ये हिवाळ्यात वातावरण थंड असतं. पण, कधी-कधी या वेस्टर्न डिस्टरबन्समुळे आलेल्या बदलांमुळे पाऊस पडतो.

Why Does It Rain In Winter

संबंधित बातम्या :

Weather Alert : कोकणसह राज्यात ‘या’ ठिकाणी आजही पाऊस, हवामान विभागाकडून इशारा

Weather Alert | मुंबईत माथेरानचा फिल, पारा घसरला, महाबळेश्वरमध्ये हिमकण

Mumbai Weather Alert | मुंबईत थंडीचा जोर वाढला, 16 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद

Weather Alert : राज्यात हुडहुडी! निफाडमध्ये नीचांकी तापमानाची नोंद, तर महाबळेश्वरमध्ये दवबिंदू गोठले

Weather Alert : महाराष्ट्र गारठला! नागपूरसह विदर्भातही हुडहुडी, निफाडमध्ये थंडीने रेकॉर्ड मोडला

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.