WITT 2025: ‘व्हॉट इंडिया थिंक्स टुडे’ कार्यक्रमात माय होम ग्रुप्सचे चेअरमन डॉ. रामेश्वर राव यांनी PM MODI यांचे शाल पांघरुन केले स्वागत
'व्हॉट इंडिया थिंक्स टुडे' कॉनक्लेव्हची सुरुआत दिल्लीत मोठ्या जोशात झाली आहे. कॉनक्लेव्हच्या पहिल्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत मंडपमला भेट देत टीव्ही नाईनच्या परिषदेला शुभेच्छा दिल्या. यावेळी माय होम ग्रुप्सचे चेअरमन डॉ.रामेश्वर राव यांनी पीएम मोदी यांचे शाल पांघरुन केले स्वागत केले.

टीव्ही 9 न्यूज नेटवर्कच्या ‘व्हॉट इंडिया थिंक्स टुडे’या कार्यक्रमाचे औपचारिक उद्घाटन आज साक्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत झाले. या कॉनक्लेव्हमध्ये भारताच्या आर्थिक कामगिरीवर विविध तज्ज्ञांकडून तरुणांना मार्गदर्शन केले जाणार आहे. या कार्यक्रमाच्या पहिल्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या सोहळ्यात उपस्थित होत तरुणांना मार्गदर्शन केले.यावेळी त्यांचे स्वागत माय होम ग्रुप्सचे चेअरमन डॉ. रामेश्वर राव यांनी केले. पीएम मोदी यांना मानाची शॉल देऊन त्यांचे पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात आले. ‘व्हॉट इंडिया थिंक्स टुडे’ या परिषदेचे हे तिसरे वर्षे आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी याच्या मार्गदर्शनानंतर या सोहळ्याची सुरुवात होत आहे. त्यांच्या भाषणानंतर सायंकाळी 6. 40 वाजता ‘सिनेमाचा हायवे’या विषयावर एक्टर विजय देवरकोंडा बोलणार आहेत. देवरकोंडा यांच्या संभाषणानंतर सायं. 7.15 वाजता ‘स्टारडामचा हायवे’ या चर्चासत्रात अमित साध आणि जिम सर्भ यांच्या दरम्यान संवाद होणार आहे. या कॉनक्लेव्हमध्ये सिनेमापासून ते राजकारण यातील विविध विषयांवर दिग्गज सामील होणार आहेत.
दिग्गजांचा सहभाग
आज रात्री 7.45 वाजता ‘भारताची सिनेमा शक्ती’ या विषयावर बॉलीवूडची सशक्त अभिनेत्री यामी गौतम हिच्याशी हितगुज होणार आहे. आजच्या सोहळ्याचे एक वैशिष्ट्ये म्हणजे आज टीव्ही ९ नेटवर्कचे एमडी आणि सीईओ बरुण दास यांच्या संबोधन देखील ऐकायला मिळाले. टीव्ही ९ नेटवर्कवर ‘व्हॉट इंडिया थिंक्स टुडे’ कॉनक्लेव्हमध्ये राजकारण, खेळ, सिनेमा आणि उद्योग जगतातील अनेक नामीगिरामी मंडळी सहभागी होणार आहेत. या समाजातील दिग्गजांचे विचार ऐकायला मिळणार आहेत.




धीरेंद्र शास्त्रींपासून ते मोहन यादव यांना ऐकण्याची संधी
दिल्लीच्या भारत मंडपम मध्ये या दोन दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन होत आहे. या कार्यक्रमात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सुनील आंबेकर, धीरेंद्र शास्त्री, भूपेंद्र यादव, जी किशन रेड्डी, चिराग पासवान, भगवंत मान, मनोहर लाल खट्टर, पुष्कर सिंह धामी, पीयूष गोयल, मोहन यादव हे सामील होणार आहेत.
अर्थमंत्री निर्मला सितारमन आणि अश्विनी वैष्णव
याच प्रकारे अश्विनी वैष्णव, स्मृती इराणी, हिमंत बिस्व सरमा, तेजस्वी यादव, निर्मला सितारमन, पाकिस्तान आणि कनाडातील भारताचे माजी उच्चायुक्त अजय बिसारिया, वेदांताचे संस्थापक आणि चेअरमन अनिल अग्रवाल यांच्यासह मारुती सुझुकीचे एक्झुकेटीव्ह डायरेक्टर राहुल भारती आदी मान्यवर सहभागी होणार आहेत.