इराणचे राष्ट्राध्यक्ष रायसी हे काळे कपडे आणि काळी पगडी का घालयचे? काय आहे कारण

इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रायसी यांचे काल हेलिकॉप्टर दुर्घटनेत निधन झाले आहे. खराब हवामानामुळे हेलिकॉप्टर दुर्घटना झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. इराणचे प्रमुख रायसी हे नेहमीच काळी रंगाची पगडी घालायचे. यासोबतच ते काळ्या रंगाचा कोट देखील घालायचे. काय आहे यामागचे कारण जाणून घ्या.

इराणचे राष्ट्राध्यक्ष रायसी हे काळे कपडे आणि काळी पगडी का घालयचे? काय आहे कारण
Follow us
| Updated on: May 20, 2024 | 7:07 PM

इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रायसी यांचे रविवारी हेलिकॉप्टर अपघातात निधन झाले आहे. ते 63 वर्षांचे होते. रायसी यांचे हेलिकॉप्टर काल बेपत्ता झाले होते. त्यानंतर रात्रीपर्यंत त्यांच्या हेलिकॉप्टरचा शोध लागला नव्हता. आज सकाळी त्यांच्या हेलिकॉप्टरचा शोध लागला तेव्हा त्यांचे मृतदेह आढळले. इराणच्या वायव्य प्रांतातील पूर्व अझरबैजानच्या डोंगराळ भागात हेलिकॉप्टरचे अवशेष सापडले. यानंतर या अपघातात रायसी यांच्यासह ९ जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी करण्यात झाली. इराणचे परराष्ट्र मंत्री होसेन अमीर अब्दुल्लाहियान यांचाही या दुर्घटनेत मृत्यू झालाय. रईसी हे अनेकदा काळे कपडे आणि काळी पगडी घालून असायचे. ते काळे कपडे का घालायचे ते जाणून घ्या.

इब्राहिम रायसी हे इराणचे आठवे राष्ट्राध्यक्ष होते. कट्टरतावादी नेते अशीच त्यांची ओळख होती. ते मशिदीचे इमाम तर होतेच पण न्यायपालिका आणि वकिलीशीही संबंधित होते. त्यानंतर ते राजकारणात आले होते. इराणचे माजी राष्ट्राध्यक्ष हाशेमी रफसंजानी आणि हसन रूहानी यांनी ही काळी पगडी परिधान केली होती. परंतु वास्तविक रायसी हे अयातुल्लाच्या पदावर होते. राष्ट्रपतीपदाची निवडणूक जिंकणारे ते पहिले व्यक्ती होते. इतरांकडे होजत अल-इस्लामची पदवी होती. शिया धर्मगुरूंसाठी ही एक मध्यमवर्गीय पदवी आहे.

अयातुल्लाची पदवी ही एक प्रकारची पोस्ट डॉक्टरेट पदवी आहे. मौलाना किंवा डॉक्टरेटची पदवी मिळवण्यासाठी धार्मिक शिक्षणासोबतच धर्मांचा तुलनात्मक अभ्यास, धर्माचे नियम आणि कोणत्याही एका विषयात विशेष क्षमता असणे आवश्यक असते. त्यानंतर मग अयातुल्लाची पदवी मिळते.

अयातुल्लाचा पांढरा आणि काळा ड्रेस

अयातुल्लाचा ड्रेस कोड काळी पगडी आणि काळा झगा आहे. परंतु अयातुल्ला देखील पांढरे कपडे घालतात. अयातुल्ला, जे इस्लामचे संस्थापक, प्रेषित मोहम्मद यांच्या कुटुंबातून येतात, ते काळे कपडे घालतात आणि बाकीचे पांढरे कपडे घालतात. या दोन्ही रंगांच्या कपड्यांचे महत्त्व सारखेच आहे.

पण फतवा देण्याचे काम फक्त अयातुल्लाच करू शकतात, तर सुन्नी मुस्लिमांमध्ये फतवा देण्याचे कामही अयातुल्लाच करू शकतात.  इब्राहिम रायसी हे एक धार्मिक पार्श्वभूमी असलेले राष्ट्राध्यक्ष होते. राष्ट्राध्यक्ष होण्यापूर्वी ते इराणमधील मशद येथील इमाम रजा यांच्या दर्ग्याचे इमाम होते.

अजित पवार काय पोलीस ऑफिसर आहेत का? शिवतारांचे सवाल अन् दादा भडकले
अजित पवार काय पोलीस ऑफिसर आहेत का? शिवतारांचे सवाल अन् दादा भडकले.
श्रद्धा-सबुरीचा अर्थ समजला नाही त्यांची हालत..., मुख्यमंत्र्यांचा टोला
श्रद्धा-सबुरीचा अर्थ समजला नाही त्यांची हालत..., मुख्यमंत्र्यांचा टोला.
'सुरेश धसांना दोन पत्नी...', गुणरत्न सदावर्ते यांचा मोठा दावा
'सुरेश धसांना दोन पत्नी...', गुणरत्न सदावर्ते यांचा मोठा दावा.
अमरावतीत 100 हून अधिक महिलांना विषबाधा, नेमकं काय घडलं?
अमरावतीत 100 हून अधिक महिलांना विषबाधा, नेमकं काय घडलं?.
'रामदास कदमांपासूनच जातीयवादाचा उगम..',ठाकरे गटाच्या नेत्याचा हल्लाबोल
'रामदास कदमांपासूनच जातीयवादाचा उगम..',ठाकरे गटाच्या नेत्याचा हल्लाबोल.
'तुम्हारे पाँव के नीचे ज़मीन नहीं...', शेरो शायरीतून ठाकरेंवर निशाणा
'तुम्हारे पाँव के नीचे ज़मीन नहीं...', शेरो शायरीतून ठाकरेंवर निशाणा.
पुण्यात चाललंय काय? मद्यधुंद तरूणानं पोलिसांना धुतलं, व्हिडीओ व्हायरल
पुण्यात चाललंय काय? मद्यधुंद तरूणानं पोलिसांना धुतलं, व्हिडीओ व्हायरल.
'सरडे रंग बदलतात पण एवढ्या वेगानं...', एकनाथ शिंदे यांचा ठाकरेंना टोला
'सरडे रंग बदलतात पण एवढ्या वेगानं...', एकनाथ शिंदे यांचा ठाकरेंना टोला.
'संजय राऊत डिप्रेशनमध्ये, त्यांची मानसिकता...'; नारायण राणेंचा घणाघात
'संजय राऊत डिप्रेशनमध्ये, त्यांची मानसिकता...'; नारायण राणेंचा घणाघात.
'देवाभाऊ, सापांना जवळ घेऊ नका...', शिवसेना नेत्याचा CM यांना सल्ला
'देवाभाऊ, सापांना जवळ घेऊ नका...', शिवसेना नेत्याचा CM यांना सल्ला.