WIIT 2025 : जे कोणीच नाही करू शकले ते TV9 ने केले, आता हाच पायंडा पडणार, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा टीव्ही 9 वर कौतुकाचा वर्षाव, 4 मुद्यांनी समजून घ्या
PM Modi Praised TV9 Network : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टीव्ही 9 नेटवर्कच्या मंचावरून 'व्हॉट इंडिया थिंक्स टुडे' कॉन्क्लेव्हला संबोधित केले. त्यांनी यावेळी टीव्ही 9 नेटवर्कचे अभिनंदन करण्यात आले. जे कोणीच नाही करू शकले ते TV9 ने केले, आता हाच पायंडा पडणार, असे ते म्हणाले.

आतापर्यंत वृत्तवाहिन्या 5 स्टार हॉटेलच्या एखाद्या खोलीत समिट घेत होती. पण टीव्ही 9 ने ही परंपरा खंडीत करून एक नवा मार्ग दाखवला. त्यांनी भारत मंडपममध्ये हा कॉन्कलेव्ह घेतला. आता हाच पायंडा पडणार असे कौतुक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टीव्ही 9 नेटवर्कचे कौतुक केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टीव्ही 9 नेटवर्कच्या मंचावरून ‘व्हॉट इंडिया थिंक्स टुडे’ कॉन्क्लेव्हला संबोधित केले.
पंतप्रधान मोदी सुरुवातीला भारताच्या अर्थव्यवस्थेच्या वेगवान प्रगतीबद्दल भरभरून बोलले. त्यांनी देशाच्या परराष्ट्र धोरणाचा मंत्र ‘इंडिया फर्स्ट’ कसा झाला आहे हे स्पष्ट केले. सर्वांसोबत समान अंतर राखून आणि समान मैत्रीच्या नीतीबाबत त्यांनी माहिती दिली. कोविडच्या काळात भारताने लस निर्माण केली, देशातील लोकांना लसीकरण केले आणि 150 हून अधिक देशांना वैद्यकीय मदत पुरवली, त्यांच्या सरकारच्या उपलब्धीविषयी माहिती दिली. या वेळी त्यांनी त्यांच्या 11 वर्षांच्या कारकिर्दीतील उपलब्धी सांगण्यासोबतच टीव्ही 9 नेटवर्कचे विविध कारणांसाठी कौतुक केले.
पहिला मुद्दा – पंतप्रधान मोदी यांनी अर्धा तास तडाखेबंद भाषण केले. यावेळी अनेकवेळा टाळ्यांचा कडकडाट ढाला. त्यांनी टीव्ही 9 नेटवर्कचे कौतुक केले. पंतप्रधान म्हणाले की, ” टीव्ही 9 नेटवर्ककडे मोठा प्रादेशिक प्रेक्षकवर्ग आहे. आता जागतिक मंचावरही या समूहाने दमदार पाऊल ठेवले आहे. या समिटमध्ये पण जगभरातील भारतीय समुदाय हा थेट सहभागी झाला आहे. त्यांचे मी स्वागत करतो.”




दुसरा मुद्दा – पंतप्रधान मोदींनी आत्मनिर्भर भारतावर जोर दिला. त्याचा वारंवार उल्लेख केला. आयात-निर्यातीची आकडेवारी समोर आणत सरकारची उपलब्धी मांडली. ते म्हणाले की, ” 21व्या शतकातील 25 वर्षे आता पूर्ण झाली आहेत, त्यामधील 11 वर्षे आमच्या सरकारने देशाची सेवा केली. जेव्हा आपण ‘व्हॉट इंडिया थिंक्स टुडे’ याबाबत चर्चा करतो, तेव्हा मागील प्रश्न आणि त्याची उत्तरे शोधणे पण महत्त्वाचे आहे. यामुळे टीव्ही 9 नेटवर्कच्या मोठ्या प्रमाणात असणार्या प्रेक्षकांना आत्मनिर्भरतेकडे होणाऱ्या प्रगतीचा अंदाज आला असेल.”
तिसरा मुद्दा – ” टीव्ही 9 नेटवर्कने या समिटचे आयोजन करून एक सकारात्मक पाऊल टाकले आहे. मी टीव्ही 9 चे विशेष अभिनंदन करतो. कारण यापूर्वी सुद्धा मीडिया हाऊस समिट करत आले आहे. पण हे समिट 5 स्टार हॉटेलच्या एखाद्या खोलीत झाले. येथे बोलणारे पण तेच, ऐकणारे पण तेच आणि हॉटेलचा हॉल पण तोच, अशी स्थिती होती. पण टीव्ही 9 ही परंपरा खंडीत केली. त्यांनी हे भव्य दिव्य मॉडेल पेश केले. आता येत्या दोन वर्षांत सर्वांनाच टीव्ही 9 चा हा पायंडा अंमलात आणावा लागेल. या सर्व प्रयत्नांसाठी मी या समूहाचे कौतुक करतो.” असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
चौथा मुद्दा – हजारो मुलातील 30 मुलांना फुटबॉलच्या प्रशिक्षणासाठी ऑस्ट्रिया या देशात पाठवण्याच्या कल्पनेचे त्यांनी कौतुक केले. हे एक अद्भूत काम आहे. या सळसळत्या तरुणाईशी मला संवाद साधता आला. त्यांच्यासोबत फोटो काढता आला, हे माझं सौभाग्य आहे, असे प्रांजळ मत पंतप्रधान मोदी यांनी केले.