PM Modi in isro | चांद्रयान-2 जिथे पोहोचलं, त्या जागेला तिरंगा पॉइंट नाव का दिलं? मोदींनी सांगितलं त्या मागच कारण
PM Modi in isro | चांद्रयान-2 मिशनमध्ये विक्रम लँडरच क्रॅश लँडिंग झालं होतं. मात्र, तरीही त्या जागेला तिरंगा पॉइंट नाव का दिलं? त्यामागची भूमिका मोदींनी सांगितलं.
बंगळुरु : ब्रिक्स परिषद, ग्रीस दौरा आटोपून भारतात दाखल होताच पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्वप्रथम बंगळुरुतील इस्रोच्या मुख्यालयात गेले. तिथे त्यांनी चांद्रयान-3 मोहीम यशस्वी करणाऱ्या टीमची भेट घेतली. त्यांनी इस्रोच्या वैज्ञानिकांच भरभरुन कौतुक केलं. पंतप्रधान मोदींनी आज इस्रोच्या वैज्ञानिकांना संबोधित केलं. त्यावेळी तीन मोठ्या घोषणा केल्या. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर भारताचा विक्रम लँडर जिथे उतरला, त्या जागेला ‘शिवशक्ती’ पॉइंट असं नाव दिलं. त्याचवेळी चांद्रयान-2 मिशनमध्ये विक्रम लँडर जिथे पोहोचला, त्या जागेला तिरंगा पॉइंट असं नाव दिलं.
त्याचवेळी 23 ऑगस्ट या दिवशी भारताची चांद्र मोहिम खऱ्या अर्थाने यशस्वी झाली. भारताने पहिल्यांदा चंद्रावर सॉफ्ट लँडिंग केलं. त्यामुळे यापुढे दरवर्षी 23 ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय अवकाश दिवस म्हणून साजरा केला जाईल.
#WATCH | Karnataka | Prime Minister Narendra Modi says, “The spot on the lunar surface where the Chandrayaan-2 left its footprints will be known as ‘Tiranga’. This will be an inspiration for every effort made by India. it will remind us any failure is not final…” pic.twitter.com/Ubk0IkXVXL
— ANI (@ANI) August 26, 2023
आज अखेर मोदींकडून ‘ती’ घोषणा
भारताचा चांद्रयान-2 मिशन अखेरच्या टप्प्यात फसलं होतं. लँडर चंद्रापासून 2.1 किमी अंतरावर असताना इस्रोचा लँडरशी संपर्क तुटला होता. यानाच चंद्रावर क्रॅश लँडिंग झालं होतं. अगदी थोडक्यात हे मिशन फसलं होतं. पण त्यावेळी भारताने इतकी मोठी झेप घेणही साधीसोपी गोष्ट नव्हती. त्यामुळे या जागेला सुद्धा नाव द्यायच ठरलं होतं. पण तिसऱ्या मोहीमेच्या यशासोबत नाव द्यायच निश्चित केलं होतं. आज पंतप्रधान मोदींनी ती घोषणा केली. चांद्रयान-2 जिथे पोहोचलं, त्या जागेला तिरंगा पॉइंट नाव का दिलं?
चांद्रयान-2 ने चंद्रावर जिथे आपली पदचिन्ह उमटवली, त्या जागेला तिरंगा पॉइंट नाव दिलं आहे. हे नाव का दिल गेलं? त्यामागची भूमिका सुद्धा मोदींनी समजावून सांगितली. “भारताने जे प्रयत्न केले, त्यासाठी तिरंगा पॉइंट प्रेरणा ठरेल. कुठलही अपयश हे शेवटच नसतं, याची आठवण आपल्या तिरंगा पॉइंट करुन देईल” असं मोदी म्हणाले.