प्रवासी विमान हिमालयातून का जात नाही? कारणे जाणून हैराण व्हाल
विमानांसाठी हिमालयातील हवामान अजिबात चांगले नाही. येथे हवामान नेहमीच बदलत असते जे विमानांच्या दृष्टीने धोकादायक ठरू शकते. (Why doesn't a passenger plane go through the Himalayas, know the reasons)
नवी दिल्ली : हिमालयाच्या सौंदर्याबद्दल आपण सर्वजण परिचित आहोत, परंतु आपली कितीही इच्छा असली तरीही आपण त्यावरून उड्डाण करू शकत नाही. वास्तविक, विमानासाठी हवाई मार्ग नियमित केले जातात. हिमालयाला सर्व प्रकारच्या उड्डाणाच्या क्षेत्राबाहेर ठेवण्यात आले आहे आणि कोणत्याही परिस्थितीत कोणतीही उड्डाणं हिमालयातून जाऊ शकत नाही. बर्याच लोकांच्या मनात हा प्रश्न येत असेल की हिमालयातून उड्डाण करण्याची परवानगी का नाही. (Why doesn’t a passenger plane go through the Himalayas, know the reasons)
– विमानांसाठी हिमालयातील हवामान अजिबात चांगले नाही. येथे हवामान नेहमीच बदलत असते जे विमानांच्या दृष्टीने धोकादायक ठरू शकते.
– हिमालयाची उंची सुमारे 23 हजार फूट आहे आणि विमान सहसा 30 ते 35 हजार फूट उंचीवर उडते. त्यामुळे हिमालयाची उंची आणि विमान यातील अंतर कमी असते. विमान उडवताना हिमालयची ही उंची अत्यंत धोकादायक असल्याचे सिद्ध होऊ शकते.
– आपत्कालीन परिस्थितीत विमानात प्रवाशांसाठी 20-25 मिनिटांचा ऑक्सिजन असतो. सामान्य ठिकाणी, विमानाला अशा परिस्थितीत 30-35 हजार फूट उंचीवरुन 8-10 हजार फूट उंचीवर यावे लागते, जेथे वातावरण सामान्य होते आणि लोकांना श्वास घेण्यास त्रास होत नाही. अशा परिस्थितीत एखादे विमान हिमालयातून जात असेल तर ते इतक्या कमी वेळात खाली येऊ शकत नाही.
– प्रवाशांच्या सोयीनुसार विमानाचे तापमान आणि हवेचा दाब निश्चित केला जातो. हिमालयात हवामानातील बदलांमुळे व वाऱ्यामुळे होणारी असामान्य वातावरणामुळे विमानावर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो. ज्यामुळे विमानात प्रवास करणाऱ्या प्रवाशांचेही मोठे नुकसान होऊ शकते.
– हिमालयीन प्रदेशांमध्ये पुरेशी नेव्हिगेशन सुविधा उपलब्ध नाहीत. अशा परिस्थितीत, हिमालयातून जाणारे विमान आपत्कालीन परिस्थितीत एअर कंट्रोलशी संपर्क साधू शकत नाहीत.
– आपत्कालीन परिस्थितीत विमानांना कमीत कमी वेळात जवळच्या विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करावी लागते. हिमालयीन प्रदेशात दूर दूरवर विमानतळ नाही. त्यामुळेच विमानांना फिरुन प्रवास करावा लागला तरी हिमालयातून विमानांचे उड्डाण केले जात नाही. (Why doesn’t a passenger plane go through the Himalayas, know the reasons)
Special Report | मराठा आरक्षणाचा चेंडू मोदींच्या कोर्टात, पुढे काय होणार ?https://t.co/wRxI1FeQus#MarathaReservation |#Maratha
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 6, 2021
इतर बातम्या
मुंबईकरांनो लक्ष द्या, ‘कोविन-ॲप’ नोंदणी आणि प्राप्त ‘अपॉइंटमेंट स्लॉट’नुसारच लसीकरण