Boycott Maldives | मोदींचा दौरा त्यानंतर India vs Maldives, या सगळ्यात लक्षद्वीपच्या खासदाराची भूमिका काय?
Boycott Maldives | भारत आणि मालदीवमध्ये वाद सुरु आहे. त्यात आता लक्षद्वीपच्या खासदाराची भूमिका समोर आली आहे. भारत सरकारने एकदम आक्रमक भूमिका घेतली आहे. मालदीवला भारताशी हा पंगा परवडणारा नाही. भारताकडून यापेक्षा अधिक कठोर कारवाई केली जाऊ शकते.
Boycott Maldives | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लक्षद्वीप दौऱ्यानंतर भारत विरुद्ध लक्षद्वीप वादाला सुरुवात झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्षद्वीप भेटीनंतर काही फोटोज सोशल मीडियावर पोस्ट केले. त्यावर मालदीव सरकारमधील महिला मंत्री मरियम शिउना यांनी पंतप्रधान मोदींच्या पोस्टवर आपत्तीजनक टिप्पणी केली. या नंतर सगळ्यावादाला सुरुवात झाली आहे. या वादात मालदीवमध्ये एकाचवेळी तीन मंत्र्यांना निलंबित करण्यात आलय. भारत सरकारने एकदम आक्रमक भूमिका घेतली आहे. मालदीवला भारताशी हा पंगा परवडणारा नाही. अनेक भारतीयांनी आपल मालदीवच बुकिंग रद्द केलय. EaseMyTrip ने मालदीवच फ्लाइट बुकिंग रद्द केलय. भारताकडून यापेक्षा अधिक कठोर कारवाई केली जाऊ शकते. भारत सरकारच्या आदेशानंतर मालदीवचे हाय कमिशनर इब्राहिम साहिब भारताच्या परराष्ट्र मंत्रालय कार्यालयात दाखल झाले. तिथे स्पष्टीकरण दिल्यानंतर तिथून रवाना झाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी 3 जानेवारीला लक्षद्वीपला गेले होते. निळ्याशार समुद्र किनाऱ्याजवळ वाळूत चालतानाचे त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. तिथे मोदींनी स्नॉकर्लिंगचा सुद्धा आनंद घेतला. त्यांनी भारतीयांना लक्षद्वीपला भेट देण्याच आवाहन केलं. मालदीवच्या काही मंत्र्यांनी ही दृश्य रुचली नाही. म्हणून त्यांनी विरोधात टिप्पणी केली. दरम्यान या सगळ्या वादात लक्षद्वीपचे खासदार मोहम्मद फैझल यांनी मालदीवला चांगलच सुनावलय.
मालदीवला काय प्रॉब्लेम आहे?
“लक्षद्वीपमध्ये पर्यटनाला जो वाव आहे, त्याबद्दल तसेच अन्य क्षेत्रांबद्दल पंतप्रधान मोदी काही बोलले असतील, तर त्यावर मालदीवर शेरेबाजी करण्याची गरज काय?” असा सवाल लक्षद्वीपचे खासदार मोहम्मद फैझल यांनी उपस्थित केलाय. ते ANI शी बोलत होते. “एक गोष्ट निश्चित आहे, लक्षद्वीप एक नवीन ठिकाण आहे, जे लोकांना अजून फिरायच आहे. पंतप्रधान मोदी लक्षद्वीपला आले. ते बोलले, पर्यटनाच्या दृष्टीकोनातून लोकांना ते हव आहे. माझ नेहमीच मत राहिलय की, लक्षद्वीपसाठी सरकारच पर्यटन धोरण हवं, त्यातून युवकांना रोजगार मिळू शकतो. मालदीवला काय प्रॉब्लेम आहे” असं मोहम्मद फैझल म्हणाले.