आता छत्तीसगडमध्येही मुख्यमंत्री बदलाचे वारे; काँग्रेस नेते टीएस सिंहदेव म्हणाले, पंजाबमध्ये बदल होऊ शकतो तर…

काँग्रेसने पंजाबमध्ये मुख्यमंत्री बदलल्यानंतर आता छत्तीगडमध्येही मुख्यमंत्री बदलाचे वारे सुरू झाले आहेत. काँग्रेसचे मुख्यमंत्रीपदाचे दावेदार आणि विद्यमान आरोग्य मंत्री टीएस सिंहदेव दिल्लीत जाऊन आले आहेत. (Will Chhattisgarh be the next to have a new CM?)

आता छत्तीसगडमध्येही मुख्यमंत्री बदलाचे वारे; काँग्रेस नेते टीएस सिंहदेव म्हणाले, पंजाबमध्ये बदल होऊ शकतो तर...
t s singh deo
Follow us
| Updated on: Sep 25, 2021 | 10:34 AM

रायपूर: काँग्रेसने पंजाबमध्ये मुख्यमंत्री बदलल्यानंतर आता छत्तीगडमध्येही मुख्यमंत्री बदलाचे वारे सुरू झाले आहेत. काँग्रेसचे मुख्यमंत्रीपदाचे दावेदार आणि विद्यमान आरोग्य मंत्री टीएस सिंहदेव दिल्लीत जाऊन आले आहेत. दिल्लीत वरिष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्यानंतर त्यांनी सूचक प्रतिक्रिया दिली आहे. पंजाबमध्ये मुख्यमंत्री बदलू शकतो तर छत्तीसगडमध्ये काहीही होऊ शकतं, असं टीएस सिंहदेव यांनी म्हटलं आहे. (Will Chhattisgarh be the next to have a new CM?)

टीएस सिंहदेव दिल्लीतून आल्यानंतर उत्तराखंडमध्ये मुख्यमंत्री बदल होण्याच्या चर्चांना अधिक उधाण आलं आहे. मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या जागी अन्य कुणाला मुख्यमंत्रीपदी बसविलं जाऊ शकतं, असे कयास वर्तविले जात आहेत. अडिच अडिच वर्षाच्या मुख्यमंत्रीपदाबाबत काही ठिकाणी काही ना काही हालचाल सुरू होती. पंजाबमध्ये मुख्यमंत्री बदलण्यात आला. ते काय अचानक झाले का? पंजाबमध्ये अचानक काहीच झाले नाही. मात्र, मोठा निर्णय घेण्यात आला. यातून हायकमांडची इच्छाशक्तीच दिसून येते. हायकमांड जो निर्णय घेते तो स्वाभाविकपणे अंमलात आणला जातो. मुख्यमंत्री बदलण्याचा हायकमांडने निर्णय राखून ठेवला आहे. तो त्यांचा विशेषाधिकार आहे. निर्णयही त्यांच्याकडूनच येईल. मुदतीचा हा प्रश्नच नाही. पंजाबमध्ये अचानक निर्णय घेतल्याचं आपण पाहिलंच आहे. पंजाबमध्ये असं काही होईल असा आपण विचारही केला नव्हता. अनेक कारणं असतात. त्याआधारेच हायकमांड निर्णय घेत असतात, असं सूचक विधान सिंहदेव यांनी केलं.

काँग्रेसमधील वादावर काय म्हणाले?

छत्तीसगड काँग्रेसमध्ये गटबाजी दिसून येत आहे. बिलासपूरचे आमदार शैलेष पांडेय पोलीस कारवाईवर प्रश्न उपस्थित केला होता. टीएस सिंहदेव यांचं पाठबळ असल्याने आपल्याला शिक्षा मिळाल्याचा दावा त्यांनी केला होता. त्यामुळे काँग्रेसमधील गटबाजी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली होती. त्यावर सिंहदेव यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पांडे्य हे भावनिक आहेत. त्यांच्या मनात काही राहत नाही. ते लगेच बोलून दाखवतात. सार्वजनिक जीवनात आपण जेवढा संयम ठेवतो, तेवढं चांगलं होतं, असं त्यांनी म्हटलं आहे.

पंजाबमध्ये काय घडलं?

पंजाबमध्ये पुढील वर्षी विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. त्यापूर्वीच काँग्रेसने दलित मुख्यमंत्री करून मोठा डाव टाकला आहे. काँग्रेसने कॅप्टन अमरिंदर सिंग यांना हटवून चरणजीतसिंह चन्नी यांना मुख्यमंत्री केलं आहे. पंजाबच्या इतिहासात पहिल्यांदाच दलित मुख्यमंत्री झाल्याने पंजाबची राजकीय समीकरणेही बदलून गेली आहेत. अकाली दलाने सत्ता आल्यावर दलित समाजातील नेत्याला उपमुख्यमंत्री करण्याचं आश्वासन दिलं होतं. त्याला आम आदमी पार्टीने प्रत्युत्तरही दिलं होतं. मात्र, काँग्रेसने नवी खेळी करत अकाली दल, बसपा आणि आपची हवा काढून घेतली असल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे.

कोण आहेत चन्नी?

चरणजीतसिंग चन्नी हे चमकौर साहिब विधानसभा मतदारसंघातील आमदार आहेत. ते अमरिंदर सिंग सरकारमध्ये शिक्षण आणि औद्योगिक प्रशिक्षण मंत्री होते. त्यापूर्वी ते 2015 ते 2016पर्यंत पंजाबमध्ये विरोधी पक्षनेते होते. चरणजीतसिंग चेन्नी हे रामदासिया शीख समुदायातील आहेत. कॅप्टन अमरिंदर सिंग सरकारमध्ये ते 16 मार्च 2017मध्ये वयाच्या 47व्या वर्षी कॅबिनेट मंत्री झाले होते. चमकौर साहिब विधानसभा मतदारसंघातून ते तिसऱ्यांदा आमदार झाले होते. चरणजितसिंग चन्नी हे दलित समुदयातून आहेत आणि कॅप्टन अमरींदरसिंह यांचे कडवे विरोधक मानले जातात. चरणजितसिंग हे 48 वर्षांचे आहेत. पंजाबमध्ये दलितांची टक्केवारी ही 30 टक्क्यांच्या आसपास आहे. आगामी पंजाब विधानसभा निवडणुकीत ही सर्व मतं निर्णायकी ठरतील असा अंदाज बांधून चन्नींना मुख्यमंत्रीपदाची संधी देण्यात आल्याचं जाणकार सांगतायत. (Will Chhattisgarh be the next to have a new CM?)

संबंधित बातम्या:

पंजाबच्या मुख्यमंत्रीपदी काँग्रेसकडून दलित नेत्याला संधी, चरणजितसिंह चन्नींच्या नावाची घोषणा

तुमचं तर ISIच्या महिला एजंटसोबत कनेक्शन, माझ्याकडे पुरावे, तोंड उघडायला लावू नका; सिद्धूंच्या सल्लागाराचा पलटवार

तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, गांधी घराण्याशी घनिष्ठ संबंध; कोण आहेत सुखजिंदरसिंग रंधावा?

(Will Chhattisgarh be the next to have a new CM?)

छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.