तीन शहरे, चार ग्रीन कॉरिडॉर, कसे आणले गेले दोन जिवंत ह्रदय

केवळ ४८ तासांत तीन शहरांत चार वेगवेगळ्या ठिकाणी ग्रीन कॉरिडॉर म्हणजेच झीरे ट्र्रॅफिक बनवण्यात आलं. मग एक ह्रदय दिल्लीहून पुणे शहरात आले तर दुसरे अहमदाबादवरुन दिल्लीला गेले.

तीन शहरे, चार ग्रीन कॉरिडॉर, कसे आणले गेले दोन जिवंत ह्रदय
ह्रदय प्रत्यारोपणसाठी पुणे शहरात आणण्यात आलेImage Credit source: टीव्ही९ नेटवर्क
Follow us
| Updated on: Feb 14, 2023 | 2:23 PM

नवी दिल्ली : दोन जिवंत ह्रदय आणण्यासाठी तीन शहरांत चार ठिकाणी कॉरिडॉर बनवला गेला. केवळ ४८ तासांत तीन शहरांत चार वेगवेगळ्या ठिकाणी ग्रीन कॉरिडॉर (Green Corridor) म्हणजेच झीरे ट्र्रॅफिक बनवण्यात आलं. मग एक ह्रदय दिल्लीहून पुणे शहरात आले तर दुसरे अहमदाबादवरुन दिल्लीला गेले. त्यानंतर या दोन्ही ह्रदयाचे यशस्वी प्रत्यारोपण करण्यात आले. दोन जणांचे प्राण या ह्रदय प्रत्योरोपण शस्त्रक्रियेमुळे वाचले. पुणे शहरातील लष्करी रुग्णालयात ही शस्त्रक्रिया झाली. पुणे शहरातील महिलेलाच हे ह्रदय लावण्यात आले.

रस्ते अपघातात गंभीर जखमी झालेला अन् नंतर ब्रेन डेड झालेल्या मध्य प्रदेशातील भिंड येथील माजी सैनिकाच्या ह्रदयाचे प्रत्यारोपण ( heart transplant) पुणे येथे करण्यात आले. त्यासाठी हवाई दलाच्या विशेष विमानाने ह्रदय आणले गेले होते. या विशेष विमानासाठी ग्रीन कॉरिडॉर (Green Corridor) तयार करण्यात आला होता.पुण्यातील आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ कार्डिओ थोरॅसिक सायन्सेसमध्ये ही शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली.

हे सुद्धा वाचा

असा बनला कॉरिडॉर

नॅशनल ऑर्गन अ‍ॅण्ड टिश्यू ट्रंन्सप्लॉट ऑर्गनाइजेशन (NOTTO) दिलेल्या माहितीत म्हटले की, अहमदाबादमधील एका डोनरने त्याचे ह्रदय दान केले. त्यासाठी अहमदाबाद ते दिल्ली ग्रीन कॉरिडॉर बनवण्यात आला. ११ फेब्रुवारी रोजी ६ किलोमीटर अंतरासाठी ग्रीन कॉरिडॉर करण्यात आले. तसेच पुणे लोहगाव विमानतळ ते आर्मी हॉस्पिटल असे ग्रीन कॉरिडॉर बनवला.

मध्य प्रदेशातील भिंड येथील माजी सैनिकाला रस्ते अपघात गंभीर दुखापत झाली. त्यांच्यांवर दिल्लीतील ’आर्मी हॉस्पिटल रिसर्च अँड रेफरल’ सेंटरमध्ये उपचार सुरु होते. डॉक्टरांनी 11 फेब्रुवारी रोजी रुग्णाला ब्रेन डेड झाल्याचे घोषित केले. मग माजी सैनिकाच्या कुटुंबाने अवयवदान करण्यास सहमती दर्शवली.

पुणे येथील एका 29 वर्षीय महिलेचे ह्रदय कमकुवत झाले होते. तिच्या शरीरात दुसरे ह्रदय् प्रत्यारोपण करण्याशिवाय पर्याय नव्हता. हृदय अवयदात्याच्या शरीरातून काढल्यानंतर त्याचे प्रत्यारोपण चार ते पाच तासांत होणे आवश्यक असते. सैन्यदलाच्या यंत्रणेने आव्हान पेलत विशेष विमानाने माजी सैनिकाचे ह्रदय पुण्यात आणण्यात आले. त्यासाठी ग्रीन कॉरिडॉर करण्यात आले होते.

अहमदाबादमधून दिल्लीत

अहमदाबादहून १२ फेब्रवारी रोजी ह्रदय दिल्लीत आणले गेले. ३९२ वर्षीय युवकाचे हे ह्रदय होते. त्यासाठी ग्रीन कॉरिडॉर तयार करण्यात आला होता. त्याचे हे ह्रदय ३२ वर्षीय युवकास लावण्यात आले.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.