स्टीव्ह जॉब्स यांच्या पत्नीला शिवलिंगला हात का लावू दिला नाही? लॉरेन पॉवेल यांच्या गुरुंनी उघडला राज
laurene powell in mahakumbh: निरंजनी अखाडे प्रमुख असलेले स्वामी कैलाशानंद गिरि महाराज यांनी सांगितले की, लॉरेन महाकुंभात असणार आहे. महाकुंभ कोणत्याही अडथळ्याविना पार पडावा, अशी प्रार्थना त्यांनीही केली. गुलाबी रंगाचा सूट आणि डोक्यावर पांढरा दुपट्टा त्यांनी परिधान केला होता.
laurene powell in mahakumbh: अॅप्पलचे सहसंस्थापक स्टीव्ह जॉब्स यांची पत्नी लॉरेन पॉवेल सध्या भारतात आहे. प्रयागराजमध्ये सुरु असलेल्या महाकुंभात सहभागी होण्यासाठी त्या आल्या आहेत. महाकुंभात येणे आणि भारत भ्रमणामुळे त्या सध्या बातम्यांमधून चर्चेत आहे. त्यांच्या या धार्मिक यात्रेत त्या काशी विश्वनाथ मंदिरात गेल्या. बाबा भोलेनाथचे दर्शन घेतले. परंतु त्यांनी शिवलिंगला हात लावू दिला नाही. जगातील सर्वात श्रीमंत महिला असलेल्या लॉरेन पॉवेल यांना शिवलिंगला स्पर्श करण्याची परवानगी का दिली नाही? त्याचा खुलासा लॉरेन पॉवेल यांचे गुरु स्वामी कैलाशानंद गिरि महाराज यांनी केला आहे.
काय आहे कारण?
स्वामी कैलाशानंद गिरि महाराज यांनी सांगितले की, लॉरेन पॉवेल यांनी काशी विश्वनाथ मंदिरात भगवान महादेवचे दर्शन घेतले. त्यांनी मंदिराच्या परंपरेचे पालन करत नियमानुसार दर्शन घेतले. नियमानुसार त्यांना शिवलिंगला हात लावण्याची परवानगी दिली नाही. कारण गैरहिंदू व्यक्तीला शिवलिंगला स्पर्श करण्याची परवानगी नाही. त्यामुळे त्यांनी बाहेरुनच दर्शन केले. मी एक आचार्य आहे. धार्मिक परंपरांचे पालन करणे हे माझे काम आहे. लॉरेन माझी मुलगी आहे. त्या आमच्या परंपरा समजून घेतात.
बाहेरुच केली पूजा
निरंजनी अखाडे प्रमुख असलेले स्वामी कैलाशानंद गिरि महाराज यांनी सांगितले की, लॉरेन महाकुंभात असणार आहे. महाकुंभ कोणत्याही अडथळ्याविना पार पडावा, अशी प्रार्थना त्यांनीही केली. गुलाबी रंगाचा सूट आणि डोक्यावर पांढरा दुपट्टा त्यांनी परिधान केला होता. काशी विश्वनाथ मंदिराच्या गर्भगृहात त्यांनी बाहेरुच पूजा केली.
लॉरेन यांचे नाव बदलून कमला करण्यात आले आहे. त्या महाकुंभात सहभागी होत आहे. या काळात त्या एका संन्यासाप्रमाणे राहणार आहे. त्या कुंभमेळाव्यात गंगा नदीत स्नान करणार आहे. महाकुंभात 40 कोटी भाविक येण्याची शक्यता आहे. महाकुंभास सुरुवात १३ जानेवारीपासून झाली. सोमवारी महाकुंभाचे पहिले स्नान झाले. त्यानंतर १४ जानेवारी दुसरे स्नान होणार आहे.