धीरूभाई अंबानी, बाळासाहेब का झाले नाराज? नितीन गडकरींनी सांगितला ‘तो’ किस्सा

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे वेगवेगळ्या मुद्द्यांवर खुलेपणाने आपले मत मांडण्यासाठी ओळखले जातात. शनिवारी मुंबईत महामार्ग, वाहतूक आणि लॉजिस्टिक्समधील गुंतवणुकीच्या संधींवरील राष्ट्रीय परिषदेला संबोधित करताना गडकरींनी असाच एक किस्सा सांगितला.

धीरूभाई अंबानी, बाळासाहेब का झाले नाराज? नितीन गडकरींनी सांगितला 'तो' किस्सा
नितीन गडकरी
Follow us
| Updated on: Dec 20, 2021 | 6:46 AM

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे वेगवेगळ्या मुद्द्यांवर खुलेपणाने आपले मत मांडण्यासाठी ओळखले जातात. शनिवारी मुंबईत महामार्ग, वाहतूक आणि लॉजिस्टिक्समधील गुंतवणुकीच्या संधींवरील राष्ट्रीय परिषदेला संबोधित करताना गडकरींनी असाच एक किस्सा सांगितला. यावेळी बोलताना ते म्हणाले की, आपल्या एका निर्णयामुळे धीरूभाई अंबानीच नव्हे तर तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी आणि खुद्द शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे देखील अस्वस्थ झाले होते.

…म्हणून निविदा नाकारली

ही घटना महाराष्ट्रातील पहिल्या शिवसेना-भाजप युती सरकारच्या काळातील असल्याचे गडकरींनी सांगितले.  त्यावेळी माझ्याकडे सार्वजनिक बांधकाम खात्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती. हा काळ साधारणपणे 1995 च्या आसपासचा आहे. त्यावेळी रिलायन्सने मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेसाठी निविदा सादर केली होती आणि मी ती निविदा नाकारली. माझ्या या निर्णयामुळे धीरूभाई अंबानीच नव्हे तर तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी आणि खुद्द शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे देखील अस्वस्थ झाले होते. त्यांनी मला याचे कारण विचारले तर मी त्यांना सांगितले की मी यासाठी जनतेकडून पैसा गोळा करणार आहे. मी जनतेच्याच पैशांमधून एक्सप्रेस हायवे आणि वरळी-वांद्रे सी लिंक प्रकल्पाचे बांधकाम करू इच्छितो. तेव्हा सर्वजण माझ्याकडे बघून हसले, कारण ती गोष्ट तेव्हा सर्वांनाच अश्यक वाटत होती. मात्र पुढे ती सत्यात उतरली.

बाळासाहेबांनी केले कौतुक

पुढे आम्ही  गुंतवणुकीसाठी ‘एमएसआरडीसी’ची स्थापना केली. मी तिचा संस्थापक अध्यक्ष होतो. आर. सी. सिन्हा हे माझे व्यवस्थापकीय संचालक होते. ते पुढे अतिरिक्त मुख्य सचिव झाले. आम्ही ‘एमएसआरडीसी’च्या माध्यमातून निधी गोळा करण्यासाठी अनेक प्रयत्न केले. आम्ही अनेक ठिकाणी सादरीकरण करून, प्रकल्पामध्ये गुंतवणुक करण्याचे उद्योजकांना आवाहन केले. एक काळ असा होता जेव्हा आम्ही गुंतवणूकदारांकडे जायचो. मात्र आता काळ बदलला आहे. आता गुंतवणूकदार आमच्याकडे येतात. त्यावेळी देखील मोठा निधी जमा करण्यात मला यश आले होते. निविदा नाकारली म्हणून सुरुवातील अस्वस्थ असलेल्या बाळासाहेबांनी नंतर माझे कौतुक केल्याचे यावेळी गडकरी यांनी सांगितले.

संबंधित बातम्या

हिवाळ्यात दिवसाची सुरुवात एक कप हळदीच्या चहाने करा आणि निरोगी राहा!

50 हजारांचा लेटेस्ट वनप्लस 5G फोन अवघ्या 36,999 रुपयात खरेदीची संधी

गोल्ड लोनच्या परतफेडीसाठी एफडीवर कर्ज घ्यावे का?, जाणून घ्या काय म्हणतात तज्ज्ञ

सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.