PM Modi Russia Tour : मोदींच्या रशिया दौऱ्यात भारताला मिळू शकतं अनेक देशांना चिंतेत टाकणार शस्त्र, अदृश्य शक्ती

PM Modi Russia Tour : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आजपासून सुरु होणारा रशिया दौरा खूप महत्त्वाचा आहे. या दौऱ्यात देशाच्या संरक्षणाच्या दृष्टीने एक महत्त्वाचा करार होऊ शकतो. भविष्यातील आव्हान लक्षात घेता भारताकडे अदृश्य शक्ती देणार हे अस्त्र असणं गरजेच आहे. कारण शेजारचा चीन या बाबतीत आपल्या पुढे आहे.

PM Modi Russia Tour : मोदींच्या रशिया दौऱ्यात भारताला मिळू शकतं अनेक देशांना चिंतेत टाकणार शस्त्र, अदृश्य शक्ती
Follow us
| Updated on: Jul 08, 2024 | 12:01 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून तीन दिवसाच्या रशिया दौऱ्यावर आहेत. 8 ते 10 जुलै 2024 दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी रशियामध्ये असतील. पीएम मोदी रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची भेट घेणार आहेत. यावेळी दोन्ही देशांमध्ये एक महत्त्वाचा करार होऊ शकतो. त्यामुळे सतत भारताच्या मार्गात अडथळे आणणारे चीन-पाकिस्तान टेन्शनमध्ये येऊ शकतात. सुरुवातीपासून भारताची रशिया सोबत घट्ट मैत्री आहे. रशिया भारताचा सर्वात मोठा शस्त्रास्त्र पुरवठादार देश राहिला आहे. मोदींच्या या दौऱ्यात रशियाकडून भारताला एक असं शस्त्र मिळू शकतं, त्यामुळे अनेक देशांची झोप उडेल. भारत आणि रशियामध्ये Su-57 चा खरेदी करार होऊ शकतो.

Su-57 हे पाचव्या पिढीच अत्याधुनिक फायटर जेट आहे. रशिया जॉईंट प्रोडोक्शनचा प्रस्ताव भारताला देऊ शकतो. Su-57 ची निर्मिती करणाऱ्या रोसोबोरोएक्सपोर्टच्या CEO ने मागच्यावर्षी नोव्हेंबर महिन्यात भारतासमोर हा प्रस्ताव मांडला होता. पाचव्या पिढीच फायटर जेट विकसित करण सोप नाहीय. शत्रूसाठी हे सर्वात धोकादायक विमान आहे. भारतासमोर अडचण ही आहे की, एअर फोर्ससाठीच AMCA प्रोजेक्ट पूर्ण व्हायला अजून 10 वर्ष लागतील. त्याचवेळी चीनकडे पाचव्या पिढीची 200 फायटर जेट्स आहेत.

काही हजार कोटींमध्ये किंमत

पाकिस्तानला 2030 पर्यंत चीन किंवा टर्कीकडून पाचव्या पिढीच फायटर जेट मिळू शकतं. त्याआधी भारताने रशिया किंवा अमेरिकेकडून पाचव्या पिढीच फायटर जेट विकत घेणं आवश्यक आहे. पाचव्या पिढीच्या फायटर जेटची किंमत देखील जास्त आहे. काही हजार कोटींमध्ये एका विमानाची किंमत आहे. हा खर्च परवडणारा नाहीय. त्यामुळे रशिया भारताला सह उत्पादनाची ऑफर देत आहे.

ताकद कैकपटीने वाढेल

आज भारताकडे रशियन बनावटीची सर्वाधिक फायटर जेट्स आहेत. त्याशिवाय रणगाडे सुद्धा रशियन बनावटीचे आहेत. भारतीय सैन्य पथकांना रशियन शस्त्रास्त्र हाताळण्याचा दीर्घ अनुभव आहे. SU-57 चा करार झाला, तर इंडियन एअर फोर्सची ताकद कैकपटीने वाढेल.

'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप.
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र.
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?.
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले..
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले...
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'.
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?.
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ.
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण.
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर.
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.