Chandrayaan-3 : चंद्रयान-3 मोहीम जुलै महिन्यात का होते ? या मोहीमेचे बजेट किती ? सर्व प्रश्नांची उत्तरे
चंद्रावर वातावरणच नसल्याने चंद्रावर स्वारी करणे हे मंगळावर स्वारी करण्यापेक्षा अवघड आहे. भारताचे चांद्रयान-3 उद्या दुपारी आंध्रप्रदेशातील श्रीहरिकोट्टा अंतराळ केंद्रातून दुपारी 2.35 वा. एलव्हीएम-एम4 या प्रक्षेपक रॉकेटद्वारे अवकाशात झेपावणार आहे.
मुंबई : भारताच्या महत्वांकाक्षी चंद्रयान-3 मोहिमेकडे ( Chandrayaan-3 ) साऱ्या जगाचे लक्ष लागले आहे. गुरुवारी दुपारीच या मोहिमेचे काऊंट डाऊन ( countdown ) सुरु झाले असून उद्या शुक्रवारी दुपारी 2.35 वाजता चंद्रयान-3 आकाशात झेपावणार आहे. या चंद्रयान-3 मोहिमेचे वैशिष्ट्य खूप वेगळे आहे. या मोहिमेमुळे भारत इलिट क्लबमध्ये ( Elite Club ) जाऊन पोहचणार आहे. चंद्रावर सॉफ्ट लॅंडींग करणाऱ्या मोजक्या देशांच्या पंक्तीत भारत जाऊन पोहचणार आहे. तर पाहूयात या चंद्रयान-3 मोहिमेची खास वैशिष्ट्ये काय आहेत ?
भारताची चंद्रयान-2 मोहीम चारवर्षांपूर्वी थोडक्यात हुकली होती. त्यानंतर भारताने खचून न जाता अपयश ही यशाची पहिली पायरी मानून जोरदार तयारी केली आहे. या मोहिमेत आपण यश मिळविणारच असा पणच इस्रोच्या शास्रज्ञांनी केला आहे. साल 2019 मध्ये भारत आणि इस्रायल यांची चांद्रयान मोहिम फेल गेली होती. आता नव्या उमेदीने भारताचे चांद्रयान-3 उद्या दुपारी आंध्रप्रदेशातील श्रीहरिकोट्टा येथील सतिश धवन अंतराळ केंद्रातून दुपारी 2.35 वाजता एलव्हीएम-एम4 या प्रक्षेपक रॉकेटद्वारे होणार आहे.
चंद्रयान-3 रॉकेट प्रक्षेपणानंतर काय ?
चंद्रयान-3 प्रक्षेपण शक्तीशाली रॉकेट LVM3 ( पूर्वीचे GSLV MkIII ) द्वारे होणार असून त्याचा सक्सेस रेट शंभर टक्के आहे. इस्रोचे शास्रज्ञ त्याला फॅट बॉय म्हणतात. त्याने लागोपाठ सहा मोहिमा यशस्वी केल्या आहेत. पहिल्या टप्प्यात घनरुप इंधन, दुसऱ्या टप्प्यात द्रवरुप आणि तिसऱ्या अंतिम टप्प्यात क्रायोजेनिक इंधन ( द्रवरुप हायड्रोजन आणि ऑक्सिजन ) हे यान अंतराळात झेपावले. चंद्रयान-3 आधी ते पृथ्वीला मारेल नंतर चंद्राला प्रदक्षिणा घालून ते प्रत्यक्षात 23 ऑगस्टला चंद्रावर स्वारी करेल असे म्हटले जात आहे.
हॉलीवूडपट ‘इंटरस्टेलर’ पेक्षा कमी खर्च
चांद्रयान- 1 या चंद्रावरील पहिल्या यशस्वी मोहिमेचे बजेट 800 कोटी होते. या मोहिमेत चंद्राच्या पृष्ठभागावर यान उतरले नव्हते. हॉलिवूडच्या प्रसिद्ध चित्रपट ‘इंटरस्टेलर’चे बजेट तब्बल 1,062 कोटी ( 165 दशलक्ष डॉलर ) होते. त्यामुळे एका हॉलीवूडपटाच्या किंमतीपेक्षाही कमी दरात आपण चंद्राला गवसणी घालून आलो होता. आताच्या ताज्या चंद्रयान-3 मोहिमेचे बजेट अवघे 615 कोटी ( 75 दशलक्ष डॉलर ) आहे.
चंद्रावर स्वारी करणे का अवघड ?
मंगळ ग्रहावर कार्बन डायऑक्साईड, नायट्रोजन आणि इतर वायूंचे वातावरण तरी आहे. परंतू चंद्रावर वातावरणच नसल्याने चंद्रावर स्वारी करणे हे मंगळावर स्वारी करण्यापेक्षा अवघड मानले जाते. आतापर्यंत चंद्रावर मानव पाठविण्यात केवळ अमेरिकेला यश आले आहे. 1969 ते 1973 पर्यंत चंद्रावर अमेरिकेचे 12 अंतराळवीर जाऊन आले आहेत. चंद्रावर 20 जुलै 1969 ला नील आर्मस्ट्रॉंगने पहीले पाऊल टाकले. भारताची चंद्रयान-2 मोहिम 22 जुलै रोजीच सुरु झाली होती. कारण याच कालावधीच चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळ असतो हे त्यामागचे कारण आहे.