WITT 2025: गोडसे, सावरकर, मनुस्मृती, संघ मुख्यालयावर तिरंगा…RSS बाबत उपस्थित होत असलेल्या प्रत्येक प्रश्नावर सुनील आंबेकर यांनी दिले उत्तर
Sunil Ambekar WITT: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर आले. त्यात त्यांनी संघाबाबत विचारल्या जाणाऱ्या प्रत्येक प्रश्नावर उत्तर दिले. महात्मा गांधी अन् नथुराम गोडसे, स्वातंत्र्यवीर सावरकर, स्वातंत्र्याच्या आंदोलनात संघ याबाबत सुनील आंबेकर यांनी संघाची भूमिका मांडली.

Sunil Ambekar WITT: टीव्ही 9 नेटवर्कचा वार्षिक कार्यक्रम WITT ग्लोबल समिट सुरु आहे. या समिटमध्ये विविध क्षेत्रातील दिग्गज सहभागी होत आहे. मनोरंजन, उद्योग, राजकारण या क्षेत्रातील दिग्गजांनी समिटमध्ये सहभाग घेतला. त्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर आले. त्यात त्यांनी संघाबाबत विचारल्या जाणाऱ्या प्रत्येक प्रश्नावर उत्तर दिले. महात्मा गांधी अन् नथुराम गोडसे, स्वातंत्र्यवीर सावरकर, स्वातंत्र्याच्या आंदोलनात संघ याबाबत सुनील आंबेकर यांनी संघाची भूमिका मांडली.
स्वातंत्र्याच्या आंदोलनात संघ का नव्हता?
स्वातंत्र्याच्या लढाईत संघ का नव्हता? या प्रश्नावर सुनील आंबेकर म्हणाले, हा एक प्रोपगेंडा आहे. या प्रोपगेंडासाठी काँग्रेस जबाबदार आहे. स्वातंत्र्याच्या आंदोलनात प्रत्येक व्यक्तीने आपले योगदान दिले आहे. परंतु काही संघटनांचे लोक त्याला स्वत:चे आंदोलन सांगत आहे. स्वातंत्र्य लढ्यात दलित आणि आदिवासींनी वेगवेगळ्या भूमिका बजावल्या. पण त्यांच्या भूमिकांचा कुठेही उल्लेख केला जात नाही. तसेच संघाच्या भूमिकेलाही बगल दिली जाते.
संघाच्या मुख्यालयावर तिरंगा का फडकवला जात नाही?
स्वातंत्र्यानंतर संघाच्या मुख्यालयावर तिरंगा न फडकवल्याचा आरोप केला जातो. त्यावर उत्तर देताना सुनील आंबेकर म्हणाले की, आम्हाला कोणाच्या देशभक्तीच्या प्रमाणपत्राची गरज नाही. विशेषत: जे लोक आणीबाणीचे समर्थक आहेत त्यांनी या विषयावर अजिबात बोलू नये. या सर्व अफवा आहे. संघ नेहमी संविधानाचा आदर करतो.




संघ लोक गांधींना मानता का?
संघातील लोक गांधींना मानता का? या प्रश्नाच्या उत्तरात सुनील आंबेकर म्हणाले की, यात काही शंका आहे का? संघ गांधीजींनी देशाच्या हितासाठी सांगितलेल्या सर्व गोष्टी स्वीकारल्या आहेत. मध्य प्रदेशसह काही ठिकाणी नथुराम गोडसेचे मंदिर बनवले गेले. नथुराम गोडसे यांच्या पुजेला सुनील आंबेकर यांनी विरोध केले. हा प्रकार चुकीचा असल्याचे सांगत त्यांनी निषेध केला. ते म्हणाले की, गोडसेची पूजा करणे योग्य नाही. 30 जानेवारी 1948 रोजी नथुराम गोडसे नावाच्या व्यक्तीने महात्मा गांधी यांची गोळ्या घालून हत्या केली होती. कोर्टात गोडसेने स्वतःला हिंदू नेता असल्याचे सांगितले होते.
संघ ब्राह्मणवादी संघटना आहे का?
संघावर नेहमी मनुस्मृतीचे पालन करणारी ब्राह्मणवादी संघटना असल्याचा आरोप केला जातो. त्याचे सुनील आंबेकर यांनी खंडन केले. ते म्हणाले, असे असते तर संघाचे नरेंद्र मोदी हे भारताचे पंतप्रधान झाले नसते. संघ कोणत्याही जातीला मानत नाही. फक्त हिंदुत्वाचे समर्थन करते.
सावरकरांवरील आरोपाबाबत…
वीर सावरकरांनी स्वातंत्र्य चळवळीत माफी मागितल्याचा आरोप केला जातो आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी माफी मागण्याच्या माध्यमातून सावरकरांवर वारंवार निशाणा साधत आहेत. या प्रश्नावर सुनील आंबेकर म्हणाले, सावरकर स्वातंत्र्यलढ्यात 6 वेळा तुरुंगात गेले होते. त्यांच्यावर असे आरोप करणे चुकीचे आहे.
कोण आहेत सुनील आंबेकर
सुनील आंबेकर हे सध्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख पद सांभाळत आहेत. संघात हे पद माध्यमांना माहिती देणे आणि सार्वजनिक व्यासपीठांवर माहिती देण्यासाठी तयार केले आहे. नागपुरात जन्मलेल्या आंबेकर यांनी संघात अनेक मोठी पदे भूषवली आहेत. आंबेकर हे संघातील प्रबळ वक्ते म्हणून ओळखले जातात.