Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘घर से निकलते ही, कुछ दूर चलते ही…’ सोशल मीडियावरील मीम्सवर काय म्हणाले नितीन गडकरी

2029 च्या निवडणुका लढवण्याबाबत विचारले असता नितीन गडकरी म्हणाले की, निवडणूक लढवायची की नाही हे माझ्या हातात नाही. मी पक्षाचा शिस्तबद्ध कार्यकर्ता आहे. पक्षाने आम्हाला निवडणूक लढवण्याची संधी दिली तर मी नक्की लढेन कारण माझी प्रकृती सध्या ठीक आहे.

'घर से निकलते ही, कुछ दूर चलते ही…' सोशल मीडियावरील मीम्सवर काय म्हणाले नितीन गडकरी
Nitin GadakariImage Credit source: टीव्ही 9 भारतवर्ष
Follow us
| Updated on: Mar 30, 2025 | 4:23 PM

WITT 2025: टीव्ही 9 नेटवर्कचा वार्षिक कार्यक्रम WITT ग्लोबल समिटमध्ये विविध क्षेत्रातील तज्ज्ञ सहभागी झाले. या कार्यक्रमात उद्योग, राजकारण, बॉलीवूड क्षेत्रातील दिग्गजांनी आपले विचार मांडले. पंतप्रधान नरेंद्र मोदी या समारंभाच्या उद्घघटनाच्या दिवशी आले होते. त्यांनी टीव्ही 9 नेटवर्कच्या उपक्रमाचे कौतूक केले होते. या WITT समिटमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी अनेक विषयांवर मते मांडली.

टोलबाबत प्रश्न विचारला असता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, तुम्हाला चांगल्या सुविधा हव्या असतील तर त्यासाठी पैसे द्यावे लागतील. उदाहरणार्थ, टीव्ही 9 चा कार्यक्रम एवढ्या मोठ्या सभागृहात आयोजित करण्यात आला होता. तुम्हाला हवे असल्यास रामलीला मैदानाचाही पर्याय होता. परंतु त्या ठिकाणी कार्यक्रम घेण्यासाठी, तुम्हाला भाडे भरावे लागले असते. हीच प्रक्रिया टोललाही लागू होते. जास्तीत जास्त अधिवेशन पूर्ण होण्याच्या आतच मी याबाबत घोषणा करेन, अशी ग्वाही त्यांनी दिली.

व्हायरल होणाऱ्या मीम्सबद्दल…

नितीन गडकरी यांना मीम्सबद्दल प्रश्न विचारण्यात आला. लोक तुमच्यावर सोशल मीडियावर खूप प्रेम करतात आणि तुमची मस्करी करत मीम्स देखील बनवतात. तुमचा फोटो पोस्ट करून कुणीतरी म्हटले की ‘जिंदगी एक सफर है सुहाना आगे टोल भी देकर जाना.’ आणखी एक मीममध्ये असे म्हटले होते की ‘घर से निकलते ही कुछ दूर चलते ही रास्ते में है मेरा टोल…’ यावर हसत प्रतिसाद देत नितीन गडकरी म्हणाले की, मी या टोलचा निर्माता आहे. मी महाराष्ट्रात मंत्री असताना मुंबई-पुणे एक्स्प्रेस महामार्ग बांधण्यासाठी बाजारातून पैसा उभा केला होता. नुकतेच मी संसदेत 25 हजार किलोमीटरचे 2 ते 4 लेनचे रस्ते बनवणार असल्याचे सांगितले. माझी अडचण पैशाची नाही, तर मला काम करताना येणाऱ्या आव्हानांचा सामना करावा लागतो.

वाढत्या महागाईबद्दल

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले, जाती ऐवजी आपण देशात मानवतेबद्दल बोलले पाहिजे आणि देशातील शेवटच्या टोकापर्यंत राहणाऱ्या लोकांना मदत करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. देशात विकास आणि सामाजिक-आर्थिक बदल यावर चर्चा व्हायला हवी.

देशातील वाढत्या महागाईबाबत विचारले असता गडकरी म्हणाले की, कोणतीही समस्या कायमची संपत नाही. या समस्येबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. लोकसंख्या वाढत आहे आणि हळूहळू तुम्हाला कळेल की 125 कोटी लोकसंख्याला मोदीजींच्या नेतृत्वाखाली आमचे सरकार आले तेव्हा अनेकांना दारिद्र्यरेषेच्या वर आणले आहे. या समस्येवर तोडगा निघावा यासाठी देशात रोजगार निर्माण करू आणि रोजगार निर्मिती करणारी अर्थव्यवस्थाही निर्माण करू, असा आमचा सतत प्रयत्न असेल.

2029 च्या निवडणुकीबद्दल

2029 च्या निवडणुका लढवण्याबाबत विचारले असता नितीन गडकरी म्हणाले की, निवडणूक लढवायची की नाही हे माझ्या हातात नाही. मी पक्षाचा शिस्तबद्ध कार्यकर्ता आहे. पक्षाने आम्हाला निवडणूक लढवण्याची संधी दिली तर मी नक्की लढेन कारण माझी प्रकृती सध्या ठीक आहे.

मुस्लिम मतं महायुतीला जाण्याची त्यांना भीती आहे; सामंतांची टीका
मुस्लिम मतं महायुतीला जाण्याची त्यांना भीती आहे; सामंतांची टीका.
धैर्यशील मानेंच्या त्या विधानावर महायुतीच्या नेत्यांच्या संमिश्र भावना
धैर्यशील मानेंच्या त्या विधानावर महायुतीच्या नेत्यांच्या संमिश्र भावना.
राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या निकालावर एमपीएससीचे विद्यार्थी नाराज
राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या निकालावर एमपीएससीचे विद्यार्थी नाराज.
गुणरत्न सदवार्तेंची पुन्हा मनसेवर टीका
गुणरत्न सदवार्तेंची पुन्हा मनसेवर टीका.
अजितदादांनी वास्तव भूमिका मांडली - अशोक चव्हाण
अजितदादांनी वास्तव भूमिका मांडली - अशोक चव्हाण.
संभाजीनगरच्या किराडपुरा भागात मुस्लिम बांधवांनी दिला एकोप्याचा संदेश
संभाजीनगरच्या किराडपुरा भागात मुस्लिम बांधवांनी दिला एकोप्याचा संदेश.
वक्फच्या जमिनी आपल्या मित्रांना द्यायच्या आहेत, ठाकरेंचा भाजपवर आरोप
वक्फच्या जमिनी आपल्या मित्रांना द्यायच्या आहेत, ठाकरेंचा भाजपवर आरोप.
आमची दारं त्यांच्यासाठी कायम उघडी..; संजय शिरसाटांची खैरेंना ऑफर
आमची दारं त्यांच्यासाठी कायम उघडी..; संजय शिरसाटांची खैरेंना ऑफर.
कितीही जवळचा असला तरी मकोका लावायला सांगेल..
कितीही जवळचा असला तरी मकोका लावायला सांगेल...
कोकाटेंची मुक्ताफळं, अजितदादा अनभिज्ञ, कॉंग्रेसची टीका
कोकाटेंची मुक्ताफळं, अजितदादा अनभिज्ञ, कॉंग्रेसची टीका.