झारखंडमध्ये दोन टप्प्यात निवडणुका, महाराष्ट्रात एकाच टप्प्यात का?, निवडणूक आयुक्त काय म्हणाले?; खरं कारण समोर

झारखंडमध्ये विधानसभेच्या केवळ 81 जागा आहेत. तरीदेखील तिथे दोन टप्प्यात निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. तर महाराष्ट्रात विधानसभेच्या तब्बल 288 जागा आहे. पण महाराष्ट्रात एकाच दिवशी राज्यभरात निवडणूक होईल, असं मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी जाहीर केलं आहे.

झारखंडमध्ये दोन टप्प्यात निवडणुका, महाराष्ट्रात एकाच टप्प्यात का?, निवडणूक आयुक्त काय म्हणाले?; खरं कारण समोर
झारखंडमध्ये दोन टप्प्यात निवडणुका, महाराष्ट्रात एकाच टप्प्यात का?
Follow us
| Updated on: Oct 15, 2024 | 4:48 PM

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम अखेर जाहीर झाला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी महाराष्ट्रासह झारखंड विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम देखील जाहीर केला. झारखंडमध्ये दोन टप्प्यात निवडणूक होणार असल्याचं निवडणूक आयुक्तांनी जाहीर केलं. झारखंडमध्ये विधानसभेच्या 81 जागा आहेत. तरीदेखील दोन टप्प्यात निवडणुका जाहीर करण्यात आल्या आहेत. पण महाराष्ट्राच्या तब्बल 288 जागा आहेत. पण महाराष्ट्रातील सर्व 288 जागांसाठी एकाच दिवशी एकाच टप्प्यात मतदान होणार असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे. याबाबत मुख्य निवडणूक आयुक्तांना पत्रकार परिषदेत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली. झारखंडमध्ये दोन टप्प्यात मतदान पार पडणार आहे. झारखंडमध्ये १३ नोव्हेंबरला निवडणुकीचा पहिला टप्पा पार पडेल. तर २० नोव्हेंबरला निवडणुकांचा दुसरा टप्पा पार पडेल. याआधी झारखंडमध्ये पाच टप्प्यात निवडणुका झाल्या होत्या. नक्षल एरिया आहे. त्यामुळे दोन टप्प्यात निवडणूक होत आहे. महाराष्ट्रात पूर्वी एकदाच निवडणुका व्हायच्या, आताही एकदाच होणार आहेत, असं निवडणूक आयुक्तांनी स्पष्ट केलं.

“जास्तीत जास्त मतदान करावं. भयमुक्त वातावरणात निवडणुका पार पाडाव्यात म्हणून सख्त निर्देश दिले आहेत. आम्ही स्पष्टपणे सांगितलं आहे. कोणत्याही प्रकारचं प्रलोभन, पैसे वाटप, ड्रग्स वाटप, दारूचं वाटप यावर लक्ष असेल. विमानतळासह सर्व गोष्टीवर लक्ष ठेवण्यात येणार आहे. चेकपोस्टवर ही लक्ष ठेवणार आहे. त्यासाठी या ठिकाणी मल्टिपल टीम तैनात राहील. २४ तास चेकिंग करणार आहे. एक्साईजचे अधिकारी आणि इतर अधिकारी चेक पोस्टवर राहतील. चेकिंगचा अर्थ असा नाही की सर्व सामान्यांना त्रास द्यावा”, असं मुख्य निवडणूक आयुक्तांनी सांगितलं आहे.

मुख्य निवडणूक आयुक्त एक्झिट पोलवर काय म्हणाले?

यावेळी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी एक्झिट पोलच्या प्रश्नावर सविस्तर प्रतिक्रिया दिली. “एक्झिट पोल आल्यामुळे एक्झिट पोलने अपेक्षा वाढल्याने एक मोठं डिस्टॉर्शन निर्माण होत आहे. हा आत्मचिंतन आणि आत्ममंथनाचा विषय माध्यमांसाठी आहे. गेल्या काही निवडणुकांपासून दोन-तीन गोष्टी एकत्र होत आहे. आपण सर्व गोष्टी समजल्या तर… आधी एक एक्झिट पोल येतो. आम्ही त्याला गृहित धरत नाही. पण त्याबाबतची समीक्षा केली पाहिजे. त्याचा सँपल सर्व्हे कुठे झाला, कुठे सर्व्हे झाला हे सर्व पाहण्याची शक्यता आहे”, असं राजीव कुमार यांनी सांगितलं.

हे सुद्धा वाचा

“पोलिंग संपल्यावर तिसऱ्या दिवशी निकाल येतो. पोलिंग संपल्यावर एक अपेक्षा वाढवली जाते, असं होणार म्हणून सांगितलं जातं. पण जेव्हा निकाल लागतो, तेव्हा ८ वाजून ५ मिनिटाने निकाल दाखवले जातात. किती लीड आहे सांगितलं जातं हा मूर्खपणा आहे. एक्झिट पोलला जस्टिफाय करण्यासाठी हे ट्रेंड दाखवले तर जात नाही. नंतर पहिला राऊंडचा निकाल २० मिनिटात येत नाही. आम्ही ९.३० वाजता पहिला राऊंड टाकतो. नंतर ११.३० वाजता टाकतो. आम्ही १ वाजून ३० मिनिटाने टाकतो. ऑफिशियल साईटला निकाल यायला अर्धा तास लागतो. पण लोकांच्या अपेक्षा अधिक वाढवल्या जातात. पण जेव्हा खरा निकाल येतो तेव्हा मिसमॅच होतं. हा विषय असा आहे, आमचे हात बांधलेले आहेत. पण त्यावर मंथन करण्याची गरज आहे. सर्वांनी सेल्फ करेक्शन केलं पाहिजे”, अशी प्रतिक्रिया राजीव शुक्ला यांनी दिली.

महाराष्ट्र विधानसभेचा कार्यक्रम काय?

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक ही एकाच फेजमध्ये होणार आहे. संपूर्ण राज्यात एकाच दिवशी मतदान पार पडणार आहे. महाराष्ट्रात 20 नोव्हेंबरला मतदान पार पडणार आहे. तर 23 नोव्हेंबरला मतमोजणी केली जाईल, अशी महत्वाची माहिती निवडणूक आयुक्तांनी दिली. विधानसभेच्या निवडणुकीसाठी अर्ज करण्याची तारीख ही 22 ऑक्टोबरपासून सुरु होईल. उमेदवार 29 ऑक्टोबरपर्यंत आपला अर्ज दाखल करु शकणार आहेत. यानंतर 30 ऑक्टोबरला सर्व उमेदवारांच्या अर्जाची छाननी होईल. तर 4 नोव्हेंबर 2024 पर्यंत उमेदवार आपला उमेदवारी अर्ज मागे घेऊ शकणार आहेत, अशी माहिती निवडणूक आयुक्तांनी दिली आहे. 25 नोव्हेंबरपर्यंत निवडणुकीचा कार्यक्रम पूर्ण होणार आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.