Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Monsoon: भारतासाठी मान्सून का आहे सर्वाधिक महत्वाचा? यंदाचा मुहूर्त ठरला..!

मान्सूनचा पाऊस तर देशाच्या दृष्टीने महत्वाचा तर आहेच पण त्याचे आगमनही अनेक बाबींसाठी महत्वाचे आहे. गेल्या काही दिवसांपासून देशातील प्रत्येक नागरिकाला त्याच्या आगमनाविषयी उत्सुकता वाढलेली आहे. दोन दिवसांपूर्वीच स्कायमेट या संस्थेने मान्सून यंदा सरासरीपेक्षा अधिक तर बरसणार आहेच पण विशेष म्हणजे तो वेळेवर येणार असल्याचा अंदाज वर्तवलेला आहे. 1 जून हीच मान्सून आगमानाची खरी तारिख आहे.

Monsoon: भारतासाठी मान्सून का आहे सर्वाधिक महत्वाचा? यंदाचा मुहूर्त ठरला..!
मान्सूनला भारतामध्येच नव्हे तर अशिया खंडात अनन्यसाधारण महत्व आहे.
Follow us
| Updated on: May 14, 2022 | 6:30 AM

मुंबई : अद्याप (Monsoon) मान्सूनला सुरवात झालेली नाही तर हे केवळ अंदाज वर्तवले जात आहेत. मात्र, मान्सूनच्या अंदाजबाबतही मोठी उत्सुकता प्रत्येक भारतीयांच्याच नव्हे तर अशिया खंडातील बहुतांश देशातील नागरिकांच्या मनात आहे. गेल्या काही दिवसांपासून केवळ अंदाज वर्तवले जात आहेत तर या अंदाजावरुन समाधान व्यक्त होते आहे. त्याच्या येण्यानं साऱ्यांच कसं प्रफुल्लित होते, असे काय आहे या मान्सूनमध्ये असा प्रश्न काहींना पडू शकतो. पण जो घटक (Indian economy) भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे तो कणाच या मान्सूनवर आधारित आहे. भारतामधील 70 टक्के पाऊस हा मान्सूनवरच अवलंबून आहे. त्यानुसार येथील (Agribusiness) शेती व्यवसायातील सर्व पिके याच पावसावर अवलंबू आहेत. भारतामधील 17 टक्के जेडीपी हा शेतीवर अवलंबून आहे निम्म्याहून अधिक कामगार शक्ती या क्षेत्रात कार्यरत आहे. त्यामुळे मान्सूनबाबत निराशा करणारी एक बातमी देखील या क्षेत्रातील लोक आणि बाजारावर निराशेचे सावट आणते. केवळ शेतीशी निगडीतच नव्हे तर इतर उद्योगधंद्याना उभारी देण्यासाठीही मान्सून हा महत्वाचा घटक आहे.

यंदा केव्हाचा मुहूर्त ?

मान्सूनचा पाऊस तर देशाच्या दृष्टीने महत्वाचा तर आहेच पण त्याचे आगमनही अनेक बाबींसाठी महत्वाचे आहे. गेल्या काही दिवसांपासून देशातील प्रत्येक नागरिकाला त्याच्या आगमनाविषयी उत्सुकता वाढलेली आहे. दोन दिवसांपूर्वीच स्कायमेट या संस्थेने मान्सून यंदा सरासरीपेक्षा अधिक तर बरसणार आहेच पण विशेष म्हणजे तो वेळेवर येणार असल्याचा अंदाज वर्तवलेला आहे. 1 जून हीच मान्सून आगमानाची खरी तारिख आहे. गेल्या अनेक वर्षानंतर मान्सून हे मुहूर्त साधणार तर आहेच पण सलग चौथ्या वर्षी सरासरीपेक्षा तो अधिक बरसणार आहे. हीच बाब शेती व्यवसायाच्या दृष्टीने खूप महत्वाची आहे. दरवर्षी दणक्यात आगमन आणि त्यानंतर उघडीप दिली तरी शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकटे ओढावते त्यामुळे मान्सूनच्या बाबतीत प्रत्येक गोष्ट महत्वाची आहे.

मान्सून सामान्य म्हणजे नेमके काय?

मान्सून कालावधीत जर पाऊस दिर्घकालीन सरासरीच्या (LPA) तुलनेत 96 ते 104 टक्के बरसला तर त्यास सामान्य मान्सून असं म्हणतात. एलपीए म्हणजे देशभरातील पावसाचा 1961 ते 2010 दरम्यानचा सरासरी डेटा असून त्यानुसार या कालावधीतील पावसाची सरासरी 88 सेंटीमीटर आहे.मागील डाटा नुसार मान्सून पावसाची सरासरी ही ठरवली जाते. यंदा देखील स्कायमेटने देशातील बहुतांश भागात सामान्य ते सामान्यपेक्षा अधिक पाऊस होईल, असा अंदाज वर्तवला आहे.

हे सुद्धा वाचा

यामुळे मान्सूनला आहे महत्व..

भूप्रदेशाच्या प्रकारानुसार वार्षिक मोसमी पाऊस म्हणजे मान्सून हा भारतीय उपखंडातील जलचक्र, पीक चक्र, पीक पद्धती, मासेमारीचे चक्र, गुरे चरण्याचे मार्ग, व्यापारी मार्ग इत्यादींची निश्चिती करतो. याचाच दुसरा अर्थ असा की, या उपखंडातील सारे जीवनमान या मान्सूनवर अवलंबून आहे. म्हणूनच इथली अर्थव्यवस्था, समाजव्यवस्था आणि राज्यव्यवस्थाही मान्सूनच्या गणिताशी जोडलेली आहे. आगमन दणक्यात झाले आणि पुन्हा उघडीप दिली तरी शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावते. यामुळे केवळ आर्थिक नुकसानच नाही तर देशाच्या एकूण उत्पादनावरही परिणाम होतो. त्यामुळेच मान्सूनला एक वेगळेच महत्व आहे.

दिक्षाभूमीला वंदन करून अभिप्राय वहीत पंतप्रधानांनी दिला विशेष संदेश
दिक्षाभूमीला वंदन करून अभिप्राय वहीत पंतप्रधानांनी दिला विशेष संदेश.
पंतप्रधान मोदींचा नागपूर दौरा; आरएसएसच्या मुख्यालयाला दिली भेट
पंतप्रधान मोदींचा नागपूर दौरा; आरएसएसच्या मुख्यालयाला दिली भेट.
हरीभाऊ बागडेंच्या हेलिकॉप्टरला अपघात; व्हिडिओ व्हारायल
हरीभाऊ बागडेंच्या हेलिकॉप्टरला अपघात; व्हिडिओ व्हारायल.
साईबाबांच्या पालखी सोहळ्यात आदित्य ठाकरेंना ढोल वाजवण्याचा मोह अनावर
साईबाबांच्या पालखी सोहळ्यात आदित्य ठाकरेंना ढोल वाजवण्याचा मोह अनावर.
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यानिमित्त नागपूरात जोरदार बॅनरबाजी
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यानिमित्त नागपूरात जोरदार बॅनरबाजी.
महाराष्ट्रासह मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पुढील 4 ते 5 दिवस राज्यात...
महाराष्ट्रासह मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पुढील 4 ते 5 दिवस राज्यात....
'कुत्रे अन् मांजरांवरून..', वाघ्या कुत्र्याच्या वादावर जरांगेंचं भाष्य
'कुत्रे अन् मांजरांवरून..', वाघ्या कुत्र्याच्या वादावर जरांगेंचं भाष्य.
प्रत्येक गोष्टीत वाद..., वाघ्या समाधीच्या वादावरून मुख्यमंत्री संतापले
प्रत्येक गोष्टीत वाद..., वाघ्या समाधीच्या वादावरून मुख्यमंत्री संतापले.
'... तर मुंडेंची आमदारकी रद्द होणार', अजंली दमानियांचं मोठं वक्तव्य
'... तर मुंडेंची आमदारकी रद्द होणार', अजंली दमानियांचं मोठं वक्तव्य.
'मुलं मुंडेंची बायको नाही, अस कसं..', करूणा शर्मांची पहिली प्रतिक्रिया
'मुलं मुंडेंची बायको नाही, अस कसं..', करूणा शर्मांची पहिली प्रतिक्रिया.